Advertisement

मनोरंजन

‘अनन्या’ आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती

Harshada ShirsekarHarshada Shirsekar  |  Jan 2, 2020
‘अनन्या’ आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती

Advertisement

‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’ अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन ‘अनन्या’ आता रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. ड्रीमविव्हर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. 

(वाचा : New Year 2020 : सुट्यांचं कॅलेंडर पाहिलं का, आताच करा फिरायचं प्लानिंग)

चित्रपटाचं टीझर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशय संपन्न कथानक या चित्रपटातून मांडलं जाणार असल्यानं हा चित्रपट नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही.

(वाचा : गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार एकत्र)

ऋतुजा बागवेची ‘अनन्या’वर भावनिक पोस्ट

रंगभूमीवर अनन्याची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवे साकारली होती. सिनेमाचं टीझर पोस्टर रिलीज झाल्यानंतर ऋतुजानं इन्स्टाग्रामवप ‘अनन्या’संदर्भात भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ऋतुजानं पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘अनन्या आज खूप संमिश्र भावना आहेत. कारण अनन्या या नावाशी आणि पात्राशी मी गेले अडीच वर्ष जोडले गेलेले आहे. ज्या नाटकाचे मी अनन्या म्हणून 285 प्रयोग केले. त्या नाटकावर मराठी सिनेमा येत आहे. नाटकातील कलाकार सिनेमामध्ये नाहीत. हा पूर्णत: व्यावसायिक निर्णय आहे आणि त्याचा मला आदर आहे आणि कायम राहील. पण दोन महिन्यांपूर्वी जेव्हा मला सांगण्यात आलं की ‘अनन्या’ ही व्यक्तिरेखा आता दूसरी अभिनेत्री साकारणार मला खूप वाईट वाटलं. तो प्रयोग मी माझ्यातल्या ‘अनन्या’ला घट्ट मिठी मारून केला. “कोणताही कलाकार कलाकृतीपेक्षा मोठा नसतो.” हे डोक़्यात पक्क आहे. त्यामुळे ‘अनन्या’सारखी प्रेरित करणारी कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. मग मी त्याचा भाग असो वा नसो. अनन्या मराठी सिनेमाच्या संपूर्ण टीमला अनन्या नाटकाच्या टीमकड़ून खूप खूप शुभेच्छा. हृता ‘अनन्या’ने मला खूप काही दिलंय. तुलाही तिने भरभरून देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना’. 

(वाचा : सजना है मुझे! ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान)

(वाचा : ‘अर्जुन रेड्डी’सोबत काम करण्यास करण जोहर उत्सुक, दिली मोठी ऑफर)

View this post on Instagram

अनन्या ❤️ आज खुप संमिश्र भावना आहेत. कारण अनन्या हया नावाशी व पात्राशी मी गेले अडिच वर्ष जोडले गेलेले आहे. ज्या नाटकाचे मी अनन्या म्हणून २८५ प्रयोग क़ेले. त्या नाटकावर मराठी cinema येतोय. नाटकातिल कलाकार सिनेमात नाहित. हा पूर्णतहा व्यावसायिक निर्णय आहे आणि त्याचा मला आदर आहे आणि क़ायम राहिल. पण दोन महिन्यापूर्वी जेव्हा मला सांगण्यात आलं की अनन्या ही व्यक्तिरेखा आता दूसरी अभिनेत्री करणार मला खुप वाईट वाटलं. तो प्रयोग मी माझ्यातल्या अनन्या ला घट्ट मीठी मारुन केला. “कोणताही कलाकार कलाकृति पेक्षा मोठा नसतो.” हे डोक़यात पक्क आहे त्यामुळे “अनन्या” सारख़ी प्रेरित करणारी कलाकृति जास्तित जास्त लोकांन पर्यंत पोहोचायला हवी मग मी त्याचा भाग आसो वा नसो. अनन्या मराठी सीनेमाच्या संपूर्ण team ला अनन्या नाटकाच्या team कड़ून खुप खुप शुभेच्छा ❤️🙏😇 @hruta12 अनन्या ने मला खुप काही दिलय. तुला ही तीने भरभरुन देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. @pratapphad @ravijadhavofficial @samir_saptiskar @amolbhor52

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe) on Jan 2, 2020 at 12:13am PST

हे देखील वाचा : 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/