home / रेसिपी
पावसाळी भाज्या

पावसाळ्यात या भाज्यांचा घ्या आस्वाद, मिळतील भरपूर फायदे

 पाऊस सध्या म्हणावा तितका सुरु झालेला नाही. पण पाऊस आल्यानंतर जितका आनंद येतो. तितक घराबाहेर पडण्याचा फारच जास्त कंटाळा येतो. अशावेळी मस्त काहीतरी चमचमीत आणि गरम गरम खावेसे वाटते. पावसाळी भाज्या या दिवसात अगदी आवर्जून खाल्ल्या जातात. पण खूप पाऊस असेल अशावेळी बाजारात जाऊन भाजी घेण्याइतका कोणत्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही. पण भाज्या या आहाराचा अविभाज्य भाग आहे. त्या न घेऊन कसे चालेल. अशावेळी काही अशा भाज्या तुम्ही पावसाळ्यात करायला हव्यात ज्यामधून तुम्हाला भरपूर फायदे मिळण्यास मदत होईल.

या गोष्टी आणून ठेवा घरात

पावसात काही गोष्टी घरात आणून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्यापासून झटपट अशा भाज्या बनवता येतील. सुकी भाजी, रस्सा अशा गोष्टी करुन तुम्ही मस्त या जेवणाचा आनंद घेऊ शकता. सोयाबीन चंक्स, मका, कडधान्य अशा काही गोष्टी घरात आणून ठेवा. या दिवसात मका खाण्याची इच्छा होते. त्यामुळे पिवळे कॉर्नही आणून ठेवा. त्यापासून अनेक रेसिपी बनवता येतात. चटपटीत कॉर्न रेसिपी या चवीला मस्त लागतात. शिवाय पोटाच्या आरोग्यासाठीही कॉर्न चांगले असतात

सोयाबीनची भाजी

सोयाबीनची भाजी

सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. ही भाजी चवीला जितकी चांगली तितकीच ती आरोग्यासाठी चांगली असते. या दिवसात भाजी घेता आले नाही तर तुम्हाला सोयाबीनची भाजी करता येते. कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम सोयाबीन करते. सोयाबीनमध्ये असलेले घटक हाडांना मजबूत करण्याचे काम करते. सोयाबीन रेसिपी नक्की करा ट्राय

साहित्य: एक वाटी सोयाबीनचे चंक्स, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, लसूण, पावभाजी मसाला,लाल तिखट, गोडा मसाला, कोथिंबीर, मीठ, तेल 

कृती :

  • एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. पाण्याला उकळी आली की, त्यामध्ये सोयाबीन चंक्स घाला. ते फुलले की त्यातले पाणी काढून टाका. ते चांगले पिळून घ्या.
  • दुसरीकडे कढई गरम करुन त्यामध्ये तेल घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण परतून घ्या. त्यात लाल तिखट घालून मग टोमॅटो चांगला शिजेपर्यंत परता.
  • त्यात पावभाजी मसाला, गोडा मसाला घालून त्यात पिळलेले सोयाबीन घाला. चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्या. वरुन थोडासा पावभाजी मसाला भुरभुरुन कोथिंबीर घाला. तुमची मस्त सोयाबीन भाजी तयार 

अधिक वाचा : विविध कोबी भाजी रेसिपी | Kobichi Bhaji Recipe | Cabbage Recipes In Marathi

मक्याची भाजी

मक्याची भाजी

आतापर्यंत तुम्ही मका फक्त उकडून किंवा भाजून खाल्ला असेल पण तुम्ही कधी मक्याची भाजी खाल्ली आहे का? मक्याची भाजी ही चवीला अप्रतिम लागते. पोळीसोबत ही भाजी खूपच मस्त लागते. मक्यामध्ये लोह असते.त्यामुळे शरीरातील आर्यनची कमतरता भरुन निघते. इतकेच नाही तर पावसात आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी इम्युनिटी बुस्ट करण्याचे काम करते.

अधिक वाचा : शिळ्या पनीरने होऊ शकते नुकसान, असे ओळखा शिळे पनीर

साहित्य: मक्याचे दोन कणीस,  दोन कांदे, दोन टोमॅटो, जीर, कडीपत्ता, हिरवी मिरची, आलं-लूसण पेस्ट, किचन किंग मसाला, दही, हळद, धणे-जीरे पूड, अर्धी वाटी दही

कृती :

  • एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात मीठ आणि हळद घालून मक्याचे दाणे शिजायला ठेवा. 
  • कढईत तेल गरम करुन त्यामध्ये जीरं आणि कडीपत्याची फोडणी द्यायची आहे. फोडणी चांगली तडतडली की, त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घालून कांदा टोमॅटो घालून छान परतून घ्या. त्याला चांगले तेल सुटले की, त्यात किचन किंग मसाला, धणे पूड घालून परतून घ्या. आता त्यात दही फेटून घाला.
  • पाणी घालून चांगली ग्रेव्ही करा. त्यात मक्याचे दाणे घालून आदाण येऊ द्या. आवश्यकतेनुसार मीठ घाला.  तुमची भाजी तयार

    आता पावसाळ्यात हिरव्या भाज्या मिळाल्या नाही तर या रेसिपी नक्की करा ट्राय 
22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text