ADVERTISEMENT
home / आरोग्य
vitamin-c-drinks-to-boost-immunity-to-fight-in-summer-in-marathi

विटामिन सी ज्युस, जे वाढवतात तुमची प्रतिकारशक्ती

कोरोना आल्यानंतर सर्वांनाच आपल्या आरोग्याबाबत अधिक काळजी घ्यायला हवी याची जाण आली आहे. निरोगी आयुष्य ही आपली प्राथमिकता आहे. निरोगी जीवनशैलीमध्ये राहणे आणि रोगमुक्त राहणे हे सध्या अधिक गरजेचे आहे. शरीराला योग्य पोषण मिळणे, शारीरिक व्यायाम, व्यवस्थित झोप आणि तणावमुक्त आयुष्य यासह जगायला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मागच्या दोन वर्षांपासून आपल्या आरोग्यासाठी प्रतिकारशक्ती किती महत्त्वाची आहे हे सर्वांनाच जाणवले आहे. प्रतिकारशक्तीचे महत्त्व आता वेगळे सांगण्याची गरज नाही. निरोगी जीवनशैलीसाठी तुम्हाला शरीरातील रोग, बॅक्टेरिया, संक्रमण यापासून सुरक्षित राहणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शरीराला विटामिन सी ची अधिक गरज भासते. विटामिन सी मध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे हाडे, दात मजबूत होतातच याशिवाय अन्नपचन अधिक चांगले होण्यास मदत मिळते. तसंच जखमदेखील भरली जाते आणि केसांचे आरोग्यही राखले जाते. त्यामुळे तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विटामिन सी पदार्थाचे तुम्ही सेवन करायला हवे. 

विटामिन सी मुळे मिळणारे फायदे 

1. विटामिन सी मध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात जे प्रतिकारशक्ती अधिक प्रमाणात निर्माण करण्यास मदत करतात. तसंच हानिकारक संक्रमण आणि आजारापासून वाचविण्यास मदत मिळते 

2. विटामिन सी ने अधिक भरलेले खाद्यपदार्थ रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतात

3. विटामिन सी चे नियमित सेवन केल्यामुळे रक्तातील युरिक असिडचा स्तर कमी होतो. यामुळे तुमच्या शरीराती उर्जा अधिक प्रमाणात राहाते 

ADVERTISEMENT

4. विटामिन सी एनिमिया आणि लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करते 

5. विटामिन सी मुळे मनोभ्रंश आणि स्मृतीविकाराचा आजारही कमी होतो

यासाठी विटामिन सी चे काही ज्युस तुमच्या नियमित आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करून घ्यायला हवे. क जीवनसत्त्वाचे आहारामध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. विटामिन सी चे असे कोणते ज्युस आहेत, जे तुम्ही बनवू शकता ते आपण पाहूया – 

विटामिन सी युक्त पेय (Vitamin C Juice)

Vitamin C Juice

स्ट्रॉबेरी – किवी ज्युस – विटामिन सी, बी1, बी6, बी12 ने युक्त असणारे हे ज्युस प्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत करते. तसंच संक्रमण रोखण्यासही मदत करते. तुम्हाला स्ट्रॉबेरी हे फळ आवडत असेल तर तुम्ही नुसत्या स्ट्रॉबेरीचाही ज्युस करून पिऊ शकता

ADVERTISEMENT

संत्रे – द्राक्षे ज्युस – हे विटामिन ए आणि सी ने अधिक युक्त असते. तसंच धुळीपासून तुम्हाला त्रास होत असेल तर यापासून वाचविण्याचे काम संत्रे आणि द्राक्षाचा ज्युस करते

टॉमेटो ज्युस – तसे तर टॉमेटो आपण भाजी अथवा कोशिंबीरसाठी नेहमी वापरतो. पण टॉमेटोचा ज्युसदेखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो. टॉमेटोच्या रसामध्ये विटामिन ए, सी आणि मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असते. अशाप्रकारे संक्रमणापासून रोखण्यासाठी याची मदत मिळते

हिरवे सफरचंद – गाजराचा ज्युस – या ज्युसमध्ये विटामिन ए, सी आणि बी6 अधिक प्रमाणात असते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही नियमित या ज्युसचा आहारात समावेश करून घ्यावा 

बीट – गाजर – आल्याचा रस – यामध्ये विटामिन ए, सी, बी6, बी9 अधिक प्रमाणात असते. शरीराला आलेली सूज, सर्दी अथवा तापाची काही लक्षणे असतील तर ती जाण्यासाठी या ज्युसचा वापर करता येतो. तसंच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास हा ज्युस उपयोगी ठरतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून किमान दोन वेळा तरी हा ज्युस विटामिन सी वाढविण्यासाठी प्यायला हवा. 

ADVERTISEMENT

तुम्हीही या ज्युसचा वापर तुमच्या नियमित आयुष्यात करून नक्की पाहा. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून तुम्ही आजार नक्की दूर ठेऊ शकता.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT