ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
सनटॅनपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन क्रीम ऐवजी वापरा हे नॅचरल ऑईल

सनटॅनपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन क्रीम ऐवजी वापरा हे नॅचरल ऑईल

सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे त्वचेचं अतोनात नुकसान होतं. बऱ्याचदा यामुळे तुम्हाला सनटॅन, सनबर्न, त्वचेच्या समस्या, पुरळ, लालसर चट्टे अथवा त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सतत उन्हात फिरणाऱ्या लोकांच्या त्वचेवर सुरकुत्या येतात आणि चेहरा वयस्कर दिसू लागतो. अशा वेळी तज्ञ्ज तुम्हाला नियमित सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने त्वचेचं संरक्षण करायचं असेल तर सनस्क्रीनप्रमाणे तुम्ही या तेलांचा नैसर्गिक सनस्क्रीन सारखा वापर करू शकता. 

सूर्यकिरणांपासून संरक्षण करणारे नैसर्गिक तेल

आपल्या घरात अशा अनेक प्रकारचे तेल असते जे सूर्यकिरणांच्या घातक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करू शकतात. 

तिळाचे तेल

तिळाचे तेल तुमचे हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण करते. यासाठी अंघोळीनंतर तुम्ही दोन ते तीन थेंब तेल संपूर्ण अंगावर लावून मालिश करू शकता. चेहरा आणि मानेवर तेल लावून सूर्यप्रकाशात गेल्यास तुमचे सनस्क्रीनप्रमाणे संरक्षण होते. तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून तुम्हाला धोका होत नाही.

बदामाचे तेल

बदामाच्या तेलाचे त्वचेवर अनेक चांगले फायदे होतात.  बदामाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून त्याचा वापर तुम्ही नैसर्गिक सनस्क्रीनप्रमाणे करू शकता. या तेलामुळे तुमच्या त्वचेचं सूर्यकिरणांपासून संरक्षण तर होतंच शिवाय त्वचा मऊ आणि मुलायमदेखील होते. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी नियमित तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.

ADVERTISEMENT

टी ट्री ऑईल 

त्वचेसाठी टी ट्री ऑईल नेहमीच फायदेशीर ठरतं. सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी उन्हात जाण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर टी ट्री ऑईल लावू शकता. कारण या तेलामध्ये अॅंटि सेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेला खाज येणं, फोड येणं, हानिकारक इनफेक्शनपासून संरक्षण होते. सहाजिकच या तेलाचा वापर तुम्ही नैसर्गिक सनस्क्रीप्रमाणे करू शकता.

नारळाचे तेल

नारळाचे तेल प्राचीन काळापासून त्वचा आणि केसांसाठी वापरले जाते. या तेलातील पोषक घटक त्वचेचं पोषण करतात आणि हानिकारक सूर्यकिरणांपासून त्वचेला संरक्षण देतात. त्वचेच्या कोणत्याही समस्येवर नारळाचे तेल वापरण्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

घरी कसे तयार करावे नैसर्गिक सनस्क्रीन

घरच्या घरी नैसर्गिक सनस्क्रीन तयार करण्यासाठी  तुम्ही वरीलपैकी कोणतेही तेल एकत्र करून वापरू शकता. समप्रमाणात बदामाचे तेल, नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करा आणि त्यात थोडं नारळाचं पाणी टाका. बी वॅक्स मिसळा आणि मिश्रण गरम पाण्यात डबल बॉयलर करून वितवळून घ्या.थंड करून घट्ट झाल्यावर एखाद्या डबीत हे लोशन भरून ठेवा. बाहेर जाण्यापूर्वी अथवा घरातदेखील तुम्ही हे नैसर्गिक सनस्क्रीन वापरू शकता. 

30 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT