Advertisement

DIY सौंदर्य

शीट मास्कचा त्वचेसाठी होतो हा महत्त्वाचा फायदा, जाणून घ्या

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 15, 2021
sheet mask

Advertisement

आजकाल ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा मुलींमध्ये शीट मास्कचा (Sheet Mask) वापर करून सौंदर्यात भर घालण्याची पद्धत जास्त ट्रेंडिंग असल्याचे दिसून येत आहे. शीट मास्क हा कोरियन ब्युटी स्किन केअर रूटिनचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा घरच्या घरी मिळते. वास्तविक शीट मास्कचा फायदा आता दुनियाभरातील महिला करून घेत आहेत. हा मास्क काही मिनिट्समध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक आणतो आणि तुमचा चेहरा अधिक चमकदार दिसतो. कोणत्याही पार्टीसाठी जाताना आता तासनतास ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. शीट मास्कचा त्वचेसाठी महत्त्वाचा फायदा (Benefits of Sheet Mask for skin) होतो. याचा कसा वापर करायचा हे घ्या जाणून.

शीट मास्क म्हणजे काय? (What is the Sheet Mask)

शीट मास्क म्हणजे कॉटनचा एक पातळ आणि मुलायम असा कपडा असतो. ज्यावर नाक, डोळे आणि चेहऱ्याचा आकार काढण्यात आलेला असतो. हा कपडा वेगवेगळ्या घटकांनी भिजलेला असतो आणि मग त्याचा वापर चेहऱ्यावर काही मिनिट्स ठेऊन करण्यात येतो. हा वापरणे इतके सोपे आहे की, तुम्हाला घरच्या घरी काम करता करतादेखील याचा वापर करता येतो. आपल्या त्वचेच्या टाईपनुसार आणि त्वचेची काय समस्या आहे हे जाणून घेतल्यानुसार तुम्ही तुमच्या त्वचेसाठी हा मास्क वापरू शकता. यामध्ये वेगवेगळे घटक असतात. उदा. संत्र, स्ट्रॉबेरी, लिची, कोरफड. यापैकी तुमच्या त्वचेसाठी कोणता उपयुक्त मास्क ठरतो ते पाहून तुम्ही वापर करा. साधारण चेहऱ्यावर 15-20 मिनिट्स हा मास्क ठेवल्याने चेहऱ्यात फरक पडतो. तीन महत्त्वाच्या शीट मास्कबद्दल घेऊया जाणून. 

त्वचा मुलायम ठेवण्यासाठी हनी सिट्रस मास्क (Honey Citrus Sheet Mask)

मध आणि विटामिन सी च्या मिश्रणाने तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि याशिवाय त्वचेला आतून मुलायमपणा मिळतो. चेहऱ्यावरील मुरूमांसाठीही मधाचा वापर योग्य आहे. हा मास्क लावल्याने तुमच्या चेहऱ्याच्या कोरडेपणाची समस्या दूर होते. 

हनी सिट्रस मास्कसाठी साहित्य

  • 3 चमचे ताज्या संत्र्याचा काढलेला रस 
  • अर्धा चमचा मध 
  • मुलायम सुती कपडा अथवा मुसलीन फेस क्लॉथ 

बनविण्याची पद्धत 

एका बाऊलमध्ये संत्र्याचा रस आणि मध मिक्स करून घ्या. आता यामध्ये मलमलचा कपडा भिजवा आणि तो तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण कव्हर करून घ्या. त्यानंतर मास्क साधारण अर्धा तास चेहऱ्यावर तसाच ठेवा. नंतर मास्क काढा आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुम्हाला अधिक चमकदार त्वचा मिळते. 

निस्तेज त्वचेसाठी गुलाबपाणी आणि लव्हेंडर ऑईल मास्क (Rosewater and Lavender Oil Sheet Mask)

गुलाबपाणी हे एक उत्तम टोनर आहे. ओपन पोर्सना बंद करण्याचे काम यामुळे चांगले होते. तसंच यामध्ये असणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुण त्वचेची जळजळ शांत करते. तर लवेंडर ऑईल निस्तेज त्वचा पुन्हा एकदा चमकदार बनवून त्याची चमक वाढविण्यास मदत करते. 

गुलाबपाणी आणि लवेंडर ऑईल मास्क बनविण्याचे साहित्य 

  • 3 चमचे गुलाबपाणी 
  • 2 थेंब लवेंडर ऑईल
  • मलमलचा कपडा 

बनविण्याची पद्धत 

एका भांड्यात गुलाब पाणी आणि लवेंडर ऑईल मिक्स करून घ्या आणि त्यात मलमलचा कपडा भिजवा. आता या कपड्याचा चेहऱ्यावर 20 मिनिट्स ठेऊन वापर करा. मध्येमध्ये तुम्ही हा कपडा हाताने चेहऱ्यावर थापायला विसरू नका. मास्क काढल्यावर चेहरा हाताने थपथपवून सुकवून घ्या 

त्वचा तरूण दिसण्यासाठी काकडी, लिंबू आणि पुदीना मास्क (Cucumber, Lime and Mint Sheet Mask)

त्वचेची काळजी घेण्यासाठी करा काकडीचा रात्री झोपण्यापूर्वी वापर

काकडी ही वाढते वय रोखण्यासाठी नेहमीच मदत करते. त्वचेची काळजी घेण्यासाठी काकडीचा वापर करण्यात येतो. यामधील विटामिन सी आणि कॅफिक अॅसिड हे सुरकुत्या आणि सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. तसंच यातील अँटिऑक्सिडंटदेखील त्वचेला तरूण ठेवायचे काम करते. लिंबामध्ये विटामिन सी असल्याने त्वचेवरील ब्लॅकहेड्स काढून त्वचेला अधिक चमक देण्याचे काम करते. 

काकडी, लिंबू, पुदीना मास्क बनविण्याचे साहित्य 

  • 2-3 चमचे काकडीचा रस 
  • 2 चमचे पुदीना अथवा पेपरमिंट इसेन्शियल ऑईल 
  • अर्धा चमचा लिंबाचा रस 
  • मलमलचा कपडा 

बनविण्याची पद्धत 

एका भांड्यात काकडीचा रस, इसेन्शियल ऑईल आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि त्यात मलमलचा कपडा थोडा वेळ भिजवून ठेवा. त्यानंतर कपडा घ्या आणि चेहऱ्यावर 15-20 मिनिट्स मास्क लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. मास्क काढल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. 

महत्त्वाची सूचना – या सर्व पद्धतीने कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या ठीक होणार नाही. या शीट मास्कमुळे तुमच्या त्वचेचा थकवा निघून जाईल आणि चमकदार त्वचा मिळण्यासाठी मदत मिळेल. तुम्हाला कोणत्याही तऱ्हेची अलर्जी असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक