चांगला आहार उत्तम आरोग्यासाठी फारच फायद्याचा असतो. उत्तम आरोग्यासोबत चांगली त्वचा मिळवण्यासाठीही आहार हा फार महत्वाचा आहे. त्वचा चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही आहारात काही खास भाज्यांचा समावेश करायला हवा. त्यामुळे तुमची त्वचा सुंदर राहण्यास मदत मिळेल. भाज्यांचे सेवन करताना अशा भाज्यांचे एक दिवस सेवन करुन चालणार नाही. तर या भाज्यांचे सेवन तुम्ही किमान महिन्याभरासाठी करायला हवे. तरचं तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये झालेला बदल दिसून येईल. जाणून घेऊया नेमकं कोणत्या भाज्यांमुळे तुमची त्वचा चांगली होते.
कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा
मेथी
मेथी ह पालेभाजी खूप जणांच्या आवडीची भाजी आहे. ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबतही चांगली लागते. पालेभाजी ही नेहमी पोटासाठी चांगली असते. मेथीच्या भाजीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस,प्रथिने आणि व्हिटॅमिन्स मिळतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. पोटाचे आरोग्य चांगले राहिले की, त्वचा चांगली राहते. शिवाय या भाजीमध्ये कमी तेल असल्यामुळे ती चांगली पचते. पोट साफ होते. त्यामुळे आठवड्यातून किमान तीनवेळा तरी मेथीच्या भाज्यांचे सेवन करा. त्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले राहील. मेथीची भाजी वेगवेगळ्या पद्धधतीने खाऊ शकता.
फळांचा असा वापर करुन मिळवा तजेलदार त्वचा
पालक
पालकची भाजी तुम्हाला आवडत असेल तर ती तुमच्या त्वचेसाठी फारच चांगली आहे. पालकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह असते. याशिवाय पालकमध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन C,A आणि K मोठ्या प्रमाणात असते. ज्याच्या सेवनामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. पालकातील या उपयुक्त घटकांमुळे त्वचेवरील पुरळ आणि डाग कमी होण्यास मदत मिळते. उन्हामुळे डॅमेज झालेली त्वचा चांगली होण्यासही मदत मिळते. त्यामुळे पालकची भाजी आणि पालकाचे सूप करुन तुम्ही प्या. पालकची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला देखील त्याची चव आवडेल.
दुधी भोपळा
दुधी भोपळा ही भाजी खूप जणांना आवडत नाही. या भाजीची चव खूप जणांना आवडत नाही. त्यामुळे ही भाजी खाल्ली जात नाही. पण या भाजीमध्ये व्हिटॅमिन C,A आणि फायबर असतात. त्यामुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. त्याशिवाय दुधी भोपळामध्ये आवश्यक असे घटक असतात. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात दुधी भोपळा घ्या. त्यापासून तुम्ही रस किंवा भाजी करुन खा.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल
पिवळी शिमला मिरची
शिमला मिरची ही देखील आहारात असायलाच हवी. शिमला मिरची खाल्ल्यामुळे त्वचेवर पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते. शिमला मिरची खायची असेल तर तुम्ही मस्त भाज्यांचे सेवन करा. ढोबळी मिरचीमध्ये पायथोकेमिकल्स असते जे तुमची त्वचा चांगली ठेवण्याचे काम करते.यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल घटक असतात. जे त्वचा चांगली करण्याचे काम करते. तुमच्या त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी पिवळी शिमला मिरची फारच फायद्याची ठरते. आहारात याचा समावेश करण्यासाठी तुम्ही याची भाजी करु शकता. याशिवाय तुम्ही त्याचा रस प्या.
आता या भाज्यांचा समावेश करा आणि सुंदर त्वचा मिळवा.