ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
नताशाने होकारापूर्वी 4 वेळा दिला होता नकार, वरूण धवनचा खुलासा

नताशाने होकारापूर्वी 4 वेळा दिला होता नकार, वरूण धवनचा खुलासा

वरूण धवनने नताशा दलालसह आपलं नातं लपवून ठेवलेलं नाही. गेल्यावर्षीपासून वरूण आणि नताशा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर्षी ही जोडी लग्नबंधनात अडकणार होती मात्र कोरोनामुळे लग्न पुढे ढकललं गेल्याच्या चर्चाही झाल्या. पण नात्यात येण्यापूर्वी नताशाने वरूणला एक वेळा नाही तर तब्बल 4 वेळा नकार दिल्याचा खुलासा एका मुलाखतीमध्ये वरूणने स्वतः केला आहे. करिना कपूरच्या एका शो मध्ये वरूण मनमोकळेपणाने आपल्या आणि नताशाच्या नात्याबद्दल बोलला आणि त्यामध्ये त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. वरूण धवनचे अनेक चाहते आहेत. त्यातही मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे नताशासह जेव्हा आपले नाते वरूणने स्वीकारले होते तेव्हा अनेक महिला चाहत्यांचे मन दुखावले होते. मात्र वरूणच्या आनंदात त्यांनी आनंदही मानला. तर आता वरूण आणि नताशा कधी बोहल्यावर चढणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Good News: गायिका नेहा कक्कर होणार आई, फोटो व्हायरल

नताशावरील प्रेम वरूणने जगासमोर स्वीकारले

वरूण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलाल ही त्याच्याबरोबर नेहमीच दिसून येते. वरूणही नताशावर अतोनात प्रेम करतो आणि कधीही त्याने तिच्याबरोबरचे आपले नाते लपविण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर त्याने नेहमीच हे नाते स्वीकारले आहे. पार्टी असो वा कोणताही कार्यक्रम असो, एकत्र फिरायला जाणे असो नेहमीच दोघे एकत्र दिसतात. सध्या वरूण आपल्या ‘कुली नं. 1’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून अनेक ठिकाणी मुलाखत देत आहे. अशीच एका शो मध्ये करिना कपूरला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या आणि नताशाच्या नात्याबद्दल वरूणने खुलासा केला. नताशाने वरूणला होकार देण्यापूर्वी 4 वेळा नकार दिला होता. मात्र आपण कधीही आशा सोडली नाही आणि कायम नताशाला मनवत राहिलो असं वरूणने सांगितलं. वरूणने सर्वात पहिले 6 वी मध्ये शिकत असताना नताशाला पाहिले होते. 12 वी पर्यंत दोघेही एकत्र शिकत होते आणि खूप चांगले मित्र होते. त्यावेळच्या आठवणीही वरूणने मुलाखतीमध्ये शेअर केल्या. इतकंच नाही तर आपण शाळेत रेड हाऊसमध्ये तर नताशा यलो हाऊसमध्ये होती असंही वरूणनने सांगितलं. नताशाला तो बास्केटबॉल कोर्टमध्ये लंच ब्रेक असताना पाहायचा असंही त्याने कबूल केलं. एकदम टिपिकल फिल्मी अशी लव्ह स्टोरी असल्याचंही वरूणने सांगितलं. वरूण आणि नताशा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर वरूणने अजूनही कोणतंही भाष्य केलेलं नाही.

NCB च्या रडारवर पुन्हा करण जोहर, हाऊस पार्टीचे मागितले व्हिडिओ

ADVERTISEMENT

ख्रिसमसला होतोय चित्रपट प्रदर्शित

या वर्षी अनेक चित्रपट रखडले होते. त्यापैकीच एक होता ‘कुली नं. 1’. सारा अली खानसह वरूण धवन पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असून हा चित्रपट त्याचे वडील डेव्हिड धवन यांनीच दिग्दर्शित केला आहे. वरूणचा कॉमिक टायमिंग याआधीही प्रेक्षकांना आवडला होता. त्यामुळे या चित्रपटाकडून वरूण आणि प्रेक्षकांनाही खूप अपेक्षा आहेत. मात्र गोविंदाशी तुलना होत असल्याने आता या चित्रपटाचा निकाल काय लागणार हे ख्रिसमसलाच कळेल. हा चित्रपट ख्रिसमला प्रदर्शित होत आहे. यामध्ये परेश रावल, जॉनी लिव्हर यासारखे कलाकारही असणार आहेत. तर वरूण धवनला या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा आहेत. 

उर्वशी रौतेलाने मित्राच्या लग्नात नेसली लाखोंची साडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT