ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
CC क्रिम लावण्याची योग्य पद्धत आणि फायदे

CC क्रिम लावण्याची योग्य पद्धत आणि फायदे

बऱ्याच जणांना CC Cream (सीसी क्रिम) आणि BB Cream म्हणजे नक्की काय हेच माहीत नसतं. वास्तविक सीसी क्रिम हा शब्द Blemish Balm Cream या ब्युटीवरून ठेवण्यात आला आहे. सीसी क्रिमचा उपयोग हा बऱ्याच ब्रँड्सद्वारे कलर कंट्रोल क्रिम अथवा कलर करेक्टिंग क्रिम यासाठी करण्यात येतो. त्यामुळेच त्याला सीसी असं म्हटलं जातं. काही ब्रँड याचा उपयोग त्वचेवरील लालिमा अथवा अति कोमलता कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या टोनमध्ये सुधारणा आणण्यासाठी केला जातो. ज्यांची अगदीच मेकअपमध्ये सुरूवात आहे त्यांच्यासाठी ही खास माहिती. सीसी क्रिम नक्की काय असतं आणि सीसी क्रिमचा वापर कसा करायचा याबाबत जाणून घेऊया. 

तुमच्या त्वचेसाठी बेस्ट आहेत या बीबी क्रीम (Best BB Cream For Skin In Marathi)

चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी योग्य

सीसी क्रिम हे चेहऱ्याला जास्त कव्हरेज प्रदान  करते. तसंच आपल्या चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी आणि चेहरा अधिक लालसर असेल तर तो लालपणा कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. सीसी क्रिम हे विशेषतः मॅच्युअर आणि  वाढत्या वयाच्या त्वचेसाठी तयार करण्यात येते. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी कोणतेही वेगळे करेक्टर वापरण्यापेक्षा तुम्ही कलर कलेक्टर अथवा कव्हरेज या दोन्हीसाठी सीसी क्रिमचा वापर करून घेऊ शकता. याचा तुम्हाला फायदा मिळतो. सीसी क्रिममध्ये एपीएफ असल्याने हे सूर्याच्या किरणांपासूनही तुमची सुरक्षा करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच तुमची त्वचा अधिक उजळविण्यासाठीही याचा उपयोग होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे अत्यंत हलके असून चेहऱ्यावर लगेच शोषून घेतले जाते. त्यामुळे चेहरा खराब दिसत नाही. ज्या व्यक्तींची त्वचा तेलकट आहे त्यांनी सीसी क्रिम वापरावेच. तर ज्यांची त्वचा नॉर्मल आणि कॉम्बिनेशन अशी आहे तेदेखील याचा वापर करून घेऊ शकता. पण याचा सर्वात जास्त फायदा हा तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना मिळतो. चेहऱ्यावर सतत येणारे तेल दिसत नाही. त्यामुळे याचा वापर करावा.

जाणून घ्या महागड्या मेकअप प्रोडक्टसाठी बजेट फ्रेंडली पर्याय (Best Makeup Dupes In Marathi)

ADVERTISEMENT

सीसी क्रिम लावण्याची पद्धत (How to use CC Cream)

सीसी क्रिम घेतलं आणि चेहऱ्याला लावलं असं होत नाही. त्याची लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि तुम्ही त्याच पद्धतीने सीसी क्रिम  लावलंत तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. 

  • सर्वात पहिले सीसी क्रिम चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा 
  • त्यावर मॉईस्चराईजर लावा 
  • आता तुमच्या चेहऱ्यावर जिथे काळे डाग असतील तिथे सीसी क्रिमचे डॉट्स लावा
  • हे डॉट्स तुम्ही ब्युटी ब्लेंडरने अथवा हाताच्या  बोटांनी नीट पसरवा
  • एका विशिष्ट गतीमध्ये नीट ब्लेंड करून घ्या 
  • योग्य प्रमाणात सीसी क्रिम घ्या. अधिक प्रमाणात घेतल्यास चेहरा खराब दिसेल. त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या कव्हरेजनुसार याचा उपयोग करा 

मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम्स, वापरून समस्या करा दूर (Best Creams For Pimples In Marathi)

सीसी क्रिमचे फायदे (Benefits of CC Cream)

  • आपल्या त्वचेचा स्किन टोन उजळविण्यासाठी सीसी क्रिमचा फायदा  होतो 
  • मुरूमं असतील तरत सीसी क्रिम लावणे अत्यंत चांगले
  • सीसी क्रिम त्वचेला अधिक मऊ आणि चमकदार बनविण्यासाठी उपयोगी ठरते 
  • तुमची त्वचा सतत कोरडी असेल आणि लालसर असेल तर त्यापासून वाचण्यासाठी सीसी क्रिम हा उत्तम पर्याय आहे. कोरडेपणा आणि लालसरपणा नष्ट करण्यासाठी सीसी क्रिम तुम्हाला मदत करते आणि तुम्हाला फ्लॉलेस त्वचा मिळते
    याचा वापर करून त्वचेमध्ये उजळपणा येतो 
  • सीसी क्रिम उन्हापासूनही त्वचेचे संरक्षण करते

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT