ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
lemongrass-for-pimple-problem

एका रात्रीत होतील अॅक्ने गायब, वापरा ही वनस्पती

आजकाल खराब लाईफस्टाईलमुळे महिला असो वा पुरूष असो सर्वांनाच केस आणि त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेवणाच्या चुकीच्या वेळा, सततची जागरणे यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक निघून जाते. खराब सवयींचा परिणाम आपल्या केसांवर ज्याप्रमाणे होतो त्याचप्रमाणे त्वचेवरही होतो. तुम्हीही त्वचेच्या समस्यांनी विशेषतः चेहऱ्यावर येणाऱ्या अॅक्ने अर्थात मुरूमांनी त्रस्त असाल तर तुमच्यासाठी लेमनग्रास (Lemongrass) एक वरदान ठरू शकते. लेमनग्रासच्या मदतीने तुम्ही निस्तेज केस आणि त्वचा दुरूस्त करू शकता. त्वचेला अधिक आरोग्यदायी बनविण्यासाठी लेमनग्रासचा उपयोग करून घेता येतो. याचा नक्की कसा फायदा करून घ्यायचा आणि याचा योग्य वापर कसा करायचा ते या लेखातून जाणून घेऊया. 

अॅक्नेची समस्या अनेक महिलांना असते. पण लेमनग्रासचा वापर ही समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अॅक्ने होऊन गेल्यानंतर चेहऱ्यावर जिद्दी आणि गडद डाग राहतात. तुम्हाला डागविरहीत आणि अॅक्नेमुक्त त्वचा हवी असेल तर तुम्ही लेमनग्रासचा वापर करून पाहा. तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम पाहायला मिळेल. अॅक्नेपासून सुटका हवी असेल तर तुम्ही लेमनग्रास ऑईल (Lemongrass Oil), मध आणि ओटमीलचा वापर करा. त्यानंतर या तिन्ही गोष्टी एकत्र करून याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही याचा वापर करा. हा फेसमास्क वापरल्याने काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्ने निघून जाण्यासाठी मदत मिळते. 

मुरूमांसाठी लेमनग्रास आईस क्यूब (Lemongrass Icecube for Pimples)

मुरूमांपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही लेमनग्रासचा आईस क्यूबप्रमाणे वापर करू शकता. लेमनग्रास आईस क्यूब बनविण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम पाण्यात लेमनग्रास उकळून घ्या. यानंतर जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा आईस ट्रे मध्ये भरून फ्रिजमध्ये भरून ठेवा. जेव्हा आईस क्यूब तयार होतील तेव्हा चेहऱ्याला लावा. आठवड्यातून दोन ते तीन दिवस आईस क्यूब चेहऱ्यावर वापरा. काही वेळानंतर मुरूमांची समस्या निघून जाईल. 

तेलकट स्काल्पसाठी लेमनग्रास (Lemongrass for oily scalp)

तेलकट स्काल्पमुळे केसांमध्ये अनेक समस्या दिसून येतात. पण हेच तेल चेहऱ्यावरही उतरते. त्यामुळे ही समस्या वेळीच सोडवायला हवी. लेमनग्रासचा वापर करून अधिक तेल कमी करता येते. केसांमधील तेल कमी करण्यासाठी लेमनग्रासच्या पाण्याने केस धुवा. लेमनग्रास घालून पाणी उकळून घ्या आणि हे पाणी थंड करून याने आंघोळ करा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही या पाण्याचा वापर करून केस धुवा आणि चेहऱ्यालाही पाणी लागू द्या. यामुळे स्काल्पची समस्या सुटते आणि चेहऱ्यावरील पिंपल्सही कमी होतात. 

ADVERTISEMENT

नारळाचे तेल आणि लेमनग्रास हेअर ऑईल (Coconut oil and Lemongrass Oil) 

6-10 महिला आणि पुरूष हे कोंड्यांच्या समस्येने हैराण आहेत. कोंड्याची समस्या ही खूपच सामान्य आहे. पण कोंडा हा केसांची वाढ होण्यामध्ये बाधा आणतो. यापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही लेमनग्रासचा वापर करा. याच कोंड्यामुळे काही जणांना अलर्जी होऊन त्वचेच्या समस्यादेखील उद्धभवतात. त्यामुळे तुम्ही असा त्रास असेल तर एका बाऊलमध्ये गरम नारळाचे तेल घ्या. या तेलात लेमनग्रास मिक्स करा. तेल थंड झाल्यावर गाळून घ्या. आठवड्यातून दोन वेळा या तेलाने केसांना मसाज करा. 

अॅक्नेची अथवा केसांची समस्या असल्यास तुम्ही लेमनग्रासचा इतक्या सोप्या पद्धतीने वापर करून घेऊ शकता. आम्ही याचा दावा करत नाही. मात्र तुम्हाला हवं तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT