ADVERTISEMENT
home / आरोग्य
period pain relief patch

मासिक पाळीत पोटात दुखत असल्यास, वापरा PMS Gummies आणि रिलीफ पॅच

(Get Rid Of Period Cramps And Mood Swings) 

मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक कठीण काळ असतो. कुणी काहीही म्हटलं आणि सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातींमधील मुली ‘त्या’ दिवसांतही पांढऱ्या पँट्स घालून सगळीकडे उत्साहात वावरत असल्या तरी सर्वसामान्य स्त्रियांना मात्र त्या चार-पाच दिवसांत खरंच त्रास होतो. मासिक पाळीत येणारे क्रॅम्प्स वेदनादायक असू शकतात हे आपल्याला माहितीच आहे. पण ते किती वेदनादायक असू शकतात हे जाणून तुम्ही थक्क व्हाल. मासिक पाळीत येणारे क्रॅम्प्स ज्यांना वैद्यकीय भाषेत डिसमेनोरिया म्हणतात त्यामुळे तितकीच वेदना होऊ शकते जितकी हृदयविकाराचा झटका येताना होते. म्हणजे बघा, आपण ज्या वेदना वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षांपासून ते पंचेचाळीस-पन्नासाव्या वर्षापर्यंत दर महिन्याला सहन करत असतो त्यांची तीव्रता काही वेळेला हार्ट अटॅकसारखी असू शकते हे फायनली तज्ज्ञांनी मान्य केले आहे. या वेदना आपल्या आयुष्याचा एक भाग म्हणून आपण स्वीकारलेल्या असतात आणि त्या सहन करतो. 

मासिक पाळीत होणारे त्रास 

तुम्हाला मासिक पाळी सुरू असताना तुमच्या ओटीपोटात, पाठीच्या खालच्या भागात आणि मांड्याभोवती थोड्या वेदना होणे हे सामान्य आहे. पण काही स्त्रियांना मात्र याचा फार त्रास होतो. मासिक पाळी सुरु असताना गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात आणि गर्भाशयात तयार झालेले अस्तर काढून टाकतात. यामुळे कधीकधी क्रॅम्प्स येतात. यासोबतच मळमळणे, उलट्या होणे, डोकेदुखी व अतिसार हा त्रास देखील काही स्त्रियांना होतो. 

मासिक पाळीतील वेदना । Period Pain
Period Pain

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय गरम पाण्याच्या बॅगने शेकणे, इसेन्शिअल ऑईल्सचा मसाज करणे हे आहेत. तसेच कॅमोमाइल टी, बडीशेप, दालचिनी, आलं या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. तसेच योगासनांचे काही प्रकार  केल्यास हा त्रास थोडा कमी करण्यात मदत होऊ शकते. 

वापरा पिरियड पेन रिलीफ पॅचेस 

मासिक पाळीच्या क्रॅम्प्स कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पीरियड पेन रिलीफ पॅच होय. हे पॅचेस प्रभावित भागावर चिकटवले जाऊ शकतात आणि वेदना कमी करणारे घटक आपल्या त्वचेद्वारे हळूहळू शोषले जातात. सिरोनाचे पिरियड पेन रिलीफ पॅचेस हे वापरण्यास अतिशय सोपे आणि मासिक पाळीच्या वेदनांवर प्रभावी आहेत. 

ADVERTISEMENT

सिरोनाचे फेमिनाइन पेन रिलीफ पॅच  हे मासिक पाळी आणि स्नायूंच्या वेदनांसाठी 100% हर्बल फॉर्म्युलेशन आहे. यामध्ये मेन्थॉल आणि युकॅलिप्टस ऑइल हे नैसर्गिक पेन किलर्स आहेत. हे पॅच लावल्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या स्नायूंना आराम देते, ज्यामुळे क्रॅम्प्सपासून आराम मिळतो. हे पॅच तुम्ही केव्हाही व कुठेही वापरू शकता. एक पॅच 8-12 तास काम करते आणि तुम्हाला पिरियड्सच्या वेदनांसाठी गोळ्या किंवा हॉट वॉटर बॅग्सवर अवलंबून राहावे लागत नाही. खालच्या ओटीपोटात दुखणे, पाठ आणि इतर स्नायूंच्या वेदनांसाठी देखील तुम्ही वापरू शकता. यामध्ये सगळे नैसर्गिक घटक आहेत व कुठलीही हानिकारक रसायने नाहीत. त्यामुळे याचे दुष्परिणाम होत नाहीत. 

मासिक पाळी सुरु असताना किंवा येण्याच्या आधी आपल्यापैकी काहींना PMS चा त्रास होतो. आपल्या शरीरात घडणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे आपल्याला हा त्रास होतो. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) मध्ये मूड स्विंग, स्तन सेन्सिटिव्ह होणे, गोड खाण्याचे क्रेविंग होणे, थकवा, चिडचिड आणि नैराश्य असे त्रास होतात. मासिक पाळी येणा-या प्रत्येक 4 पैकी 3 स्त्रियांना PMS चा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास होतो. आता हा त्रास तुम्ही PMS Gummies ने कमी करू शकता. 

Sirona PMS Gummies मध्ये अनेक जीवनसत्त्वे आहेत जे तुम्हाला PMS व मासिक पाळीच्या त्रासांपासून आराम देण्यात मदत करतात.  तसेच PCOS च्या लक्षणांपासूनही आराम देतात. या गमी शाकाहारी आहेत आणि स्ट्रॉबेरी फ्लेव्हरमध्ये येतात. या महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्या हार्मोनल असंतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात. या गमीज मुळे ब्लोटिंग कमी होते,  क्रॅम्प्स कमी होतात तसेच त्या मूड सुधारण्यास आणि हार्मोनल ऍक्ने कमी करण्यास देखील मदत करतात. 

मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हे नक्कीच वापरू शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT