त्वचा जास्तीत जास्त काळ चिरतरुण राहावी असे प्रत्येक महिलेला वाटते. पुरुषही यात आता मागे नाहीत. चेहरा चमकदार स्वच्छ आणि नितळ असेल तर लोक मागे वळून नक्की पाहतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना हल्ली अनेकजण दिसतात. तुमची त्वचा डल झाली आहे का? त्वचेवर तजेला परत मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या स्किनकेअरमध्ये विटामीन सी (Vitamin C) चा समावेश करायला हवा. विटामीन सी चा समावेश नेमका कसा करता येईल यासाठी आम्ही आज तुमच्यासोबत काही प्रॉडक्टस शेअर करत आहोत. जे तुमच्या स्किनकेअर रुटीनसाठी आणि कोणत्याही त्वचेसाठी 100 % नैसर्गिक आहेत.
ORGANIC VITAMIN C FACE WASH
सगळ्यांच्याच दिवसाची सुरुवात ही छान चेहरा धुवून होते. चेहरा स्वच्छ असेल तर सकाळ प्रसन्न वाटते. त्यातच विटामीन सी ने युक्त असलेल्या अशा फेसवॉशचा वापर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचे फायदे देखील मिळतात. या फेसवॉशमध्ये असलेल्या अकाय बेरी आणि डेझी फ्लॉवरचे गुणधर्म तुमची त्वचा स्वच्छ करते पण त्याचा ग्लोसुद्धा अबाधित ठेवते. पोअर्समध्ये अडकलेली घाण काढून त्यांना लहान करण्याचे काम हा फेसवॉश करते. इतकेच नाही तर अनईवन स्किनटोन, रफ टेक्श्चर आणि डल त्वचा उजळवण्याचे काम हा फेसवॉश करते.
ORGANIC VITAMIN C FACE TONER
त्वचा टोन्ड करण्यासाठी विटामीन सी हे फारच गरजेचे असते. उघडलेल्या पोअर्सचा आकार कमी करुन त्वचेचा पीएच बॅलन्स सुधारण्यासाठी हे फेस टोनर फारच उपयोगी पडते. टोनरचा उपयोग रात्री झोपताना करा. कॉटनच्या बॉलवर तुम्ही थोडेसे टोनर घेऊन चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमची त्वचा अघिक चांगली दिसते. या शिवाय तुमच्या त्वचेला एक सुरक्षा कवच देण्याचे काम टोनर करते. कोणत्याही त्वचेसाठी हे टोनर उत्तम आहे.
ORGANIC VITAMIN C FACIAL KIT
महिन्यातून एकदा फेशिअल करणे हे फारच गरजेचे असते. कोणते फेशिअल करावे असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांच्यासाठी सोयीस्कर असा पर्याय म्हणजे विटामीन सी. कारण याचा फायदा सगळ्यांना होतो. विटामीन सी त्वचेवर ग्लो आणण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते. या फेशिअल किटमध्ये क्लिन्झर, स्क्रब, मसाज जेल, मसाज क्रिम आणि फेस सीरम असते जे त्वचा रिफ्रेश करण्यास मदत करते. हे प्रॉडक्टस त्वचेवर फारच हळुवारपणे काम करतात. त्वचेच्या अन्य समस्या कमी करण्यासही हे फेशिअल मदत करते.
ORGANIC VITAMIN C DAY CREAM
त्वचा मॉश्चराईज ठेवण्यासाठी आपल्याला डेली क्रिम लावणे फार गरजेचे असते. घरात असाल किंवा बाहेर जाणार असाल तुम्ही त्वचेवर काहीतरी क्रिम लावून बाहेर पडणे फारच गरजेचे असते. त्वेचसाठी तेलकट नसलेले असे क्रिम आपल्याला नेमकी हवी असते. आम्ही तुमच्यासाठी निवडलेले हे क्रिम असेच आहे. जे तुमच्या त्वचेला अकाय बेरीचे गुणधर्म देतात. तुमची त्वचा चांगली करण्यास मदत करतात.
ORGANIC VITAMIN C FACE SERUM
हल्लीच्या स्किनकेअर रुटीनमध्ये सीरम हे अगदी स्वाभाविक आहे. चेहऱ्याला लावल्यामुळे तुम्हाला एक इन्स्टंट ग्लो मिळवून देण्यास ते मदत करत असते. अन इवन स्किनटोन, रुक्ष त्वचा आणि त्वचेवर असलेला डलनेस घालवण्यास हे सीरम मदत करते. त्यामुळे दररोज आंघोळीनंतर तुम्ही हे सीरम त्वचेवर लावण्यास काहीच हरकत नाही.
आता चमकदार त्वचा मिळवण्यासाठी विटामीन सी असलेले असे प्रॉडक्टस वापरायला काहीच हरकत नाही. हे प्रॉडक्टस 100 % नैसर्गिक असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुम्हाला होणार नाहीत