व्यवसाय असो की नोकरी,प्रत्येकालाच आपल्याला यश मिळावे अशी इच्छा असते. पण आपल्या मागच्या जन्माचे काही कर्म असतात जी या जन्मात आपल्याला चांगली-वाईट फळे देतात. जेव्हापासून कोव्हीड महामारी आली आहे , तेव्हापासून बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. मुलांचे शिक्षण देखील घरूनच, ऑनलाईन झाले. आता परिस्थिती थोडी सुधारते आहे आणि पूर्वपदावर येते आहे. तरी अजूनही बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु ठेवले आहे. आणि बरेच इंटरव्यू हे अजूनही ऑनलाईन होत आहेत. अशा वेळी ऑनलाईन इंटरव्यू साठी आपण आपल्या घरात काही छोटेसे बदल करू शकतो जेणे करून घरात सकारात्मक लहरी तयार होतील आणि तुमचा इंटरव्यू चांगला जाण्यात मदत होईल. पुढे दिलेल्या काही वास्तू टिप्स फॉलो करा आणि ऑनलाईन परीक्षेत किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाल यश मिळण्यात नक्कीच मदत होईल.
ऑनलाईन इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवण्यासाठी वास्तू टिप्स
आपले घर लहान असो की मोठे, घरातली प्रसन्नता आणि सकारात्मकता ही घराच्या देखभालीवर अवलंबून असते. घरातल्या लहरी आणि वातावरण चांगले ठेवण्यासाठी व घरातील सदस्य निरोगी राहण्यासाठी घर स्वच्छ असणे खूप महत्वाचे आहे. घरातील सर्व वस्तूंना स्वतःचे एक योग्य स्थान असते. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातल्या वस्तू असल्या तर घरात नकारात्मक शक्तींना प्रवेश मिळत नाही. तसेच घरातून जेव्हा तुम्ही इंटरव्यू देता तेव्हा तिथे सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे त्यासाठी वास्तूतज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स लक्षात ठेवा.
- इंटरव्यू देताना जर तुम्ही पूर्व किंवा ईशान्येकडे तोंड करून बसलात तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.
- मुलाखतीदरम्यान काळ्यासारखे गडद रंगाचे कपडे कधीही वापरू नका. लाल किंवा हलक्या रंगाचे कपडे घाला कारण ते सौम्य आहेत आणि तुमच्या वागण्यात सौम्यता आणतात. ज्योतिषशास्त्रात शनि हा ग्रह एखाद्याच्या कर्माचा कारक आहे आणि आपण शनीची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी निळ्या रंगातील हलक्या शेडचे कपडे घालू शकता.
- मुलाखत देताना तुमचे टेबल नीटनेटके असावे. त्यावर आवश्यक तेवढ्याच वस्तू असाव्यात व अनावश्यक पसारा नसावा
- इंटरव्यू सुरु असताना व्हिडीओ ऑफ असेल तरीही शक्यतोवर काही खाऊ-पिऊ नये. जर तुम्हाला चुकून भूक लागलीच तर बिस्किटे, मिठाई यांसारख्या वस्तू तुमच्या टेबलावर ठेवा.
- शक्य असल्यास तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर निळ्या रंगाचा वॉलपेपर ठेवा.कारण हा रंग प्रेरणादायी आहे.
- कधीही मुलाखत देताना पूर्णपणे रिकाम्या भिंतीसमोर बसू नका.
- तुम्ही इंटरव्यू देत असाल तेव्हा तुमच्या टेबलवर श्रीगणेश आणि सरस्वती देवीची मूर्ती तुमच्या समोर ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवेल. आपण कुठलेही शुभ कार्य करताना सगळ्यात आधी श्रीगणेशाचे स्मरण करतो कारण गणपतीबाप्पा हा विघ्ने दूर करणारा आहे आणि देवी सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे त्यांच्या मूर्ती तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला इंटरव्यू देताना आत्मविश्वास वाटण्यात मदत होईल.
- ऑनलाईन कोर्स करताना किंवा ऑनलाईन ट्रेनिंग घेताना तुम्ही जर उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे तोंड ठेवून बसलात तर तुमचा तो कोर्स किंवा ट्रेनिंग/ अभ्यासक्रम कोणताही अडथळा न येता पूर्ण होईल. कधीही कुठलाही ऑनलाईन कोर्स किंवा अभ्यास करताना पलंगावर पडून किंवा झोपून करू नये. कोर्ससाठी बसताना खुर्चीत किंवा जमिनीवर सरळ बसावे आणि तुमचा टेबल किंवा आजूबाजूची जागा ही स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवावी.
- तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुमच्या सीव्ही/ रेझ्युमेची हार्ड कॉपी वायव्य दिशेला ठेवा, यामुळे तुमचे प्रोफाइल सक्रिय होईल आणि नोकरीचे पर्याय तुमच्याकडे येऊ लागतील असे वास्तूतज्ज्ञ सांगतात.
या टिप्स फॉलो करा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक