ADVERTISEMENT
home / मनोरंजन
उर्फीचा नवा गोणपाट ड्रेस

आधी फोटो मग काच आणि आता गोणपाट, उर्फीचा नवा लुक पाहाच

 सध्या उर्फी जावेद (Urfi Javed) ही सतत चर्चेत असते. याचे कारण तिची अतरंगी अशी फॅशन आहे. ती रोज रोज वेगळ्या वेगळ्या फॅशनमध्ये कायम दिसत असते. आता उर्फी चक्क गोणपाट घालून फिरताना दिसली आहे. थांबा थांबा लगेच विचार करु नका. उर्फी कायमच तिच्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांपासून काहीतरी क्रिएटिव्ह अशा गोष्टी तयार करत असते. आता तिने चक्क गोणपाटापासून आपल्याला स्कर्ट आणि ब्लाऊज तयार केला आहे. त्याचे फोटोही तिने शेअर केले आहेत. चला आता बघूया उर्फीचा हा नवा ड्रेस

उर्फीचा नवा ड्रेस

उर्फी अनेक ट्रान्झिशन व्हिडिओ बनवत असते. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या गोष्टींपासून कपडे बनवते. आधी ता जुन्या टिशर्टपासून हॉट ड्रेस बनवायची. पण आता ती वेगवेगळ्या गोष्टी वापरुन नवी फॅशन करताना दिसते. आता तिने चक्क गोणपाटापासून स्वत: ला ड्रेस बनवला आहे. हा ड्रेसही खूप काही चांगला आहे असे काही सांगता येणार नाही. कारण हे कपडे म्हणजे तिने ठिगळ लावल्यासारखी आहेत. यात तिने गोणपाटापासून असा चॉप तयार केला आहे ज्यामध्ये तिचे अंग दिसत आहे. इतकेच नाही तर तिचा स्कर्ट हा देखील बॉडी शो ऑफ करणारा आहे. आता तिच्या अशा फॅशनला कंटाळणाऱ्यांनी तिला वाईट कमेंट केल्या आहेत तर तिची फॅशन आवडणाऱ्यांनी तिची तारीफ करत तिच्या या ड्रेसची वाहवा केली आहे. 

एअरपोर्टवरुन झाली ट्रोल

उर्फी सतत एअरपोर्टवर दिसत असते.तिच्या या सतत एअरपोर्टवर दिसण्यावरुन तिला सारखे ट्रोल केले जात होते. ती रोज काय करते हे अनेक जण तिला विचारत होते. कॅश्मीरा शहाने हे विचारल्यावर तिची कॅट फाईटही झाली होती. पण तिने या प्रश्नाचे चांगलेच उत्तर दिले आहे. तिने सांगितले की, एअरपोर्टवर माणूस उगाच का जाईल. माझे दिल्ली, जयपूर, चंदीगढ असे सतत जाणे असते. त्यामुळे विमानप्रवास करावा लागतो. सगळीकडे बस आणि गाड्यांनी जाणे शक्य नसते. त्यामुळे मी विमान प्रवास करते त्यात इतके काय? माझ्या एअरपोर्टवर दिसण्यामध्ये इतरांना इतके काही का वाटायला हवे?

वेगवेगळे कपडे घालून केलेत प्रयोग

उर्फी कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते. ती सतत काही ना काही वेगळे प्रयोग करते. कधी  फोटोचा ड्रेस, कधी काचेचा ड्रेस, कधी नुसत्या रस्सी, कधी चैन ती कधी काय करेल याचा काहीही नेम नसतो. कोणी कितीही ट्रोल केले तरी देखील ती प्रयोग करणे काही कमी करत नाही. त्यामुळे तिचे प्रयोग हे चालूच असतात. राखी सावंतनंतर जिची सतत चर्चा होत असते ती आहे उर्फी जावेद. 

ADVERTISEMENT

बिग बॉसमुळे मिळाली प्रसिद्धी

उर्फीला बिग बॉसमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती या शोच्या ओटीटी व्हर्जनमध्ये आली होती. त्यामुळे ती अनेकांना काय आहे ते कळली. या आधी ती लॉकडाऊनमध्ये अशा पद्धतीने कपडे बनवण्यावरुनच प्रसिद्ध झाली होती. 

आता उर्फीचा हा नवा लुक तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

06 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT