त्वचेची काळजी घेण्यासाठी पोषक घटकांची आवश्यकता असते. आपल्या शरीरात काहीही गडबड झाली असेल तर त्याचा पहिला परिणाम आपल्या केसांवर व त्वचेवर होतो. तसेच आपल्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता झाली तरीही त्यामुळे केस व त्वचा खराब होते. त्वचेच्या समस्या होतात. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी जीवनसत्त्वे आवश्यक असतात. आजच्या काळात स्किन केअर रूटीनमध्ये खूप बदल झाले आहेत. पूर्वी त्वचेची काळजी घेण्यासाठी केवळ फेस मास्क आणि स्क्रबचा वापर केला जात असे. आजकाल मात्र चमकदार व निरोगी त्वचेसाठी जीवनसत्त्वांचा वापर केला जातो. त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने मिळतात. पण तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन्सचा समावेश केला तर तुमची त्वचा नक्कीच निरोगी व नितळ होण्यास मदत होईल. व्हिटॅमिन्सच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स आणि फ्रिकल्स यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणती समस्या आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य व्हिटॅमिन निवडू शकता.
मुरुमांसाठी व्हिटॅमिन ए (रेटिनॉल) चा वापर करा
‘व्हिटॅमिन ए’ ला वैद्यकीय भाषेत रेटिनॉल असे म्हणतात. रेटिनॉल हे मुरुम कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ए त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करते, ज्यामुळे सिबमचे उत्पादन कमी होते. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि पुरळ कमी होतात. तेलकट त्वचेसाठी व्हिटॅमिन ए खूप चांगले मानले जाते. नैसर्गिकरित्या अ जीवनसत्व मिळवण्यासाठी आहारात ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
सुरकुत्यांवर उपयुक्त व्हिटॅमिन सी
त्वचेवर फाईन लाईन्स आणि सुरकुत्या आल्याने चेहरा अकाली वृद्ध दिसू लागतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी वापरू शकता. व्हिटॅमिन सी मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन सी असलेले लोशन व मॉइश्चरायझर वापरा. व्हिटॅमिन सी सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. व्हिटॅमिन सीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. म्हणूनच क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत.
एग्झिमाच्या त्रासावर गुणकारी आहे व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे. मानवी शरीरात तयार होणारे व्हिटॅमिन डी कॅल्सीट्रिओल म्हणून ओळखले जाते. तुम्हाला एग्झिमाचा त्रास असेल तर तो जीवनसत्त्वांच्या मदतीने बरा होऊ शकतो. व्हिटॅमिन डी त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच ते त्वचेचे सूर्यप्रकाशापासून रक्षण करते. व्हिटॅमिन डीमधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला टवटवीत करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. व्हिटॅमिन डी त्वचेवरील स्ट्रेच मार्क्सही कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
कोरड्या त्वचेसाठी वापरा व्हिटॅमिन ई
केसांसाठी व त्वचेसाठी व्हिटॅमिन ई हे वरदान आहे. विटामिन ई चे फायदे अनेक आहेत. व्हिटॅमिन ई त्वचेचे सौंदर्य व आरोग्य अनेक पटींनी वाढवते. व्हिटॅमिन ईमध्ये हायड्रेटिंग आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे कोरड्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. व्हिटॅमिन ई चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासही खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करून तुम्ही त्वचेला पोषण देऊ शकता.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करते व्हिटॅमिन के
डोळ्याखाली काळी वर्तुळे आली असतील तर ती कमी करण्यासाठी व्हिटॅमिन के खूप उपयुक्त आहे.काळी वर्तुळे कमी करण्यासाठी अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन केचा वापर केला जातो. डार्क सर्कल्ससाठी व्हिटॅमिन के असलेले आय क्रीम वापरा.
तसेच हेल्दी फॅट्समुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. तुमच्या आहारात हेल्दी फॅट्स कमी असतील तर त्यामुळे तुमची त्वचा सुरकुतलेली आणि कोरडी होऊ शकते. हेल्दी फॅट्स मिळवण्यासाठी सुका मेवा, बिया आणि अवोकाडो, मासे यांसारख्या पदार्थाचा आहारात समावेश करा. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सवर असतात, ते तुमची त्वचा मऊ, निरोगी आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात.
अशा प्रकारे तुम्ही जीवनसत्वांचा वापर करून त्वचेची काळजी घेऊ शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक