ADVERTISEMENT
home / मनोरंजन
टकाटक लवकरच

सज्ज व्हा मराठीतील बोल्ड चित्रपटासाठी, पाहिला हा नवा व्हिडिओ

 मराठीमध्ये अनेक विषय हे फार सावकाशीने हाताळले जातात. त्यातल्या त्यात न्युडिटी (Nudity), सेक्स (Sex) हे विषय फारच कमी आणि असतील तर त्यातही अनेक गोष्टी आजही लपवून बोलल्या जातात. पण आता हळुहळू मराठी चित्रपटही बदलू लागला आहे. आता मराठी चित्रपटातही बोल्ड आणि हॉट टॉपिक हे सांभाळले जाऊ लागले आहेत. ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट हा आतापर्यंत अनेक बोल्ड गोष्टी घेऊन आला होता. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी देखील त्याला ओटीटीवर अनेकांनी पाहिले. आता या चित्रपटाचा पुढील भाग येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

सज्ज व्हा डबलडोससाठी

नुकताच टकाटक 2 चे एक मोशन पिक्चर समोर आले आहे. यामध्ये टकाटकची नवी टीम दिसत आहे. त्यासोबत आहे प्रथमेश परब. म्हणजे आपला लाडका दगडू. ही पोस्ट शेअर करत हा चित्रपट धमाल, मैत्री, प्रेमाचा एक सुरेख कॉम्बो असणार आहे असे दिसत आहे. त्यामुळे याचे मोशन चित्रपट आल्याबरोबर अनेकांना या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. येत्या 18 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरची थोडी प्रतिक्षा आपल्याला पाहावी लागणार आहे. 

पहिला टकाटक चर्चेत

पहिला टकाटक हा जर कोणी पाहिला असेल तर त्यातील बोल्डसीन बद्दल काहीही वेगळे सांगायला नको. कारण हा चित्रपट आल्यानंतर त्यातील बिकिनी सीन आणि लव्ह मेकिंगसीनसोबत असलेले वेगवेगळे डायलॉगहे अनेकांचे इंटरटेन्मेंट करणारे होते. शिवाय यामधून जोडप्यांनाही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. त्यामुळेच या चित्रपटाचा बझ हा काही काळ तसाच राहिला. आता पहिल्या चित्रपटात इतके बोल्ड सीन आणि डायलॉग पाहिल्यानंतर या चित्रपटातही असे काही असू शकेल अशी अपेक्षा अनेकांना लागून राहिली आहे. 

प्रशमेशसोबत होईल धमाल

प्रथमेश परब ज्या चित्रपटात असतो त्या चित्रपटात धमाल होणे अत्यंत स्वाभाविक आहे.पण आता या चित्रपटात त्याची नेमकी कोणती भूमिका असणार आहे या संदर्भात कोणतीही माहिती नसली तरी देखील हा चित्रपट कॉलेजच्या धमाल जीवनावर आधारीत असणार आहे. जो पाहताना हास्याचे फवारे उडतील यात काहीही शंका नाही. 

ADVERTISEMENT

पण सध्या काही दिवस आपल्याला या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहावी लागणार आहे. पण हे नक्की की, या चित्रपटाचे प्रमोशनही अत्यंत वेगळ्या पद्धतीने होणार आहे. 

15 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT