फळ ही आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात. काही रोजची फळं आपण अगदी नित्यनेमाने खातो. पण वेगळी फळ खाण्यासाठी आपण पटकन तयार होत नाही. दिसायला वेगळी असलेली ही फळं तुम्हीही खाण्याचे टाळत असाल तर आताच ही फळ खा कारण अशा काही फळांचे शरीराराला खूप जास्त फायदे मिळतात. त्वचा, केस यासोबत सुदृढ शरीरासाठी ही फळ फारच फायद्याची असतात. फळांच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही ही फळ पाहून घ्यायची टाळली असतील तर जाणून घेऊया अशी काही फळे आणि त्यांचे फायदे
सिताफळ हे अतिशय उपयुक्तगरोदरपणी ही फळं आवर्जून खावी
गुलाबी ड्रॅगन फ्रुट
मध्यंतरीच्या काळात या फळाची फारच क्रेझ होती. गोड गुलाबी रंगाचे हे फळ चीनमधून आलेले असून या फळाला फारशी अशी चव नसल्यामुळे काही ठराविक आजारातच ही फळ खाल्ली जातात अशी धारणा भारतीयांची होती. पण आता हे फळ भारताचा एक अविभाज्य भाग बनून गेले आहे. आता अनेक ठिकाणी हे फळ सहज मिळते. याचा गर पांढरा आणि गुलाबी अशा दोन्ही स्वरुपात असतो. गुलाबी रंगाचे हे फळ चवीला फारच गोड असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फळ फारचं चांगले.
स्टार फ्रुट
शाळेबाहेर तुम्ही हे फळ अगदी हमखास खाल्ले असेल. चवीला आंबट-गोड असलेले हे फळ व्हिटॅमिन्स c ने युक्त असते. हे फळ तुम्ही नक्की खाऊन बघा. तुमच्या तोडांची चव गेली असेल तर या फळामध्ये मीठ-मसाला घातल्यामुळ तोंडाला चांगली चव येते. त्यामुळे तुम्ही हे फळ खायलाच हवे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फारच चांगले
अशी ओळखा केमिकल-फ्री फळं How to recognize chemical free fruits
अवाकाडो
अवाकाडो हे देखील आता भारतात सहज मिळू लागले आहे. अवाकाडो हे फळ असे म्हणता येणार नाही. त्याला भाजी या गटात टाकले तरी चालू शकते. कारण खूप ठिकाणी या पासून वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ खाल्ले जातात. अवाकाडोला स्वत:ची अशी मुळीच चव नसते. त्यामुळे खूप वेळा हे खाल्ल्यानंतर तुम्ही काय खाल्ले हे देखील कळत नाही. याला सीझन करुनच खाल्ले जाते. अवाकाडोमध्ये व्हिटॅमिन C,K,E असे सगळे घटक असतात. त्यामुळे त्याचा फायदा मिळतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही हे फळ फायद्याचे ठरते.
ब्लु बेरीज
ब्लु बेरीज हे फळ देखील रेअर फळांपैकी एक फळ आहे. याची किंमत ऐकूनच खूप जण हे फळ घ्यायला बघत नाही. करवंद या प्रकारातील हे फळ असून या फळामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असतात जे तुमच्या त्वचेला तजेला आणण्याचे काम करतात.मेंदूचे कार्य सुरळीत करण्याचे काम देखील हे फळ करते. या फळाचा रंग हा निळा असतो. हे फळ चवीला चांगलेच गोड असते. पण याची किंमत खूप जास्त असल्यामुळे अनेक जण हे फळ घ्यायला बघत नाही.
आता फळांच्या दुकानात गेल्यानंतर ही फळ तुम्ही नक्की घ्या.