क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना सोमवारी मुलगी झाली. त्यांनी ही आनंदवार्ता शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडे याची चर्चा होऊ लागली. सेलिब्रिटी कपलमधील हे कपल मोस्ट सर्चेबल कपल आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक हालचालींवर सगळ्यांचे लक्ष असते. अनुष्का आणि विराटने प्रेग्नंसीची गुडन्यूज दिल्यानंतर नव्या वर्षात पाहुणा येणार असे आधीच सांगितले होते. त्यामुळे जानेवारी महिना सुरु झाल्यापासूनच त्यांच्या अकाऊंटवर सगळ्यांचे लक्ष होते. सोमवार ( 11 जानेवारी) त्यांनी एक पोस्ट शेअर केली आणि मुलगी झाली हो! ही आनंदाची बातमी सांगितली. पण यासोबतच त्यांनी हा खासगी आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असल्यामुळे कोणीही याबद्दल अधिक विचारणा करु नये असा मेसेजही त्या पोस्टमध्ये लिहिला होता. पण आज विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने मुलीचा पहिला फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी
कुटुंबाने अशा पद्धतीने केले स्वागत
विकास कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने मुलीच्या इटुकल्या पिटुकल्या पायांचा फोटो शेअर करत खाली कार्टून रचत त्यावर वेलकम असे म्हटले आहे. त्याने हा फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काहीच मिनिटात त्याच्या व्हिडिओ लाईक्स मिळाल्या आहेत. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याने हा पावलांचा फोटो शेअर केल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. कारण अनेकांना विराटची मुलगी कशी दिसते याची अधिक उत्सुकता होती. पण सध्या तरी तिचे फोटो तो शेअर करेल असे मुळीच वाटत नाही. काल अनुष्का शर्माने शेअर केलेल्या पोस्टमधून तरी ही गोष्ट स्पष्ट होते की, त्यांना सध्या तरी मुलीला अजिबात दाखवण्याची इच्छा नाही.
ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून नायराची एक्झिट, शिवांगी जोशीने सोडली मालिका
बनू द्यायचे नाही दुसरा तैमूर
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या अफेअर्सपासून ते लग्नापर्यंत आणि प्रेग्नंसीपासून ते अगदी बाळ होईपर्यंत सगळ्या गोष्टी सोशल मीडियासाठी आवडीचा विषय झाला आहे. जर तुम्हाला त्यांच्या लग्नाची गोष्ट आठवत असेल तर त्यांनी इथे कोणालाही कळू न देता इटलीमध्ये जाऊन लग्न केले. पापाराझीपासून दूर जात त्यांनी त्यांचा हा लग्नसोहळा आनंदाने अनुभवला होता.त्यामुळे लग्नातील तिचे फोटो पापाराझींना टिपता आले नाहीत. लग्नानंतर त्यांनीच त्यांचे फोटो शेअर केले आणि काही फोटो व्हायरल देखील केले. त्यामुळे सोशल मीडियापासून दूर जात प्रायव्हसी राखणे हे या दोघांना आवडते हे स्पष्ट होते. एका मुलाखती दरम्यान अनुष्का शर्माने खोचक उत्तर देत त्यांच्या बाळाला दुसरा तैमूर करायचे नाही असे देखील सांगितले होते. त्यामुळेच या दोघांची मुलगी काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहील हे चांगलेच आहे.
प्रेग्नंसीमध्ये केले फोटोशूट
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी पाळणा हलावा असे अनेकांना वाटत होते. लग्न झाल्यापासूनच आनंदाची बातमी कधी याकडे अनेकांचे लक्ष होते. लॉकडाऊन दरम्यान अनुष्काने एक फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नंसीबद्दल सांगितले. त्यानंतर ती अनेक खासगी कार्यक्रमात दिसली. ज्यामध्ये तिने तिचा बेबी बंप दाखववाल होता. तिने एका प्रसिद्ध मॅगजीनसाठी प्रेग्नंसीत फोटोशूटही केले जे अनेकांना आवडले.
आता विराटच्या कुटुंबाकडून मुलीचा हासुंदर फोटो शेअर करत हा आनंद सगळ्यांसोबत शेअर केला आहे.
Bigg Boss : राखी सावंतला डिवचणे जास्मिन भसीनला पडले भारी, झाली बेघर