ADVERTISEMENT
home / सौंदर्य
मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई (How To Use Amla, Reetha And Shikakai For Hair)

मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई (How To Use Amla, Reetha And Shikakai For Hair)

सुंदर आणि चमकदार केस कोणाला आवडत नाहीत. प्रत्येक मुलीसाठी तिचा चेहरा जितका महत्त्वाचा असतो तितकेच तिच्यासाठी केसही महत्त्वाचे असते. त्यामुळेच आपण आपल्या केसांसाठी सर्वोत्कृष्ट उत्पादन वापरत असतो. तसं तर बाजारात अनेक शँपू आणि तेल उपलब्ध आहेत. ते प्रत्येक उत्पादन तुमच्या केसांना योग्य काळजी देण्याचा दावा करत असतात. पण आपल्याला सर्वांनाच हे माहीत आहे की, या सर्व उत्पादनांमध्ये भयानक रसायन असतात. आपल्या केसांसाठी सतत हे रसायन नक्कीच चांगलं नसतं. पण तरीही आपण याचा उपयोग करतो. आपल्या घरामध्ये अशा अनेक गोष्टी उपलब्ध असतात, जे अशा रसायनांपासून आपला बचाव करतात. शिवाय या वस्तू आपले केस अधिक सुंदर आणि चमकदार बनवतात. आवळा, रीठा आणि शिकाकाई या तिन्ही नैसर्गिक वस्तू आहेत, ज्यामुळे आपले केस अधिक सुंदर, चमकदार आणि घनदाट होतात. या तिन्ही वस्तू केसांसाठी अतिशय चांगल्या आणि योग्य आहेत. आपण आतापर्यंत याचे उपयोग वाचत आलो आहोत. पण त्याचा उपयोग केसांसाठी खूपच चांगला असतो.

Hair Care with Ritha amla shikakai 1

 

आवळा, रीठा आणि शिकाकाईचे गुण (Properties of Amla, Reetha and Shikakai in Marathi)

हे तीन हर्बल फळ जेव्हा आपण एकत्र मिसळतो तेव्हा आपल्या केसांवर एक जादू होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे तिन्ही पदार्थ आपल्या केसांवर खूप चांगला परिणाम करतात आणि सर्व खतरनाक बाह्य पदार्थांपासून आपलं संरक्षण करतात. या तिन्ही गोष्टींंचे बरेच लाभ आहेत. जाणून घेऊया काय फायदे आहेत या तिन्ही फळांचे.

ADVERTISEMENT

वाचा – #DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

आवळा (Amla)

amla
आवळ्याला इंग्रजीमध्ये गुजबेरी असं म्हटलं जातं. यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतं. खराब झालेले केस आणि मूळ या दोन्ही गोष्टींवर याचा चांगला परिणाम होत असतो. आवळा नियमित आणि रोज आपल्या केसांवर वापरल्यास, पुढे तुमचे केस खराब होण्यापासून वाचतात. आपण आपल्या केसांची मूळापासून काळजी घ्यायला हवी हे खरं आहे. कारण त्यामुळे केसवाढ आणि केस सफेद होण्याचं हे मूळ कारण असतं. केसगळती आणि टक्कल पडण्यापासून थांबवण्यासाठी आवळा हे फळ सर्वात जास्त उपयोगी आहे.  

रीठा (Reetha)

Hair Care with Ritha amla shikakai 2
रीठा म्हणजे सोपनट. रीठा तुमच्या केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे. केसांना निरोगी राखण्यासाठी रीठा अत्यंत महत्त्वाचं आहे. हे एक उत्तम क्लिन्झिंग म्हणूनदेखील काम करतं आणि संक्रमण करणाऱ्या मायक्रो ऑर्गेनिझमसुद्धा दूर करतं. शिवाय रीठा वापरल्यामुळे स्कॅल्पदेखील निरोगी राहतं. रीठा हा अगदी अनादी काळापासून उत्कृष्ट पर्याय आहे.

शिकाकाई (Shikakai)

Hair Care with Ritha amla shikakai 3
शिकाकाईला एकेसिया कोन्सिना असं म्हटलं जातं. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे तुमचे केस अत्यंत चांगले राहतात. शिकाकाई नैसर्गिकरित्या पीएच मूल्य कमी करून केसांमधील नैसर्गिक तेल योग्य प्रमाणात राखून ठेवतं आणि केस चमकदार करतं. केसांना मजबूत करण्यासाठी आणि कंडिशनर म्हणून शिकाकाई अत्यंत प्रभावी आहे.

ADVERTISEMENT

वाचा – पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

आवळा, रीठा आणि शिकाकाईचा उपयोग केसांवर कसा करावा (How to Use Amla, Reetha and Shikakai For Hair in Marathi)

आवळा, रीठा आणि शिकाकाई हे एक – दुसऱ्यांबरोबर अत्यंत चांगलं काम करतं. या दोन गोष्टी जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा केस चमकदार आणि निरोगी होतात. या तिनही वस्तू केसांसाठी उत्कृष्ट असून केसांना फुटलेले फाटे, केसगळते, केस पांढरे होणं यासारख्या केसांच्या समस्यांवरील एकमेव उपाय आहे. यांचा वापर केल्यानंतर केसांशी निगडीत या समस्या नक्कीच नष्ट होतात.

Hair Care 4

हेअर शँपू (Hair Shampoo)

आवळा, रीठा आणि शिकाकाईचा योग्य प्रयोग हा त्याचा शँपू बनवण्यासाठी करण्यात येतो. त्यासाठी 5- 6 रीठा, 6-7 शिकाकाई आणि काही आवळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण गरम करा आणि उकळायला लागल्यानंतर गॅस बंद करा. आता हे मिश्रण थंड होऊ द्या आणि मग मिक्सरमधून हे मिश्रण वाटून घ्या. नंतर चाळून घ्या आणि बाकी गोष्टी वेगळ्या करा. आता हे लिक्विड तुम्ही शँपू म्हणून वापरू शकता. आवळा, रीठा आणि शिकाकाईने केस धुताना तुम्हाला हे पदार्थ केसांमध्ये अडकत आहेत असं वाटेल. पण तुम्ही जेव्हा तुमचे केस नीट धुऊन घ्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की, नेहमीपेक्षा तुमच्या केसांना जास्त चमक आली आहे आणि जास्त निरोगी झाले आहेत. त्यामुळे हा प्रयोग करून नक्की पाहा.

ADVERTISEMENT

हेअर पावडर (Hair Powder)

आवळा, रीठा आणि शिकाकाई पावडरची पेस्ट बनवून केसांना लावली जाते. यामध्ये पाणी, गुलाबपाणी आणि दूध या वस्तूंचाही वापर केला जातो. तुम्हाला आवळा, रीठा आणि शिकाकाई पावडरचे सर्व फायदे मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या केसांनुसार तेल अथवा अन्य लिक्विड या पावडरमध्ये मिसळून घ्यावं लागेल. हे केसांवर लावण्यासाठी तुम्हाला हेअर कलरिंग ब्रशचा वापर करावा लागेल. आवळा जसा बाजारामध्ये मिळतो. तसंच याचं ज्युसदेखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. मात्र रीठा अथवा शिकाकाईचं कोणत्याही प्रकारचं ज्युस उपलब्ध नसतं. त्यामुळे तुम्हाला एक चमचा रीठा पावडर, एक चमचा शिकाकाई पावडर, अर्धा चमचा कापूर पावडर आणि दोन चमचे गुलाबपाणी मिक्स करून घ्यायचं आहे. हे एका भांड्यात मिसळून तुम्ही ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. याचा केसांवर चांगला परिणाम होतो.

Hair Care 3

हेअर टॉनिक तेल (Hair Tonic Oil)

एका मोठ्या भांड्यामध्ये अर्ध भांडं पाणी घेऊन गॅसवर मध्यम आचेवर गरम करत ठेवा. एका छोट्या भांड्यामध्ये नारळाचं तेल घ्या. त्यामध्ये आवळा, रीठा आणि शिकाकाईची सुकी फळं घाला. आता छोटं भांडं हे मोठ्या भांड्यामध्ये घाला. तेल आणि अन्य गोष्टी मंद आचेवर गरम करा. मधेमधे हे मिश्रण ढवळत ठेवणं आवश्यक आहे. हे मिश्रण तुम्ही साधारणतः पंधरा मिनिट्स गरम करत राहा. जेव्हा तेलाला कढ येईल तेव्हा बंद करा. त्यानंतर गॅस बंद करून चोवीस तास अर्थात एक पूर्ण दिवस हे मिश्रण तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण चाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत ठेवा. हे मिश्रण जास्त वेळ चांगलं राहण्यासाठी काचेच्या बाटलीत ठेवणं गरजेचं आहे. शँपू करण्याच्या एक रात्र आधी हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना मुळापासून लाऊन मसाज करा. हे मिश्रण तुमच्या केसांसाठी एक प्रकारे औषधच आहे. यामुळे तुमचे केस अत्यंत घनदाट आणि चमकदार होण्यास मदत होते.

वाचा – हेअर स्ट्रेट करताना काळजी घेतली तर तुमचे केस होणार नाहीत *डॅमेज*

ADVERTISEMENT

हेअर मास्क (Hair Mask)

कधीही शँपू करण्यापूर्वी हेअर मास्क वापरण्याची चूक करू नका. नेहमी शँपू केल्यानंतर अर्थात केस धुतल्यानंतरच हेअर मास्कचा वापर करा. केसांसंबंधी बऱ्याच समस्या असतात आणि त्या प्रत्येक समस्येसाठी आवळा, रीठा आणि शिकाकाईचा वेगवेगळा प्रयोग करण्यात येतो.

केसगळतीसाठी (For Falling Hair)

एक चमचा आवळा पावडर, एक चमचा रीठा पावडर, एक चमचा शिकाकाई पावडर, अर्धा चमचा कापूरची पावडर आणि त्यामध्ये गुलाबपाणी मिसळून घ्या. ही पेस्ट पहिले तुमच्या केसांच्या मुळांवर लावा. त्यानंतर तुमच्या केसांना लावा. अर्धा तास केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर पाण्याने नीट धुऊन घ्या. सुंदर केसांसाठी तुम्ही ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.

केसांना बळकटी आणण्यासाठी (For Firm Hair)

Hair Care 2
एक- एक चमचा आवळा ज्युस, रीठा पावडर आणि शिकाकाई पावडर घ्या. त्यामध्ये एक चमचा ब्राह्मी पावडर आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घाला. तुमच्याजवळ आवळा ज्युस नसल्यास, तुम्ही आवळा ज्युसचा वापरदेखील करू शकता. पण तसं केल्यास तुम्हाला पाण्याचाही वापर करावा लागेल. मंद आचेवर सर्वात पहिले आवळा ज्युस आणि ऑलिव्ह ऑईल दहा मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर दहा मिनिट्सने या मिश्रणामध्ये रीठा, शिकाकाई आणि ब्राह्मी पावडर घाला. हे सर्व मिश्रण नीट घोळणं गरजेचं आहे. पुढच्या पाच मिनिटांसाठी ते मिश्रण ढवळत राहा. नंतर ते थंड होऊ द्या आणि मुळापासून लावा. त्यानंतर ते केसांना लावा. त्यानंतर साधारण अर्धा तास राहू द्या आणि मग पाण्याने धुवून टाका. हा प्रयोग तुम्ही तुमच्या केसांवर आठवड्यातून तीन वेळा करू शकता.

वाचा – अंडे आणि दही हेअर मास्क

ADVERTISEMENT

कोंडा घालवण्यासाठी (For Dandruff)

एक- एक चमचा आवळा, रीठा और शिकाकाई पावडरसह एक चमचा मेथी पावडर आणि दो चमचे देशी तूप घ्या. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्या. लक्षात ठेवा हे मिश्रण सेमी- सॉलिड असायला हवं. नंतर याने मुळापासून मसाज करा आणि साधारण पाऊण तास तसंच ठेऊन द्या. पाऊण तास झाल्यानंतर पाण्याने केस धुवा. महत्त्वाचं म्हणजे पाणी साधं असायला हवं. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. हळूहळू तुमच्या केसांमधील कोंडा नाहीसा होईल.

फाटे फुटलेल्या केसांसाठी (For Split Ends)

एक- एक चमचा आवळा, रीठा और शिकाकाई पावडरमध्ये दोन चमचे नारळाचं तेल आणि एक चमचा दूध यासह मिश्रण तयार करून घ्या. यामध्ये वापरण्यात येणारं दूध हे कच्चं असू द्या. ते जास्त चांगलं असतं. ही पेस्ट विशेषतः केसांच्या खालच्या बाजूला लावा. नीट लावून झाल्यावर अर्धा तास तसंच ठेवा आणि साध्या पाण्याने केस धुवा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता.

पांढऱ्या केसांसाठी (For Grey Hairs)

एक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई, मेंदी आणि जास्वंदीच्या फुलांची पावडर घ्या. त्यामध्ये पाणी घालून  सेमी- लिक्विड मिश्रण तयार करा. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा आणि साधारण दीड तास तसंच लावून ठेवा. नंतर पाण्याने धुऊन घ्या. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून एकच वेळा केल्यास, चांगलं आहे.

कोरड्या आणि तुटत्या केसांसाठी (For Brittle Hair)

एक- एक चमचा आवला, रीठा, शिकाकाई और कोको पावडरसह दो चमचा एलोवेरा ज्युस घ्या. इथे तुम्ही कोरफड जेलचादेखील वापर करू शकात. या सर्वाचं सेमी- लिक्विड मिश्रण तयार करा. त्यानंतर तुमच्या केसांच्या मुळांपासून ही पेस्ट लावा. एक तासासाठी हे केसांना लाऊन ठेवा. नंतर पाण्याने धुऊन टाका. या मिश्रणाचा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकता. हळूहळू तुमचे कोरडे आणि तुटणारे केस बदलतात आणि केसांचं सौंदर्य वाढतं.

ADVERTISEMENT

तेलकट केसांसाठी (For Oily Hair)

Hair Care 1
एक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई, मुल्तानी मिट्टी पावडरसह एक चमचा दही घेऊन मिश्रण तयार करा. तुम्हाला हवं असल्यास, मुल्तानी मिट्टी नाही वापरली तरीही चालेल. लक्षात ठेवा मिश्रण नीट तयार व्हायला हवं. याचंदेखील सेमी- लिक्विड मिश्रण तयार करा. हे मिश्रण मुळापासून लाऊन साधारण पाऊण तास ठेऊन द्या. नंतर नीट पाण्याने धुऊन घ्या. याचा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन वेळा नक्कीच करू शकता.

चमकदार केसांसाठी (For Shining Hair)

एक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई आणि संत्र्यांच्या सालाची पावडर घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाबपाणी घाला. संत्र्यांच्या साली सुकवून याची पावडर तुम्ही करू शकता. हे मिश्रणही सेमी लिक्विड असायला हवं. त्यामुळे गुलाबपाण्याचा वापर करावा. याचा वापर मुळापासून लावायला करावा. अर्धा तास हे लाऊन ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून तीनवेळा लावू शकता.

सिल्की केसांसाठी (For Silky Hair)

एक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई पावडरसह अर्धा चमचा मध आणि एका अंड्याचा सफेद भाग घ्या. अंड्याऐवजी तुम्ही मेयोनीजचा वापरदेखील करू शकाता. मग हे मेयोनीज एगलेस असू नये. सर्व घेऊन एकत्र मिश्रण करावं. त्यानंतर हे सेमी लिक्विड मिश्रण तुमच्या मुळापासून केसांना लावा. एक तास केस तसेच ठेवा. त्यानंतर केस धुताना पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळायला विसरू नका. लिंबाचा रस मिसळल्याने केसांमधील अंड्याचा वास निघून जाईल. आठवड्यातून दोन  वेळा या मिश्रणाचा वापरू करून तुम्ही तुमचे केस चमकदार करू शकता.

केसांच्या वाढीसाठी (For Growing Hair)

एक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई आणि कोरफड ज्युस घ्या. दोन चमचे तीळाचं तेलदेखील घ्या. हे सर्व एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना मुळापासून लावा आणि पाऊण तास ठेऊन मग केस धुवा. हळूहळू याचा परिणाम दिसू लागतो. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता.

ADVERTISEMENT

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

Hair Care Tips & Food For Hair Growth In Marathi

How To Get Rid Of White Hair & Side Effects Of Hair Dye In Marathi

Diet For Hair Growth & Home Remedies In Marathi

ADVERTISEMENT
18 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT