ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
दही बनवण्याची सोपी पद्धत

दही लावण्याची ही व्हायरल ट्रिक येईल नक्कीच कामी

 खूप जणांच्या आहारात अगदी नित्यनेमाने दही असते. दह्याचे फायदे अनेक आहेत. दही ( Dahi) खाण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आहे. काही जण दही मोडून खातात. म्हणजे दह्यापासून ताक, लस्सी असे पदार्थ करुन खातात. ज्यांच्या आहारात नित्यनेमाने दही असेल अशांना रोज रोज बाहेरुन दही आणणे परवडेलच असे नाही. शिवाय आपण घरी केलेले दही शुद्ध आणि ताजे असते हे देखील आपल्याला माहीत असल्यामुळे त्यात कोणतीही शंका देखील नसते. दही बनवण्याची साधारण पद्धत ही एकच आहे. म्हणजे कोमट दुधात एखादा चमचा बनवलेल्या दह्याचे विरजण घालून ते ठेवले जाते. त्यानंतर दही जमायला सुरुवात होते. ही सर्वसाधारण आणि शास्त्रशुद्ध पद्धत आहे असे आपण म्हणायला हवे. पण हल्ली काही अशा व्हायरल ट्रिक तुम्ही पाहिल्या असतील ज्यामध्ये घट्ट दही लावण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या जातात चला जाणून घेऊया अशाच काही व्हायरल पण दही बनवण्याच्या यशस्वी ट्रिक्स

मिल्क पावडरपासून दही

मिल्क पावडरपासून दही

मिल्क पावडरचा उपयोग करुन तुम्ही कधी दही बनवले आहे का? नसेल बनवले तर आता बनवा हे दही चवीला फारच गोड असते. हे दही खाल तर खातच राहाल. 

  1. एका भांड्यात एक कप दूध घ्यावे. 
  2. दूधात साधारण दोन मोठे चमचे मिल्क पावडर घेऊन ती चांगली एकजीव करुन घ्यावी. त्यात गुठल्या अजिबात होऊ देऊ नका. 
  3. दुधाच्या गुठल्या मोडल्या की, त्यात  साधारण 7 कप आणखी दूध घालावे.
  4.  हे दूध चांगले उकळून घ्यावे. दूध उकळताना एक काळजी घ्यावी की, दूध करपणार नाही. 
  5. दूध चांगले उकळले की, मग ते थंड करावे. इतके की ते कोमट व्हावे. त्यानंतर त्यात एक चमचा दही घालावे. हे सात ते आठ तास तसेच ठेवावे. मस्त गोड दही तयार 

मिरचीपासून दही

मिरचीपासून दही हे कसं शक्य आहे. असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही व्हायरल ट्रिक नक्कीच ट्राय करायला हवी. 

  1. दूध उकळून ते कोमट करुन ध्या. या दुधात देठ असलेली मिरची घाला.  साधारण 1 ते 2 मिरच्या या पुरेशा आहेत. 
  2. घरात दही नसेल त्यावेळी ही ट्रिक कामी येते. साधारण 12 तास ठेवल्यानंतर हे दूध जाड होते. याचा वापर करुन तुम्ही दही बनवू शकता. ज्याचे दही बनवायचे त्या कोमट दुधात तुम्ही हे मिसळा. गरम ठिकाणी सात ते आठ तास ठेवा. दही छान तयार झालेले असेल. 

क्विक बनणारे दही

दही बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळेच खूप जण दही विकत घेण्याचा विचार करतात. ही एक ट्रिक अशी आहे ज्यामुळे दही पटकन सेट होते. 

ADVERTISEMENT
  1. दह्यासाठी तुम्हाला जे दूध हवे ते दूध घ्या. टोन्ड मिल्क घेणार असाल तर तुम्ही ते आधी उकळून जाड करुन घ्या. 
  2.  दूध थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये विरजण घालावे. ते विरजण घालून एका विस्कच्या मदतीने तुम्ही ते चांगले विस्क करुन घ्या. त्यामुळे दही खूप चांगले लागते. 
  3. दही सेट करायला ठेवताना तुम्ही थोडेसे झाकण उघडे ठेवावे. म्हणजे त्याला वाराही लागतो. दही सेट झाल्यावर ते थंड करायला ठेवावे. तुमचे मस्त गोड दही तयार 

आता अशापद्धतीने परफेक्ट दही नक्की बनवा

07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT