बहुचर्चित सिम्बाचा ट्रेलर कालच प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला एक ओळखीचा मराठी चेहरा. हा चेहरा म्हणजे ‘आणि काशिनाथ घाणेकर’ फेम वैदेही परशुरामी. आगामी सिम्बामध्ये वैदेही रणवीर सिंहच्या अॉनस्क्रीन बहिणीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हे ट्रेलर प्रदर्शित झाल्याझाल्या वैदेहीने ही आपल्या इन्स्टा अकाउंटवर ते शेअर केलं. पाहा तिची ही पोस्ट –
वैदेही आणि बॉलीवूड
‘सिम्बा’ हा वैदेहीचा पहिला हिंदी चित्रपट नसून याआधी तिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांच्यासोबत ‘वजीर’ चित्रपटात काम केले होते. ह्या चित्रपटातील तिची भूमिका छोटी असली तरी प्रेक्षकांनी तिला नोटीस केले होते.
सिम्बाचं मराठी कनेक्शन
रोहीत शेट्टी दिग्दर्शित सिम्बामध्ये वैदेहीसोबत अनेक मराठी कलाकार आहेत. सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, विजय पाटकर आणि नंदू माधव यांच्याही सिम्बामध्ये खास भूमिका आहेत.
वैदेहीचा करिअरग्राफ
वैदेहीने नुकतीच मल्टीस्टारर आणि सुपरहिट ‘आणि काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात सुबोध भावेच्या दुसऱ्या बायकोची म्हणजेच कांचन घाणेकर यांची भूमिका साकारली होती. काशिनाथमधील तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले. या आधीही तिने अनेक मराठी चित्रपटात आणि जाहिरातीतदेखील काम केले आहे. जसं वृंदावन, कोकणस्थ, एफयू, वेड लावी जीवा, आणि काशिनाथ घाणेकर. वैदेहीने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
रिअल लाईफ वैदेही
रील लाईफमध्ये साध्या भूमिकांंमुळे नावारूपास आलेली वैदेही रिअल लाईफमध्ये मात्र बिनधास्त आणि ग्लॅमरस आहे. वैदेहीचा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झाले असून तिने कायद्याची पदवी घेतली आहे. तसंच वैदेही कथ्थक नृत्यात ही पारंगत आहे.
सिम्बामुळे वैदेहीला पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात नाव करण्याची संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही.
फोटो सौजन्य : Instagram
AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!