ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
use-organic-products-if-you-have-hair-loss-in-summer-in-marathi

उन्हाळ्यात केसांची वाताहात होत असेल तर वापरा ऑर्गेनिक उत्पादने

उन्हाळा सुरू झाला की, सर्वात जास्त त्रास होतो तो केसांची काळजी घेताना. घामामुळे केस लवकर खराब होतात आणि सतत केसांवरून आंघोळ करणेही शक्य नसते. पण उन्हाळ्यात केसांची वाताहत होऊ नये यासाठी तुम्हाला काळजी घ्यावीच लागते. उन्हाळ्यात केसांमध्ये घाम येतो आणि त्यात धूळ आणि माती साचते, चिकटते. त्यामुळे केसांची काळजी घेताना नेहमी दक्ष राहावे लागते. अशावेळी योग्य उत्पादनांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे केस उन्हाळ्यातही कोरडे आणि निस्तेज होतात. तुमच्या केसांची वाताहात होऊ नये आणि उन्हाळ्यातही केसांची चमक चांगली राहावी यासाठी आम्ही काही चांगल्या ऑर्गेनिक उत्पादनांबाबत सांगणार आहोत. या उत्पादनांच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांची निगा राखू शकता.

https://marathi.popxo.com/article/these-organic-products-are-all-you-need-to-remove-dandruffr-in-marathi/

हेअर स्पा जे ठरतील केसांसाठी उपयुक्त 

ऑर्गेनिक हार्वेस्ट (Organic Harvest) चे हे उत्पादन तुमचे केस जर निस्तेज आणि कोरडे झाले असतील तर त्यासाठी खास बनविण्यात आले आहे. यामध्ये कॅराटिन प्रोटीन असून केसांना चांगले मॉईस्चराईज करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच केसांमधील फ्रिजीनेस नियंत्रणात आणण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि केसांमधील चिकटपणादेखील कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. कोरडे आणि निस्तेज केस असतील तर हा हेअर स्पा अत्यंत उपयोगी ठरतो. 100% ऑर्गेनिक उत्पादनांपासून बनविण्यात आले असून यामध्ये PABA आणि पॅराबेनदेखील नाही. 

कंडिशनर जे करेल केस चमकदार 

ऑर्गेनिक हार्वेस्टचे हे कंडिशनर तुमच्या केसांची दुरूस्ती करण्याचे काम करते. केसांना अधिक मजबूती देण्यासाठी आणि घनदाट केस करण्यासाठी या कंडिशनरचा तुम्ही वापर करू शकता. तसंच केसांना चांगले मॉईस्चराईज करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुमचे केस अधिक मऊ आणि चमकदार होण्यासाठीही याचा उपयोग होतो. हे कंडिशनर रिच फॉर्म्युल्याच्या केराटिनसह बनविण्यात आले असून केसातील निस्तेजपणा आणि केसातील गुंतागुंत कमी करण्यासही मदत करते.  

ऑर्गेनिक ऑर्गन ऑईल 

केसांना पोषण देण्यासाठी आपण नेहमी तेलाचा वापर करतो. पण आपण जे तेल वापरतो त्याने केसांना योग्य पोषण मिळते की नाही हेदेखील आपण पाहायला हवे. ऑर्गेनिक हार्वेस्टचे ऑर्गन ऑईल (Organic Harvest Organ Oil) हे ऑर्गन झाडाच्या कोल्ड प्रेसच्या मदतीने काढण्यात आलेले आहे. तसंच ऑर्गनच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. यामध्ये केसांसाठी पोषक असे अनेक घटक आहेत. फॅटी अॅसिड आणि विटामिन ई या घटकांमुळेही केसांना फायदा मिळतो. यामुळेच ऑर्गन ऑईल हेअर कंडिशनिंगसाठी आणि सुरकुत्या काढण्यासाठी अत्यंत चांगले आहे. तसंच त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

ऑर्गेनिक शँपू 

ऑर्गेनिक हार्वेस्टचे ऑर्गेनिक नरिशमेंट शँपू हे मँगो बटरने बनविण्यात आले आहे. तसंच प्लांट डिराईव्ड गोष्टींपासून हे बनविण्यात आले आहे. हे ऑर्गेनिक शँपू तुमच्या केसांना अधिक चांगले कंडिशन देतात आणि स्काल्पलादेखील कंडिशन करते. तसंच केसांना मॉईस्चराईज करून केसांची काळजी घेते. 

तुम्हीही उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करून घेऊ शकता. यामध्ये नैसर्गिक घटकांचा वापर होत असल्यामुळे तुमच्या केसांना त्रास होऊ शकत नाही. तसंच ऑर्गेनिक हार्वेस्टची अनेक उत्पादने तुम्ही केसांसाठी वापरू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT