ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
homemade rose aloe vera gel

उन्हाळ्यात त्वचेला गारवा देण्यासाठी लावा हे होममेड ऍलो-रोझ जेल

आता उन्हाळा आला आहे आणि त्यासोबतच त्वचेशी संबंधित समस्या होण्याचा हा ऋतू आहे.उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेला ऊन, धूळ आणि घामाचा त्रास होतो. त्यामुळे आपल्या त्वचेची चमक हरवते.  सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी गुलाब पाणी उपयुक्त आहे. गुलाबाची फुले ही केवळ त्यांच्या सुंदर व सेन्शुअल सुगंधासाठी ओळखली जात नाहीत तर स्किनकेअर रुटीनमध्येही देखील वापरली जातात कारण त्यांच्यात त्वचेसाठी पौष्टिक असे घटक असतात. याशिवाय कोरफडीमध्ये असलेले हीलिंग आणि सुखदायक गुणधर्म देखील उन्हाचा त्रास कमी करण्यास मदत करतात.आपण गुलाबाच्या पाकळ्या व कोरफडीचा गर वापरून घरच्या घरी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असे जेल किंवा फेसपॅक देखील बनवू शकतो. हे घरगुती सुखदायक जेल त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो आणण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे ताजे गुलाब आणि कोरफड जेल मुरुम, डाग दूर करण्यासाठी, त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी, त्वचा स्वच्छ आणि टवटवीत ठेवण्यासाठी व काळी वर्तुळे आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी आणि त्वचेचे पीएच संतुलन राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. 

रोझ ऍलो जेल कसे बनवावे 

Homemade Rose-Aloe Vera Gel
Homemade Rose-Aloe Vera Gel

रोझ व ऍलोवेरा जेल बनवण्यासाठी तुम्हाला ताज्या गुलाबाच्या पाकळ्या , गुलाब पाणी , कोरफड जेल,बदाम तेल हे साहित्य लागेल. जेल बनवण्यासाठी ताज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या घ्या, व त्या स्वच्छ पाण्यात धुवा. यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात काढा. त्यात तीन चमचे गुलाबजल टाकून हे मिश्रण बारीक करून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. एक चमचा कोरफड जेल आणि एक छोटा चमचा बदाम तेल घ्या व ते नीट ढवळून घ्या. नंतर त्यात हळूहळू गुलाबाच्या पाकळ्यांचा रस टाका, त्यात कमीतकमी इतका रस घाला की तो द्रव स्वरूपात येईल. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यानंतर हे जेल लावा. हे जेल काही दिवस ते वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक जाणवेल. हे जेल एका छोट्या काचेच्या बरणीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवता येते, बाहेर ठेवल्यास ते बाहेरच्या उष्णतेमुळे खराब होऊ शकते. हे 1 आठवड्यापर्यंत टिकू शकते पण जर तुम्हाला ते जास्त काळ साठवायचे असेल, तर जेल आईस क्यूब ट्रेमध्ये गोठवा आणि तुम्हाला हवे तेव्हा त्या बर्फाचा खडा चेहेऱ्याला लावू शकता. 

रोझ – ऍलो जेल कसे वापरावे

Homemade Rose-Aloe Vera Gel
Homemade Rose-Aloe Vera Gel

आपल्या तळहातावर पुरेसे जेल घ्या आणि त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी दररोज याचा वापर करा. हे सुदींग इफेक्ट देणारे रोझ जेल तुमच्या त्वचेला टवटवीत करेल आणि ती चमकदार होण्यास मदत करेल. तेलकट आणि मुरुम-प्रवण त्वचेसाठी याचा वापर करा. हे जेल संवेदनशील त्वचेसाठी देखील योग्य आहे. कोरफड त्वचेला मऊ ठेवते आणि मॉइश्चराइझ करते, गुलाबाच्या पाकळ्या त्वचेवर फोड किंवा पुरळ असल्यास त्वचेला आराम देतात. कोरफड आणि गुलाबासोबत जर यात तुम्ही बदामाच्या तेलाऐवजी सॅन्डलवूड इसेन्शियल ऑइल घातले तर त्यामुळे त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या,डाग यांसारख्या अकाली वृद्धत्वाच्या खुणा कमी होतात आणि निस्तेज त्वचा पुन्हा टवटवीत होते.

तर उन्हाळ्यात त्रासलेल्या त्वचेसाठी हे जेल लावा व त्वचेची काळजी घ्या.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT