ADVERTISEMENT
home / मनोरंजन
उर्फी जावेद आत्महत्येची अफवा

उर्फी जावेदच्या आत्महत्येची अफवा, अभिनेत्रीही चक्रावली

सध्याच्या काळात उर्फी ये सिर्फ नाम ही काफी है… उर्फी जावेद ( Urfi Javed) आणि तिच्या फॅशननी अनेकांना वेड लावलंय. आता वेड चांगल्या अर्थाने नव्हे बरं का! तिच्या हटके स्टाईलमुळे खूप जणांना डोक्यावर हात मारायची वेळ अनेकदा येते. कधी काचेचा ड्रेस, कधी कँडी फ्लॉसचा ड्रेस, कधी काय तर कधी काय? पण आता एका बातमीने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. ती म्हणजे उर्फीच्या आत्महत्येने(Urfi Javed Suicide). त्याचा एक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इतकेच काय अभिनेत्रीला आपल्याच मृत्यूची बातमी वाचून असा काय धक्का बसला की, तिने देखील ही बातमी तिच्या स्टोरीवर शेअर केली आहे.

तर झालं असं?

आतापर्यंत तुम्ही पाहिलं आहे की, उर्फी वेगवेगळे कपडे ट्राय करत असते. तिने पुन्हा एकदा तिचा चैन असलेला ड्रेस घातला होता आता ड्रेस पाहिला तर यामध्ये तिच्या गळ्यात अनेक चैनचा गुंता दिसत आहे. तिने हा ड्रेस ज्यावेळी काढला. त्यावेळी ऑक्सडाईज चेनच्या वजनाने तिच्या मानेवर त्याचे बरेच डाग आले होते. ज्यांनी तिची बातमी केली त्याने सरळ तिने आत्महत्या केली असे सांगत तिच्या मानेचा फोटो शेअर केला. आता सोशल मीडियावर एखादी बातमी आली की, ती वाऱ्यासारखी पसरते. मध्यंतरीच्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक आत्महत्यांच्या बातम्यांनी खळबळ माजवली होती. आता ही नवी आत्महत्या असू शकते. असे मानून खूप जणांनी त्या पोस्टवर कमेंट केली. उर्फीला ज्यावेळी ही बातमी दिसली. त्यावेळी तिने स्क्रिनशॉट घेऊन तिने हे खोटे असल्याचे सांगितले. 

उर्फी आणि एअरपोर्ट

उर्फीच्या आयुष्यात अनेक गोष्टींची कॉन्ट्राव्हर्सीज सतत होत असतात. तिच्या संदर्भातील एक कॉन्ट्राव्हर्सी म्हणजे एअरपोर्ट. दर दोन दिवसांनी उर्फी ही एअरपोर्टवर स्पॉट होते. कोणत्याही इतर मोठ्या कलाकारांपेक्षाही तिचे एअरपोर्टवर जाणे थोडे जास्तीच आहे. रोज एअरपोर्टवर काय करते? असा प्रश्न तिला आतापर्यत खूप जणांना विचारला आहे. त्यावर तिने उत्तरही दिले होते. पण तिने दिलेले उत्तर अजून कोणालाही रुचले नसावे. म्हणूनच की काय उर्फीने आता एका रिलच्या माध्यमातून हे उत्तर दिले आहे. ती कामानिमित्तच एअरपोर्टवर जाते असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ट्रोलर्सना उत्तर मिळाले असावे अशी अपेक्षा आहे. 

नेहमी होते ट्रोल

उर्फी जितकी सोशल मीडियावर दिसते. तितकी ती नेहमी ट्रोल होत असते. तिचा फॅशन सेन्स हा फारसा कोणाला रुचत नाही असेच दिसते. फॅशन आणि अंगप्रदर्शन यातील फरक उर्फीला कळत नाही. असे अनेक ट्रोलर्सचे मत असते. शिवाय सातत्याने इतके ट्रोल करुनही उर्फी काही ते कमी करत नाही याचे आश्चर्यही अनेकांना वाटते. पण त्याबाबतीत उर्फीला मानायला हवे. कारण कोणचीही तमा न बाळगता कोणतीही पब्लिसिटी ही चांगलीच असे म्हणत ती वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसते. 

ADVERTISEMENT

तिने या काळात खूप जणांची दुश्मनीदेखील घेतली आहे. कॅश्मिरा शहासोबतची तिची कॅट फाईट खूप जणांना परिचयाची झाली आहे. 

दरम्यान, या चुकीच्या अफवेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला नक्की कळवा.

04 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT