logo
Logo
User
home / मनोरंजन
veteran-actress-helen-comeback-from-movie-brown-with-karisma-kapoor-at-the-age-of-80-in-marathi

वयाच्या 80व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूडमध्ये पुनरागमन

कॅब्रे क्वीन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर आणि ओठांवर एकच नाव येतं ते म्हणजे ‘हेलन’ (Helen). 80 चं दशक गाजवणारी नटी म्हणजे हेलन. हेलन हे नाव कोणी ऐकलं नाही असं अजिबात नाही. आजची पिढीही हेलनच्या गाण्यावर तितकीच मजेत थिरकताना दिसून येते. हेलन यांनी आपल्या नृत्याच्या जोरावर त्याकाळी अनेकांची मनं जिंकून घेतली होती. हेलन यांचं चित्रपटसृष्टीतील आणि नृत्यातील योगदान हे अमूल्य आणि अजरामर आहे. सलीम खान (Salim Khan) यांच्याशी लग्न झाल्यानंतर हेलन चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. आता पुन्हा एकदा वयाच्या 80व्या वर्षी हेलन बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत. 60 वर्षांपेक्षा अधिक या इंडस्ट्रीत हेलन यांनी काम केले आहे. तर आता दिग्दर्शक अभिनय देव (Abhinay Deo) यांच्या ब्राऊन या चित्रपटातून एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला हेलन येत आहे. 

करिश्मा कपूरबरोबर दिसणार हेलन 

‘दिल्ली बेली’फेम दिग्दर्शक अभिनय देव यांच्या ‘ब्राऊन’(Brown) या चित्रपटातून हेलन पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सह हेलन यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असून अभिक बरुआ यांचे पुस्तक ‘सिटी ऑफ डेथ’यावर आधारित हा चित्रपट बनविण्यात येणार आहे. अभिनय देव आणि करिश्मा कपूर यांनी आपल्या सोशल मीडिका अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. या चित्रपटामध्ये कोलकाता शहराची पार्श्वभूमी असून इतक्या वर्षानंतर पुन्हा काम करताना थोडा नर्व्हसपणा आला असल्याचे हेलन यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला सांगितले आहे. 

हेलन यांनी व्यक्त केल्या भावना 

हेलन सध्या अत्यंत आनंदी असून चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, हेलन म्हणाल्या की, ‘इतक्या वर्षानंतर जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाबाबत विचारणा झाली तेव्हा टीमला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे मला कळलं होतं. मी या भूमिकेविषयी अधिक अभ्यास केला आणि सेटवर काम करताना आपण काम अधिक एन्जॉय करायचं आहे असं ठरवलं’, पुढे त्यांनी सांगितले की, ‘आम्ही चित्रपट करत असताना स्क्रिप्ट, वाचन, एकमेकांबरोबर रिहर्सल हे सर्व हॉलीवूडमध्ये होतं. तर इतक्या वर्षांनी परत आल्यानंतर कामात झालेले बदल पाहून मला खूपच आश्चर्य वाटत आहे. हे बदल चांगले असले तरी मी मात्र थक्क झाले आहे. आता ज्याप्रकारे काम होतं, ते आधीच्या काळात होत नव्हतं.’ हेलन एक उत्तम कलाकार असून गेल्या अनेक वर्षात त्यांनी 700 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आता 80 व्या वर्षीही त्या काहीतरी वेगळं करायला मिळत आहे, म्हणूनच या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहेत असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. 

दरम्यान हेलन यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात आपला सावत्र मुलगा सलमान खान (Salman Khan) याच्यासह काम केलं होतं. सलमान खान हेलन यांना आपल्या आईप्रमाणेच वागणूक आणि दर्जा देतो, त्यामुळे सलमानसह पुन्हा कधी काम करणार असाही प्रेक्षकांचा हेलन यांना प्रश्न होता. मात्र इतक्यात तरी कोणतंही प्रोजेक्ट सलमानसह काम करण्यासारखं आपल्या हातात नाही असं हेलन यांनी सांगितलं आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text