ADVERTISEMENT
home / मनोरंजन
BirthdaySpecial : टायगर श्रॉफ नाही जय हेमंत श्रॉफ

BirthdaySpecial : टायगर श्रॉफ नाही जय हेमंत श्रॉफ

लवकरच बागी 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफचा आज वाढदिवस आहे. बर्थडे बॉय टायगरबाबतच्या काही खास आणि तुम्हाला माहीत नसतील अशा गोष्टी #POPxoMarathi तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. मग जाणून घ्या या स्टार किडचे काही सिक्रेट्स.

टायगरचं खरं नाव

टायगरचा जन्म मुंबईत झाला होता. पण टायगरचं खरं नाव टायगर श्रॉफ नाहीतर जय हेमंत श्रॉफ आहे. पण त्याचे वडील जॅकी श्रॉफ त्याला लहानपणापासून टायगर नावानेच हाक मारायचे.

बॉलीवूड आणि मार्शल आर्ट्स

टायगरने क्रिती सनोन सोबत हिरोपंती या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण बॉलीवूडमध्ये येण्याआधी टायगरला डान्स, स्पोर्ट्स आणि मार्शल आर्ट्समध्ये रस होता. त्याने अभिनयात येण्याबाबत काहीच विचार केला नव्हता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याने मार्शल आर्टच प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली होती.

टायगरची स्कूल क्रश होती श्रद्धा

रिअल लाईफमध्ये टायगर आणि दिशा पटानीची जोडी असल्याची चर्चा आहे. पण सध्या ‘बागी 3’ मध्ये टायगर आणि श्रद्धा पुन्हा एकदा ऑनस्क्रिन कपल म्हणून दिसणार आहेत. त्यांची जोडी फॅन्समध्ये खूपच पसंत केली जाते. या दोघांनीही अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. तसंच हे दोघंही लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एवढंच नाहीतर एकेकाळी टायगरचा श्रद्धावर क्रशही होता. पण त्याने कधीच श्रद्धाला आपल्या फिलींग्ज्सबाबत सांगितलं नाही. कारण का तो घाबरायचा.

ADVERTISEMENT

आमिरने घेतली होती टायगरची मदत

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, मि. परफेक्शनिस्ट आमिरने एका चित्रपटासाठी टायगरची मदत घेतली होती. धूम 3 मध्ये आमिर खानने चोराची भूमिका केली होती. या चित्रपटाच्या वेळी त्याने बॉडी बिल्डींगसाठी टायगर श्रॉफची मदत घेतली होती.

मासांहारी नाही शाकाहारी

टायगर श्रॉफला पाहून तुम्हाला वाटत असेल की, तो बॉडी फिट ठेवण्यासाठी मासांहार नक्की करत असेल पण तो चक्क शाकाहारी आहे. त्याच्या रोजच्या आहारात भाज्यांचा समावेश असतो. तर कधी कधी टायगर अंडी खातो. टायगरला दारू किंवा सिगरेट यापैकी काहीच व्यसन नाही.

दिशा आणि टायगरची लव्हस्टोरी

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या दोघांचीही जोडी सुपरहिट आहे. पण ते फक्त रीलच नाही तर रिअल लाईफमध्ये एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा आहेत. हे दोघंही बरेचदा अनेक इव्हेंट्स आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात आणि सूत्रानुसार हे दोघंही रिलेशनशिपमध्येही आहेत. पण या दोघांनीही याबाबत अजून कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही.

ADVERTISEMENT

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीची लोकप्रियता

परी म्हणू की सुंदरा ! ‘मलंग गर्ल’ दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल

हॅपी बर्थडे टायगर श्रॉफ.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

ADVERTISEMENT

 

01 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT