स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा… यावर्षी आपल्या सर्वांच्या आवडत्या लता दीदी 91 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. खंरतर लता दीदींनी गायलेली सर्वच गाणी सुपरहिट आहेत. त्यामुळे त्याचं नेमकं कोणतं गाणं आवडतं हे सांगणं प्रत्येकासाठी नक्कीच कठीण आहे. दीदींनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून बॉलीवूडला दिलेल्या योगदानाचे मोजमाप करणंच अशक्य आहे. कारण त्यांनी चित्रपटसृष्टीला आजवर हजारो अजरामर गाणी दिली आहेत. सत्तरच्या दशकात सुरू झालेला लता दीदींचा हा स्वरप्रवास सोपा नक्कीच नव्हता. यासाठी जाणून घेऊ या लता दीदींच्या आयुष्यातील काही खास गोष्टी
असा सुरू झाला स्वरप्रवास
लता दीदींचा जन्म इंदौरमध्ये 1929 साली झाला. भावंडांमध्ये त्या सर्वांत मोठ्या होत्या. मीना मंगेशकर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर आणि भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर या भावंडांना त्यांनी नेहमीच साथ दिली. आज या सर्वच भावंडांनी संगीतक्षेत्रात आपलं स्वतंत्र अस्तित्व मिळवलं आहे. मात्र लता दीदी यांच्यामध्ये नेहमीत खास आहेत. कारण लता दीदी तेरा वर्षांच्या असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. पुढे त्यांच्या वडीलांचे मित्र आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक लता दीदींना गायन आणि अभिनयाच्या क्षेत्रात घेऊन आले होते. त्यामुळे लता दीदींनी याच क्षेत्रात नाव कमावलं आणि आयुष्यभर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी लीलया सांभाळली. कमी वयातच त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव झाली होती. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांनी लग्नदेखील केलं नाही. सुरुवातीच्या काळात लता दीदींना चित्रपटसृष्टीत अभिनयासाठी ऑफर येत असत. मात्र त्यांनी त्यांचे पूर्ण लक्ष गायन क्षेत्रावर केंद्रित केले. ज्यामुळे आज भारताची स्वरकोकीळा या नावाने त्या ओळखल्या जातात.
1945 साली लता दीदी मुंबईत आल्या आणि त्यांनी गायनात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मुंबईतील भेंडी बाजारमध्ये उस्ताद अमन अली खान यांच्या हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक मध्ये ट्रे्निंग घेण्यास सुरूवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना 1945 साली ‘मॉं’ चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. पुढे त्यांनी जिद्दी, आझाद, बडीबहन, महल गाईड, कोरा कागज अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणू गायली. नवीन जनरेशनसाठी त्यांनी चांदनी, राम लखन, सनम बेवफा, पत्थर के फूल, डर ते अगदी दिलवाले दुल्हेनिया ले जाएंगे, माचिस, दिल ते पागल है, रंग दे बंसती, कभी खुशी कभी गम, वीर झारा अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. लता दीदींना अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत. त्यांना भारतरत्न आणि दादासाहेब फाळके पुरस्कारदेखील मिळाले आहेत. एवढंच नाही तर न्युयॉर्क युनिव्हर्सिटी सारख्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये मानद ‘डी. लिट’ पदवीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. लता दीदींचा हा संगीत प्रवास असाच सुरू राहावा आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावं हीच ईश्वराकडे प्रार्थना
संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)
लता दिदींचा एक मजेशीर किस्सा
जेव्हा लता दीदी लहान होत्या तेव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवून बसत असत. अशा वेळी त्या रागात एका गाठोड्यात कपडे बांधून घरातून बाहेर निघून जात असत. प्रत्येकवेळी त्यांना घरातील मंडळी घराबाहेर पडताना थांबवून आणि समजावून घरी घेऊन जात असत. एकदा अशाच त्या रागावून घराबाहेर पडच्या मात्र त्यांना कोणीच थांबवलं नाही. त्यामुळे खूप उशीरा पर्यंत त्या एकट्याच घराबाहेर बसून राहिल्या. काही वेळाने त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी ठरवलं की पुन्हा त्या असं कधीच करणार नाहीत. असे अनेक किस्से आहेत ज्यामधून लता दीदींचा जीवनप्रवास समृद्ध होत गेला.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –