ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
उत्तम त्वचा हवी असेल तर असे हवे #Nightroutine

उत्तम त्वचा हवी असेल तर असे हवे #Nightroutine

त्वचेची काळजी घेण्याचा विचार जेव्हा मनात येतो. तेव्हा आपण सगळं काही करायला तयार असतो. म्हणजे कोणी सांगितलं मी अमूक एक त्वचेला लावते त्यामुळे माझी त्वचा तुकतुकीत राहते. हे तुम्ही ज्यावेळी ऐकता त्याच्या अगदी दुसऱ्या मिनिटाला तुम्ही तुमच्या त्वचेसाठी तसेच काहीसे करायला जाता. दिवसभरात तुम्ही त्वचेवर इतके अत्याचार करता की किमान रात्रीतरी तुम्ही तुमच्या त्वचेला आराम देणे फारच गरजेचे असते. म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत एक #Nightroutine शेअर करणार आहोत. तुमच्या त्वचेच्या प्रकार कोणताही असला तरी देखील तुम्ही हे रुटीन फॉलो करु शकता आणि सुंदर त्वचा मिळवू शकता. आता तुम्हाला वाटेल आणखी एक स्कीन टिप म्हणजे खर्च जरा जास्तच असेल. पण असे काहीही नाही तुम्हाला अगदी घरच्या घरी ही काळजी घेता येते. मग जाणून घेऊया तुमच्या त्वचेसाठी #Nightroutine

म्हणून रोज सकाळी भिजवलेले बदाम खाण्याचा दिला जातो सल्ला

चेहरा करा स्वच्छ (Wash your face)

shutterstock

ADVERTISEMENT

तुम्ही मेकअप करत असाल किंवा नसाल तरी तुम्ही रात्री झोपताना तुमचा चेहरा स्वच्छ करणे गरजेचे असते. दिवसभर तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये अनेक गोष्टी जात असतात. माती, धूळीचे कण यामध्ये अडकतात. त्यामुळे होते असे की तुम्ही ते काढले नाहीत तर तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. म्हणून घरी आल्यानंतर तुम्हाला वेळ नसेल तर रात्री झोपताना तुम्हाला कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुता आला उत्तम. कोमट पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स ओपन होतात. तुम्ही जर असे करताना चांगला फेसवॉश वापरला तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तुमची त्वचा छान स्वच्छ होते.

आठवड्यातून एकदा करा स्क्रब (Scrub baby!)

तुमची त्वचा जर खूप अॅक्नोप्रोन असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेला स्क्रब करा. त्यामुळे तुमच्या पोअर्समध्ये अडकलेली घाण अगदी चांगल्या पद्धतीने निघते. तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही फार जाड किंवा जखम करणारे स्क्रब वापरु नका कारण त्यामुळे तुमची त्वचा डॅमेज होते. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करा. 

नाईटमास्कही गरजेचा (Nightmask needed)

जर तुम्ही नाईट मास्क वापरला असेल तर तुम्हाला त्याचे फायदे माहीतच असतील.  वेगवेगळ्या कंपनीचे नाईट मास्क बाजारात मिळतात. ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायचे असते. आणि तसेच ठेऊन द्यायचे असते. हे नाईट मास्क ट्रान्सफरंट असतात त्यामुळे तुमच्या त्वचेवर छान शोषले जातात. तुमची त्वचा रिलॅक्स करण्यापासून तुमच्या त्वचेला टाईट करण्याचे काम करते त्यामुळे तुमची त्वचा अधिका चांगली दिसू लागते. 

Split Ends ची समस्या करायची असेल दूर तर वापरा मेयोनीज

ADVERTISEMENT

करा हातांनी मसाज

shutterstock

जर तुम्हाला तुमची त्वचा चिरतरुण राहावी असे वाटत असेल तर तुम्ही  त्याची काळजी घेण्यासाठी मसाज केला तर तुमची त्वचा रिलॅक्स होण्यास मदत मिळेल. तुम्हाला तुमच्या बोटांनी डोळ्यांभोवती गालावर आणि हनुवटीवर मसाज करायचा आहे. असा मसाज तुम्ही दररोज केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तुमची त्वचा घट्ट राहील. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला आरामदेखील मिळेल. जर तुम्हाला रात्री काहीच लावायला आवडत नसेल तर तुम्ही नुसता मसाज केला तरी चालू शकेल. 

आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. तुमच्या त्वचेला आरामाची गरज असते जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे नाईट रुटीन सेट केले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच जाणवेल.

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा. https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

31 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT