ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Vijay Deverakonda leave Liger promotions midway in Marathi

विजय देवरकोंडाला पाहून फॅन्स झाले क्रेझी, थांबवावं लागलं ‘लायगर’चं प्रमोशन

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा ‘लायगर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सहाजिकच सध्या ही दोघंही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसले. एवढंच नाही तर मुंबईत सगळीकडेट या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. विजय देवरकोंडाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे साऊथ प्रमाणे मुंबईतही त्याचा मोठा चाहता वर्ग दिसून येत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान फॅन्स क्रेझी झाल्यामुळे इव्हेंट रद्द करत विजय देवरकोंडाला निघून जावं लागलं.

दिवसेंदिवस वाढतेय विजय देवरकोंडाची क्रेझ 

विजय देवरकोंडा नुकताच नवी मुंबईत लायगरच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये आला होता. मात्र तिथे महिला चाहत्यांनी इतकी गर्दी केली की त्यांना आवरणं कठीण जाऊ लागलं. विजय देवरकोंडाला पाहून मुली खूप भावूक झाल्या. एक दोन तर त्याला पाहून चक्क बेशुद्ध झाल्या. ज्यामुळे आयोजकांना कार्यक्रम अर्ध्यावर थांबवावा लागला. विजय स्टेजवर येताच फॅन्स इतक्या क्रेझी झाल्या की कार्यक्रमातून विजयला पळ काढावा लागला. विजयला स्टेजवर प्रत्यक्ष पाहून मुलींनी एकच गोंधळ केला होता. या गोंधळात काही जणी बेशुद्ध झाल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला.

विजय देवरकोंडाचा चाहता वर्ग

साऊथ चित्रपट अर्जुन रेड्डी पासून विजय देवरकोंडाची क्रेझ वाढताना दिसत आहे. साऊथ आणि नार्थच नाही तर संपूर्ण जगभरात तो महिला चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. चाहत्यांमध्ये बॉलीवूड अभिनेत्रीही मागे नाहीत. कॉफी विथ करण या शोमध्येही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती. या कार्यक्रमात सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यात तो कोणाला जास्त आवडतो याची चुरस दिसून आली. आता मुंबईतील कार्यक्रमात फिमेल फॅन्स विजयला नुसतं पाहूनच बेशुद्ध झाल्यामुळे ही गोष्ट अधिकच सिद्ध झाली. विजयला पाहून मुलींना त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत ज्यामुळे कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. पुढे कार्यक्रम रद्द करून विजयला तिथून निघून जावं लागलं. विजय देवरकोंडाचा लायगर 25 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT