ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
organic harvest

तुम्हालाही होत आहे का त्वचेची जळजळ, कसा करता येईल ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर

त्वचेची जळजळ होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. त्वचेची जळजळ होत असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटते आणि त्रास होतो. त्वचेची जळजळ होण्यासाठी ऍलर्जी, त्वचारोग तसेच ऋतू बदलणे, प्रदूषण हे घटक कारणीभूत असतात. कधी कधी हार्ड वॉटरने देखील त्वचेची जळजळ होऊ शकते. कारण हार्ड वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ज्यामुळे त्वचेवर मुरुम येऊ शकतात. कधी कधी एक्जिमाचा त्रास देखील होऊ शकतो. 

त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही स्किन केअर रुटीन पाळले तर त्याचा त्वचेला फायदाच होतो.पण तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये एक्सफोलिएशनवर कमी आणि मॉइश्चरायझिंगवर अधिक भर देणे आवश्यक आहे. तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर अति सुगंधित उत्पादने वापरू नका. किंबहुना नैसर्गिक उपाय करणेच आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

शिया बटर, खोबरेल तेल, कोरफड, काकडी, विविध फळांचे अर्क, ग्रीन टी, ऑलिव्ह ऑइल, आर्गन ऑइल असे नैसर्गिक पदार्थ आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे हे घटक असलेली ऑर्गेनिक उत्पादने आपण वापरायला हवीत. त्वचेची जळजळ शांत करण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक घटकांपासून बनवलेले शुद्ध ,केमिकल फ्री ,ऑर्गेनिक मास्क, सिरम व क्रीम वापरता येतील. ही ऑर्गेनिक उत्पादने त्वचेचा दाह शांत करून त्वचा निरोगी व टवटवीत होण्यास मदत करतील. 

बाजरात मिळणाऱ्या अनैसर्गिक व केमिकल घटकांनी युक्त मास्कपेक्षा ऑरगॅनिक हार्वेस्टचे रेन फॉरेस्ट जेली मास्क हे एक प्रमाणित सेंद्रिय उत्पादन वापरून बघा. हे वनस्पतींपासून तयार केलेल्या घटकांनी बनवले आहे. रात्री चेहरा स्वच्छ धुवून झोपताना हा जेली मास्क लावा. हा मास्क 3 ऑस्ट्रेलियन रेनफॉरेस्ट फळांचे बायोएक्टिव्ह कॉम्प्लेक्स आहे. यात लिली पिली, लेमन एस्पेन आणि डेव्हिडसोनिया प्लम या वनस्पतींचा औषधी अर्क आहे जो त्वचेवर अँटी स्ट्रेस एजंट म्हणून काम करतो आणि तुम्ही आराम करत असताना त्वचेचे पोषण करतो तसेच त्वचा पुनरुज्जीवित करतो. हा मास्क पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही त्वचेसाठी योग्य आहे. तसेच ऑर्गेनिक असल्याने संवेदनशील त्वचेसाठी उत्तम आहे. 

ADVERTISEMENT

हल्ली सगळीकडे विविध सिरम्सचे पेव फुटले आहे. पण केमिकलयुक्त सीरम वापरण्यापेक्षा नैसर्गिक घटकांनी युक्त ऑरगॅनिक हार्वेस्टचे रेन फॉरेस्ट सीरम वापरा. सीरम लावण्याआधी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. चेहेरा धुण्यासाठी कधीही खूप गरम पाणी वापरू नये. खूप गरम पाण्याने चेहऱ्याच्या त्वचेचा दाह होऊ शकतो. चेहरा कोमट पाण्याने धुवून मऊ नॅपकिन किंवा टॉवेलने हळुवार हातांनी कोरडा करा आणि ऑरगॅनिक हार्वेस्टच्या रेन फॉरेस्ट सीरमचा दररोज सकाळी आणि रात्री चेहेऱ्यावर व मानेवर मसाज करा. हे सिरम औषधी वनस्पतींचा अर्क वापरून तयार केलेले आहे. हे संवेदनशील त्वचेचा दाह शांत करते तसेच त्वचेचे संरक्षण करण्यासही मदत करते.

फळे व भाज्या आपल्या आरोग्यासाठी व त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप आवश्यक असतात. म्हणूनच पालकाचा अर्क आणि नियासीनामाइड (व्हिटॅमिन बी थ्री) असलेले ऑरगॅनिक व्हिटॅमिन बी टोनर वापरा. हे तुमच्या त्वचेचे पोअर्स कोमलतेने स्वच्छ करते तसेच त्वचेवरील तेलाचे उत्पादन कमी करते. या टोनर मध्ये दाह-विरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेचा दाह शांत करून त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते. 

त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी त्वचेमध्ये आर्द्रता असणे तसेच त्वचेतील टॉक्सिन्स निघून जाणे आवश्यक असते. त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी ऑरगॅनिक हार्वेस्टचा रेन फॉरेस्ट रिन्ज ऑफ मास्क लावा. हा मास्क लावायला सोपा आहे. या मास्कची पातळ लेयर संपूर्ण  चेहेऱ्याला हळूवारपणे लावा. सुमारे 10-15 मिनिटे मास्क ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा मास्क त्वचेला तेजस्वी आणि चमकदार ठेवतो तसेच अतिनील किरणे आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करतो. हा मास्क त्वचेचा दाह देखील शांत करतो. 

तर त्वचेचा दाह व इतर साईड इफेक्ट्ससाठी कारणीभूत असणाऱ्या आर्टिफिशियल व रासायनिक उत्पादनांपेक्षा ही ऑर्गेनिक उत्पादने वापरून बघा व त्वचेची काळजी घ्या.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT