ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Vatpurnima Rangoli Designs

वटपौर्णिमेसाठी सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स

वटसावित्री हा सण यंदाही लॉकडाऊनमुळे सुवासिनींना हवा तसा साजरा करता येईल असं वाटत नाहीयं. पण लॉकडाऊन आणि कोरोना असला तरी सुवासिनींचा उत्साह यंदाही कायम आहे. वटपौर्णिमा माहिती असो वा वटपौर्णिमा शुभेच्छा असो सुवासिनी सर्व तयारीसह सज्ज आहेत. बाजारात वटपौर्णिमेचं साहित्य जसं फणस, सौभाग्य वाण आणि इतर गोष्टीही आलेल्या आहेतच. या सर्वांसोबतच वटपौर्णिमेला महत्त्व असतं ते रांगोळीचं. गावाकडे वडाचा मोठा पार असतो. त्यामुळे वडाच्या पाराभोवतीही सुंदर रांगोळी काढण्यात येते. 

खरंतर वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचं आणि त्याच्या सान्निध्यात राहण्याचं महत्त्व आहे. यानिमित्ताने बायका देवळात जाऊन किंवा जवळच्याच वडाची पूजा करतात. या निमित्ताने इतर सुवासिनींची भेट होते. एकमेंकीना वटपौर्णिमेचे वाण दिले जाते. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे सगळ्यांनाच शक्य होईल असं वाटत नाही. तसंही बऱ्याच नोकरदार महिला घरच्याघरी वडाची फांदी आणून त्याची पूजा करण्याला पसंती देतात. यामागचं कारण म्हणजे वेळेची बचत. आता घरच्याघरी पूजा करायची म्हटल्यावर त्या ठिकाणी रांगोळी काढणं हे आलंच. त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर आणि सोप्या रांगोळीच्या डिझाईन्स खास POPxo मराठीच्या वाचकांसाठी.

ठिपक्यांनी काढलेली वटपौर्णिमेची सोपी रांगोळी

Instagram

प्रत्येक मैत्रिणीला जास्त नक्षीची रांगोळी काढणे जमतेच असं नाही. काही वेळा आपल्याला तेवढा वेळही नसतो. पण शास्त्र म्हणून रांगोळी काढायची असल्यास हे डिझाईन तुमच्यासाठी उत्तम आहे. तुळजाभवानी रांगोळी आणि आर्टने काढलेली ही रांगोळी सोपी आणि सुंदर आहे. फक्त ठिपके आणि रंगांचा वापर करून ही वटपौर्णिमा रांगोळी काढली आहे. रांगोळीसाठी वापरलेले रंगही अगदी वटपौर्णिमेसाठी असतात, तेच आहेत. ठिपक्यांच्या साहाय्याने काढलेले मणी मंगळसूत्र आणि लाल पिवळा व हिरवा रंगाने काढलेली रांगोळीची बॉर्डर आकर्षक दिसत आहे.

ADVERTISEMENT

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन

सौभाग्यवाणासोबत वटपौर्णिमा रांगोळी

Instagram

पिवळ्या रंगावर काढलेलं वडाचं सुंदर झाड आणि त्याच्या पारंब्या तसंच वडाच्या खोडाला वाहिलेलं हळदी कुंकू अशी रांगोळी लव्हने काढलेली छान सुटसुटीत रांगोळी आहे. या रांगोळीच्या बाजून सोभाग्यवाणाने केलेली सजावटही आकर्षक आहे. त्यासोबतच प्रार्थना सौभाग्याची लिहून वटपौर्णिमा आणि सुवासिनींचं असलेलं नातंही अधोरेखित केलं आहे. वटपूजनासाठी तुम्हीही अशी सुंदर आणि सुबक रांगोळी नक्की काढा.

वटपौर्णिमेसाठी हिरवीगार रांगोळी

Instagram

ADVERTISEMENT

वटपौर्णिमा म्हणताच आपल्या डोळ्यासमोर येणारे चित्र म्हणजे वडाला फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करणाऱ्या सुवासिनी. हेच डोक्यात ठेवून ही सुंदर हिरवीगार अशी आकर्षक रांगोळी रेखाटली आहे अदितीने. हिरवा वड, हिरव्या पानावरील सोभाग्याचं वाण आणि हिरवी साडी लेऊन आलेली सुवासिनी असं डिझाईन असणारी ही सुंदर रांगोळी आहे. सुवासिनीच्या हिरव्या साडीची कल्पनाही सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या खणाच्या साड्यांवरून घेतल्याचं पदरावरील नथीच्या डिझाईनने कळत आहे. तुम्हीसुद्धा ही सुंदर रांगोळी नक्की रेखाटून पाहा.

वटपौर्णिमेसाठी पान वापरून साकारलेली रांगोळी

Instagram

पहिल्या रांगोळी डिझाईनपेक्षाही हे पानाच्या मदतीने साकारलेलं रांगोळी डिझाईन अगदीच सोपं आहे. पानांच्या साहाय्याने साकारलेली रांगोळी ही पर्यावरणपूरक ही आहे. पाच पाने, सौभाग्यवाण आणि रांगोळीच्या मदतीने काढलेले हे स्नेह आर्ट वटपौर्णिमा रांगोळी डिझाईन अगदी युनिक आहे. चारही पानांवर वटपौर्णिमेच्या पूजेचं साहित्य आणि एका पानावर काढलेलं वडाचं झाड तर खाली काढलेली नथ ही अप्रतिम अशीच आहे. मोठी रांगोळी काढण्यासाठी जागा नसल्यास किंवा शक्य नसल्यास ही युनिक रांगोळी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

वटपौर्णिमेसाठी युनिक रांगोळी

Instagram

ADVERTISEMENT

वटपौर्णिमा म्हटल्यावर प्रत्येक रांगोळीत वडाचं झाड आणि सौभाग्य वाण आपण वरील डिझाईन्समध्ये पाहिलंच आहे. पण या रांगोळी डिझाईनची खासियत आहे, ते पणत्या आणि बांगड्याचा वापर करून केलेली रांगोळीची सजावट. प्रियल फूड आणि आर्ट्सने काढलेली सुंदर रांगोळी डिझाईन खूपच छान आहे. मध्यभागी काढलेलं वडाचं झाड, दोन हिरवी पान आणि त्यावर रेखाटलेले दागिने, वटपौर्णिमा लिहून त्याच्या मध्यभागी काढलेलं हळदी-कुंकू फारच सुरेख आहे. त्यात भर पडली आहे ती पणत्यांच्या प्रकाशाची आणि हिरव्यागार काचेच्या बांगड्याची. ज्या या रांगोळी डिझाईनला अजून सुंदर बनवत आहेत.

अशा प्रकारे तुम्हीही नेहमीच्या डिझाईनमध्ये रांगोळी काढण्याऐवजी वरील सुंदर आणि युनिक रांगोळी डिझाईन वटपौर्णिमेला रेखाटू शकता. POPxo च्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

23 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT