आपल्या फॅशनमुळे कायमच चर्चेत असलेली उर्फी जावेद आता नको त्या वादातही अडकू लागली आहे. काही दिवसांपूर्वी तिने कॅश्मिरा शहाबद्दल असे काही वक्तव्य केले की, अनेकांना उर्फीचे ते रुप अधिक रुक्ष वाटले आहे. हे प्रकरण इथेच थांबेल असे वाटत नाही. कारण उर्फीने कॅश्मिराबद्दल जे काही म्हटले त्यामुळे कॅश्मिरा गप्प बसेल असे काही वाटत नाही. सेलिब्रिटींमध्ये अशा कॅट फाईट सुरुच असतात. आता या दोघांधील तू तू मै मै कोणते रुप घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण उर्फी आणि कॅश्मिरामध्ये नेमकं झालं तरी काय जाणून घेऊया
उर्फी आणि कॅश्मिरामध्ये वाद
काही दिवसांपूर्वी उर्फी डिझायनर फराह खान अली ( Farah Khan Ali) हिच्या एका शो साठी गेली होती. त्यावेळी तेथील सिक्युरिटी आणि इतर लोकांनी तिला ओळखले नाही. तिला फोटो काढण्यासाठी अडवण्यात आले. पापाराझी ज्यावेळी तिचे फोटो काढत होते. त्यावेळी तेथील सुरक्षारक्षकाने तुम्हाला परवानगी कोणी दिली? असा प्रश्न केला. ज्यामुळे उर्फी फारच चिडली. तिच्या म्हणण्यानुसार तिला या कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले होते.असे असताना सगळ्या मीडियासमोर तिचा अपमान होणे हे चांगले नाही. त्यामुळे चिडलेल्या उर्फीने तेथून जाणे पसंत केले. यानंतर ज्यावेळी कॅश्मिरा शहाने या विषयी आपले मत मांडले त्यात ती म्हणाली की, उर्फी इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. पण प्रत्यक्षात तिला कोणीही ओळखत नाही. ती एअरपोर्टवर नुसती जाते.पण तिने तिकीट काढून विमानतळाच्या आतही जायला हवे.
त्यावर चिडलेल्या उर्फीने उत्तर देताना म्हटले की, विधान करताना काही तरी विचार करुन बोलायला हवे. म्हणजे मी इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. खऱ्या आयुष्यात नाही. पण तुम्ही तर दोन्ही ठिकाणी प्रसिद्ध नाही. कॅश्मिरा जी फराहची …. या पुढे तिने न लिहता येण्यासारखी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये तिने आपली पातळी ओलांडली आहे.
तिच्या फॅशनवरुन लिहिल्याचा राग
उर्फीची फॅशन ही तिची ओळख आहे.पण त्यात नावीण्य असे नाही. तर ती काही तरी फाडून काहीतरी नवे बनवते. काही काळासाठी ही क्रिएटिव्हिटी चांगली वाटली पण आता याचा वीट येऊ लागला आहे. कारण तिने याप केलेले कपडे हे अश्लील असतात. तिच्या अशा कपड्यांमुळे ती कायम ट्रोल होते. तिला तिच्या कपड्यांवरुन ज्यावेळी विचारणा करण्यात आली त्यावेळीही तिने अशीच विचित्र प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, तुम्ही माझ्या ब्रा चड्डीकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या चड्ड्या बघा. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. पण तरीही उर्फीने आपली फॅशन काही सोडलेली नाही. ती आजही तिला हव्या त्या कपड्यात अनेकदा वावरताना दिसते.
मीडियावर काढला राग
उर्फीच्या म्हणण्यानुसार मीडिया तिची इमेज खराब करत आहे. तिच्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या जातात. तिच्या फॅशनला वल्गर म्हटले जाते. त्यामुळे तिच्याबद्दल असे लिहू नये असा सज्जड दम तिने लोकांना भरला होता. उर्फीतिचे असे कपडे हे कुठेही घालते त्यामुळे तिच्यावर टीका होतात हे तिला बहुधा समजत नसावे. अनेकांना तिच्या याच फॅशनचा वीट आला असावा.
आता ही नवी कॅट फाईट कुठे जाईल आणि यामध्ये कोण कोण उडी घेईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.