हल्ली सगळ्यांचीच घर फारशी मोठी नसतात. त्यामुळे खूप मोठे वॉर्डरोब किंवा कपाट असेल नाही. कपाट कितीही मोठी असली तरी देखील महिलांना जागा पुरत नाही ही गोष्ट वेगळी. काही जणांना कपाटात कपडे घुसवून ठेवायची सवय असते. त्यांना काहीही करता कपडे नीट ठेवता येत नाही. तुमच्या कपाटात कमी जागा असे तर तुम्ही ऑनलाईन काही छान ऑर्गनाझर घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गोष्टी नीट ठेवता येतील. शिवाय कोणीही तुमचे कपाट उघडले तरी देखील ते दिसायला छान दिसेल आणि तुमची लाज वाचेल. (कारण खूप जणांना घरी कोणी आले की कपाट उघडावे असे अजिबात वाटत नाही.त्यांच्यासाठी हा विषय खूप मदत करणारा असणार आहे.)
साडी बॉक्स
आता महिलांचे कपाट म्हटले की, त्यात साड्या आल्याच. तुमच्याकडेही खूप ठेवणीतल्या साड्या असतील तर महिला अशा साड्या बॅगमध्ये भरुन ठेवतात. पण तुम्हाला तसे करायचे गरज नाही. ठेवणीतल्या साड्या असल्या तरी त्या तुमच्या समोर राहिल्या आणि नीट राहिल्या तर त्या तुम्हाला नेसता येतात. त्यांच्यासोबत तुम्ही ब्लाऊज देखील ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला त्या पटकन मिळतात. ठेवणीतल्याच साड्या नाही तर रोजच्या साड्या देखील तुम्हाला अशा प्रकारे साडी बॉक्समध्ये ठेवता येतात. त्या छान राहतात आणि छान दिसतात.
कॉस्मेटिक्स बॉक्स
ज्यांच्याकडे ड्रेसिंग टेबल नाही. अशांना त्यांच्या कपाटातच त्यांच्या कॉस्मेटिक्स ठेवाव्या लागतात. आता कॉस्मेटिक्स असतील तर ते रोजच्या रोज वापरणे फारच गरजेचे असते. बरेचदा कपाटात घाईघाईत काही गोष्टी वापरताना त्या इकडे तिकडे पडून जातात. दुसऱ्या दिवशी मग त्या काही केल्या सापडत नाही. मग आपल्या सगळ्यांचीच चीडचीड होऊ लागते. एक वस्तू शोधताना आपल्याला नकोसे होते. तुम्हाला तुमचे कॉस्मेटिक्स एकत्र ठेवायचे असतील तर तुम्ही त्यासाठी एक प्लास्टिक ओपन बॉक्स घ्या. त्यामध्ये सगळे व्यवस्थित सगळे ठेवता येते. ते आवरणे देखील फार सोपे असते.
क्लोझेट डिवायडर
घरात लहान मुलं असतील तर त्यांचे छोटे कपडे नीट ठेवणे गरजेचे असते. विशेषत: पँटी, ब्रा नीट ठेवल्या नाही तर कपाट उघडल्यानंतर ते कुठेही दिसतात. आता तुम्हाला असा गोंधळ झालेला नको असेल तर तुम्ही हे क्लोझेट डिवायडर घ्या. क्लोझेट डिवायडर घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये पँटी आणि ब्रा नीट ठेवू शकता. कपाटात ऑर्गनायझर चांगले राहतात. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास हे असे ऑर्गनायझर घ्यायला हवे. त्यामध्ये वेगवेगळे आकार देखील मिळतात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ते घेता येतात.
साई़ट पाऊच
कपाटातील सगळी जागा संपली असेल तर कपाटाच्या दरवाज्यांना खूप जण छान पाऊच अरेंज करतात. अशा पाऊचमध्ये तुम्हाला लहान लहान गोष्टी ठेवता येतात. त्यामध्ये साडडीच्या पीना, केसांच्या पीना, रुमाल आणि कानातले असे प्रकार ठेवता येतात. त्या गोष्टी यामध्ये एकदम छान राहतात. असे साईड पाऊच देखील तुम्ही घेऊ शकता. पारदर्शक किंवा रंगाचे असे प्रकार तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घेता येतात.
आता तुमच्या कपाटातील काही पसारा आवरायला या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करु शकतील.