आपल्याकडे आजही अनेक गोष्टी वास्तुशास्त्र अथवा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्या जातात आणि त्याबाबत विश्वास ठेवला जातो. घरातील काही गोष्टींचा विशेषतः स्वयंपाकघरातील गोष्टींचा अधिक संबंध याच्याशी लावला जातो. घर आणि स्वयंपाकघरातील वस्तूंच्या नियमांचे पालन केले तर घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते. तसंच घरात सुखशांती टिकवून ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा कुटुंबाच्या समृद्धीसह संबंध जोडण्यात येतो. या पदार्थांची घरात कमतरता असेल तर आर्थिक समृद्धी आणि सुख समाधानाचीही कमतरता येते असा समज आहे. पण हे नेमके कोणते पदार्थ आहेत हे आपण जाणून घेऊया. हे पदार्थ नेहमी स्वयंपाकघरामध्ये असू द्यावेत असं ज्योतिषशास्त्रानुसारही सांगण्यात येते.
मीठ (Salt)
मीठ आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मीठ नसेल तर अळणी जेवण घशाखाली उतरणारच नाही. याचा वास्तुशी अत्यंत जवळचा संबंध असल्याचे सांगण्यात येते. मीठाचा संबंध हा राहू ग्रहाशी असतो. त्यामुळे मीठाची कमतरता स्वयंपाकघरात जाणवू लागल्यास, आयुष्यात राहूसंबंधी दोषांचा सामना करावा लागू शकतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. त्यामुळे घरात कधीही अगदी मीठ संपेपर्यंत तुम्ही गाफील राहू नका. कायम मिठाच्या बरणीत किमान थोडं तरी मीठ तुम्ही राहू द्या. अगदी तळाशी येईपर्यंत वाट पाहू नका. तसंच कोणाच्याही घरून तुम्ही मीठ मागून घेऊ नका. नेहमी घरातील मिठाचाच वापर तुम्ही करावा. यामुळे तुमच्या घरातील सुख, समृद्धी आणि समाधान कायम टिकून राहण्यास मदत होते.
तांदूळ (Rice)
तांदूळ हा प्रत्येक घरातील अविभाज्य भाग आहे. आपण लग्न, मुंज अथवा अन्य अनेक शुभ कार्यांना तांदळाचा अक्षता म्हणून वापर करतो. तांदळाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आणि सुख समृद्धीशी लावण्यात येतो. स्वयंपाकघरात तांदळाची कमतरता भासणे म्हणजे शुक्र ग्रहाचा दोष होणे. शुक्र ग्रहाचा कायम घरावर आशिर्वाद राहावा वाटत असेल तर कधीही तांदळाची कमतरता घरात भासू देऊ नका. तांदूळ संपण्यापूर्वीच घरात दुसरा तांदूळ भरावा. तांदूळ हा भरभराटीशी संबंधित पदार्थ मानला जातो. त्यामुळे हिंदू लग्नामध्येही तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
गव्हाचे पीठ (wheat flour)
गव्हाचे पीठ हा आपल्या घरातील अभिन्न भाग आहेत. घरात नेहमी उपलब्ध असणारी अशी ही गोष्ट आहे. अगदी फार क्वचित असे घडते की, घरातील गव्हाचे पीठ संपले आहे. पण अनेक घरामध्ये गव्हाचे पीठ पूर्ण संपवून नवे पीठ भरण्याची पद्धत असते. पण वास्तुशास्त्रानुसार हे चूक आहे. असे करू नये. गव्हाच्या पिठाचा डबा कधीही रिकामा करू नये. यामुळे कुटुंबात धनहानी होते आणि अन्य काही त्रासालाही सामोरे जावे लागते असं सांगण्यात येते.
हळद (Turmeric)
हळद ही नेहमीच शुभ मानली जाते. हळदीचा संबंध हा गुरूशी जोडण्यात येतो. गुरू कृपा असल्याने मोठमोठ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे स्वयंपाघरातमधील हळद कधीही संपू देऊ नये. यामुळे आर्थिक नुकसान, विवाहामध्ये बाधा आणि शिक्षणामध्ये अडचणी अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो असे वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. त्यामुळे नेहमी घरात हळद भरून ठेवावी. हळदीचे आणि हळदीच्या दुधाचे अनेक फायदेही आहेत.
मोहरीचे तेल (Mustard Oil)
अनेक कुटुंबामध्ये जेवणासाठी मोहरीचे तेल वापरण्यात येते. मोहरीच्या तेलाचा संबंध हा शनि ग्रहाशी आहे. घरातील तेल संपले तर शनि दोष सुरू होतो असे वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. कुटुंबावर संकटे येण्यास सुरूवात होते. त्यामुळे घरातील मोहरीचे तेल अथवा कोणतेही खाण्याचे तेल वापरत असाल तर ते कधीही पूर्ण संपवू नये.
आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडत नाही अथवा तुमच्यावर थोपवत नाही. या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या असून त्याप्रमाणे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. यावर किती विश्वास ठेवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक