जागा बदलली की, अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागतो. हा त्रास इतर वातावरणाशी जुळते घेण्याचा असतो. काही जणांना पोटाचे विकार होतात. तर काही जणांना त्वचेचे विकार होतात. अनेकदा हा त्रास केवळ पाण्याच्या बदलामुळे होतो? आता तुम्ही म्हणाल पाण्याचा काय संबंध? तर या सगळ्यासाठी पाण्याचाच संबंध असतो. रोजच्या पाण्यापेक्षा जरा वेगळे पाणी आपल्या शरीरात गेले की, त्वचेला लागले त्रास होतो असे अनेकांना वाटते. पण खरंच पाणी बदलले की, त्याचा त्वचेवर परिणाम होतो का? या संदर्भातील तथ्य तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत. चला जाणून घेऊया या विषयीचे तथ्य
पाण्यामध्ये फरक असतो का?
मुंबई किंवा शहरामध्ये राहणाऱ्यांच्या घरात पालिकेकडून पाणी येते. धरणात साचलेल्या पाण्याला शुद्ध करुन ते पाणी घरी सोडले जाते. किचनपासून ते बाथरुमपर्यंत सगळीकडे हे पाणी वापरले जाते. तुम्ही जे पाणी रोज वापरता त्या पाण्याची सवय तुमच्या त्वचेला झालेली असते. त्यामुळे असे पाणी तुम्हाला योग्य वाटते. पण अचानक ज्यावेळी तुम्ही इतर ठिकाणी जाता त्यावेळी तुम्हाला तेथील पाणी सूट झाले नाही असे आपण अनेकदा म्हणतो. कारण पाण्याचा स्त्रोत हा बदलत असतो. बोअरिंगचे पाणी (Hard Water) चवीला आणि वापराला खूप वेगळे असते. त्यामुळे पाण्या पाण्यामध्ये फरक असतो का? तर हो प्रत्येक पाण्यात फरक असतो.
पाण्याचा त्वचेवर परिणाम होतो का आणि कसा
अचानक दुसऱ्या ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर किंवा गावातून शहरात आल्यानंतर खूप जणांना त्वचेच्या समस्या जाणवू लागतात. पाण्यामध्ये असलेले वेगवेगळे मिनरल्स आणि खनिजे यासाठी कारणीभूत असतात. नेमका ते कसा परिणाम करतात ते जाणून घेऊया.
- पाण्यामध्ये असलेली खनिजे ही सगळ्यात जास्त वाईट असतात. त्वचेच्या आणि केसांच्या पोअर्समध्ये जाऊन त्या बसतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता असतो. काहींना केसगळती होते. तर काहींची त्वचा ही रुक्ष वाटू लागते.
- पाणी बदलले की, त्वचेला खाज येणे किंवा त्यावर लाल चट्टे उटणे असे त्रास होऊ शकतात.
- खूप जणांना शुद्ध म्हणजेच नदी किंवा नैसर्गिक पाणी ही त्रासदायक ठरु शकते. कारण त्यामध्ये असलेले घटक खूप जणांना जड पडतात.
- जर तुम्हाला सातत्याने चेहऱ्यावर मोठ मोठे फोड येण्याचा त्रास होत असेल तर त्यासाठी पाणी देखील कारणीभूत असू शकते. इतकेच नाही पाण्यासोबत तेथील वातावरणाचा त्रासही खूप जणांना होऊ शकतो.
- त्वचेवर जर खरपुड्या होत असतील.त्यातील ग्लो निघून गेला असेल तर तुम्हाला पाण्याचा त्रास झाला आहे असे समजावे.
जर तुम्हाला असा त्रास सातत्याने होत असेल तर तुम्ही कुठेही गेल्यानंतर पाणी वापरताना जपून करायला हवा. त्याचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर योग्य प्रॉडक्टचा वापर करा.