ADVERTISEMENT
home / बिग बॉस
आई तू खेळ… आमची काळजी करू नकोस

आई तू खेळ… आमची काळजी करू नकोस

#BBM2 सध्या जोरदार सुरू आहे. बिग बॉस मराठीचा हा सिझन पहिल्या सिझनपेक्षा निश्चितच वेगळा ठरतो आहे तो घरातील सदस्यांच्या स्ट्रॅटेजिक खेळामुळे. सोमवारच्या टास्कमध्ये पुन्हा एकदा स्ट्रॅटेजिक गेम आणि ग्रुपिझम दिसून आलं. टास्कमध्ये जिंकल्यानंतर शिवला कॅप्टनशिप मिळाली आहे. त्यामुळे नेहाच्या ग्रुपमध्ये आनंद आहे. तर परागच्या ग्रुपमध्ये थोडी नाराजी आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा वैशालीचं गाणं आणि हिनाचा डान्स पाहायला मिळाला. वीकेंडचा वारमध्ये वैशालीला महेश मांजरेकरांनी ती टास्कवेळी पार्शियल वागल्याचं ऐकवलं होतं. तेव्हा तिने स्वतःला व्यवस्थित डिफेंड तर केलंच. पण सोमवारच्या एपिसोडमध्येही वैशालीने चांगलंच ग्रुप स्पिरीट आणि खेळ दाखवला. त्यामुळे उत्तरोत्तर हा गेम रंगत जाणार आहे. यात शंका नाही. या सगळ्यात बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असते. हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. वीकेंडच्या डावमध्ये महेश मांजरेकरांनी टास्कवेळी बिग बॉसची पहिली महिला कॅप्टन वैशाली माडे पार्शियल वागल्याचं म्हटलं. याबाबत #POPxoMarathi ने खास बातचीत केली वैशालीची मुलगी आस्था आणि वैशालीच्या आईशी. 

वैशाली खूप स्ट्राँग आहे

Instagram

सध्या वैशाली नसल्यामुळे आजी आणि नात दोघीच अंधेरीतल्या घरात राहत आहेत. वैशालीची मुलगी आस्था सहावीत असूनही अगदी धीटपणे कॅमेराला सामोरं जातं. प्रत्येक प्रश्नाला निर्भीडपणे उत्तर देते. तर वैशालीच्या आईही सुरूवातीला थोडया संकोच ठेवून बोलल्या पण नंतर मात्र मोकळ्या झाल्या. दोघींचही म्हणणं एकच होतं की, वैशाली स्ट्राँग आहे.

ADVERTISEMENT

वैशाली धोबी पछाड टास्कमध्ये पार्शियल वागली का?

आस्था आणि वैशालीच्या आई रोज बिग बॉस पाहतात. आस्थाला तिच्या आईने कुठेही ती धोबीपछाड टास्कमध्ये ती पार्शियल वागली असं वाटत नाही. जी टीम जिंकली ती त्यांच्याकडे असलेल्या जास्त पाँईट्समुळे असं आस्था सांगते. आई सगळ्यांना समान ट्रीट करते आणि तिने कोणताही भेदभाव केला नाही. 

आई तू खेळ… आमची काळजी नको करूस

दोघींनाही विश्वास आहे की, वैशाली खूप स्ट्राँग आहे आणि ती नक्कीच फायनलिस्टमध्ये असेल. ती जरी बिग बॉसमध्ये असली तरी तिने स्ट्राँगपणे खेळावं. आमची काळजी न करता गेमवर लक्ष द्यावं. वैशालीने ग्रुपमध्ये राहून खेळू नये तर वैयक्तिकपणे खेळावं असं तिच्या आईला वाटतं.

वैशालीची बिग बॉस मूमेंट

आस्थाच्या मते चोर पोलीस टास्कमध्ये वैशाली खूप छान खेळली. तिने नेहमी असंच खेळावं. तर तिच्या आई भावनिक होत म्हणाल्या की, तिच गाणं आम्ही खूपच मिस करतो. जेव्हा तिचं बिग बॉसमधलं गाणं ऐकतो तेव्हा डोळ्यात पाणीच येतं. वैशालीने वीकेंडच्या डावमध्ये गायलेलं गाणं आजी आणि नातीला फारच आवडलं.

बिग बॉसमध्ये अजून कोण आवडतं?

वैशालीची मुलगी आस्थाला वीणा जगताप आणि सुरेखा पुणेकर आवडतात तर वैशालीच्या आईला अभिजीत केळकर, माधव देवचक्के आणि शिव आवडतात.

ADVERTISEMENT

बिग बॉसमधलं वातावरण

मला तिची काळजी वाटत नाही कारण तिने आयुष्यात खूप पाहिलंय ती स्ट्राँग आहे, असं वैशालीच्या आईला वाटतं. वैशालीच्या आईचं हे म्हणणं खरं ठरल्याचं सोमवारच्या एपिसोडमध्ये दिसलंच. आता पाहूया या वीकमध्ये अजून काय काय होतं ते. 

हेही वाचा –

Bigg boss 2 : घरातून बिचुकलेला काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

#BBM2 : अभिजीत बिचुकलेला केली सातारा पोलिसांनी अटक

ADVERTISEMENT

#BBM2 मध्ये बिचुकलेनंतर नवा टार्गेट होतोय सेट

 

24 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT