15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून सोनेरी अक्षरात इतिहासात नोंदला गेला. हा दिवस संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने साजरा केला जातो. स्वांतत्र्यदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांचं योगदान आहे. त्याचंही या दिवशी आवर्जून स्मरण केलं जातं. या लेखात स्वातंत्र्यदिनाशी निगडीत काही रोचक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
1. भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. पण जेव्हा देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते या जल्लोषात सामील झाले नव्हते.
2. महात्मा गांधी तेव्हा दिल्लीपासून हजारों किलोमीटर दूर बंगालच्या नोआखलीमध्ये होते. जिथे ते हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये होणाऱ्या सांप्रदायिक हिेंसेला रोखण्यासाठी उपोषण करत होते.
3. जेव्हा ठरलं की, आपला भारत देश 15 ऑगस्टला स्वतंत्र होणार तेव्हा जवाहर लाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांनी महात्मा गांधी यांना एक पत्र पाठवलं. या पत्रात लिहीण्यात आलं की, 15 ऑगस्ट आपला पहिला स्वातंत्र्यदिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात, यामध्ये सामील होऊन तुमचा आशिर्वाद द्या.
4. तेव्हा गांधीजींनी त्या पत्राला उत्तर पाठवलं की, जेव्हा कोलकतामध्ये हिंदू-मुस्लिम एकमेकांचा जीव घेत आहेत. तेव्हा मी अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकेन. मी इथली परिस्थिती सुधारण्यासाठी माझा जीव पण देईन. राष्ट्रपिता mahatma gandhi quotes in marathi आजही तितकेच प्रेरणादायी आहेत.
5. जवाहर लाल नेहरू यांनी त्यांचं ऐतिहासिक भाषण ट्रिस्ट विद डेस्टनी हे 14 ऑगस्टला मध्यरात्री व्हॉयसरॉय लॉज (सध्याचं राष्ट्रपती भवन) इथून दिलं होतं.
6. तेव्हा नेहरू प्रधानमंत्री झाले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकलं होतं. पण असं म्हणतात की, महात्मा गांधी त्या दिवशी नऊ वाजताच झोपण्यासाठी निघून गेले होते.
7. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लॉर्ड माऊंटबेटन यांनी आपल्या कार्यालयात काम केलं. दुपारी नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळाची यादी सूपूर्द केली आणि नंतर इंडिया गेट जवळच्या प्रिसेंज गार्डनमधील एका सभेला संबोधित केलं.
8. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय पंतप्रधान लाल किल्ल्यावर झेंडावंदन करतात. पण 15 ऑगस्ट 1947 ला असं नव्हतं झालं. लोकसभा सचिवालयाच्या एका शोधपत्रानुसार नेहरू यांनी 16 ऑगस्ट 1947 साली लाल किल्ल्यावर झेंडावदन केलं होतं.
9. भारताचे तत्कालीन व्हॉयसरॉय लॉर्ड माऊंटबेटन यांचे प्रेस सचिव कँपबेल जॉन्सन यांच्या अनुसार मित्र देशाच्या सेन्याच्या समोर जपानच्या आत्मसमर्पणाची दुसरी वर्षपूर्ती 15 ऑगस्टला येत होती. त्यामुळे याच दिवशी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
10. 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानाच्या मधील सीमारेषाही ठरविण्यात आली नव्हती. ज्याचा निर्णय 17 ऑगस्टला रेडक्लिफ लाईनच्या घोषणेने झाला. ही रेषा भारत आणि पाकिस्तानमधील सीमा ठरविणारी रेषा आहे.
11. भारत 15 ऑगस्टला स्वतंत्र नक्कीच झाला पण त्यावेळी आपलं कोणतंही राष्ट्रगीत नव्हतं. खरंतर रविंद्रनाथ टागोर यांनी जन-गण-मन 1911 मध्येच लिहीलं होतं पण ते राष्ट्रगीत बनलं ते 1950 साली.
12. पंधरा ऑगस्ट हा दिवस तीन अन्य देशांचाही स्वातंत्र्यदिवस आहे. दक्षिण कोरिया जपानपासून 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वतंत्र झाला. ब्रिटनपासून बहारीन 15 ऑगस्ट 1971 रोजी स्वतंत्र झाला आणि फ्रान्सने कांगोला 15 ऑगस्ट 1960 रोजी स्वतंत्र घोषित केलं होतं.
13. 15 ऑगस्ट 1519 ला पनामा शहर बनवण्यात आलं होतं.
14. पंधरा ऑगस्ट 1772 ला ईस्ट इंडिया कंपनीने विविध जिल्ह्यांमध्ये सिव्हील आणि अपराधिक न्यायालयांच्या स्थापनेचा निर्णय घेतला होता.
15. 15 ऑगस्ट 1854 ला ईस्ट इंडिया रेल्वेने कोलकत्ता ते हुगळीपर्यंत पहिली प्रवासी ट्रेन चालवली होती. खरंतर या रेल्वेचं संचालन अधिकृतरित्या 1855 मध्ये सुरू झालं होतं.
16. 15 ऑगस्ट 1872 ला ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वतंत्र करणामध्ये सामील असणाऱ्या महर्षी अरविंदो घोष यांचा जन्म झाला होता.
17. पंधरा ऑगस्ट, 1950 या दिवशी आसाममध्ये भीषण भूकंप आला होता ज्यामुळे तेव्हा 1500 ते 3000 लोकांचा मृत्यू झाला होता.
तुम्हाला माहीत होत्या का, 15 ऑगस्टशी निगडीत असलेल्या या गोष्टी. जर तुम्हाला वरील लेख आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबरही नक्की शेअर करा.