मानवी शरीर हे सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. त्यामुळ निरोगी राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी शरीरात जायला हवं. असं म्हणतात की यासाठी नियमित कमीत कमी आठ ग्लास पाणी दिवसभरात प्यायला हवं. पाणी पिण्याचे शरीरावर अनेक चांगले फायदे होतात. मात्र अनेकांना पाणी पिण्याचा फार कंटाळा असतो. खूप प्रयत्न करूनही त्यांना पाणी पिण्याचा विसर पडतो. कारण पाण्याला विशेष अशी चव नसते. त्यामुळे पाणी पिण्याबद्दल आवड दिसून येत नाही. जर पुरेसं पाणी शरीराला मिळालं नाही तर शरीर डिहायड्रेट होतं आणि मॅटाबॉलिक कामात अडथळे येतात. सहाजिकच यामुळे तुमचे वजन वाढू लागते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले पण पुरेसं पाणी प्यायला नाही तर तुम्हाला हवा तसा फरक दिसून येत नाही. दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi) देखील अनेक होतात. पण जर तुम्हाला पाणी पिण्याचा कंटाळा असेल तर आहारात कमीत कमी रसदार भाज्या आणि पाणीदार फळं यांचा समावेश जरूर करा. एवढंच नाही तर नारळपाणी पिण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Coconut Water Benefits In Marathi) यासाठी जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या भाज्या असायला हव्या.
वजन कमी करायचं आहे मग खा या भाज्या
अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या इन्साग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने याबाबत योग्य मार्गदर्शन केलं आहे. भाग्यश्रीचा फिटनेस पाहता तुम्ही देखील यानुसार तुमच्या आहारात बदल करू शकता.तिच्या मते जर तुम्हाला पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही नव्वद टक्के पाण्याचा अंश असलेल्या काकडी, टोमॅटो, कोबी, पालेभाज्या, मशरूम, कांद्याची पात, दोडकं, तोंडलीची भाजी, लेट्यूस, झुकिनी, लाल भोपळा आणि दुधी भोपळा अशा भाज्यांचा समावेश आहारात जरूर करायला हवा.
रसदार भाज्या खाण्याचे फायदे
रसदार भाज्या आहारात असण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर यामुळे तुमचे शरीर पुरेसे पाणी मिळाल्यामुळे हायड्रेट राहते. शिवाय तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे यामुळे योग्य पचन होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी अशा भाज्या आहारात असायलाच हव्या. तुमच्या शरीरात पाण्याचा अंश संतुलित राहिल्यामुळे तुम्ही फ्रेश राहता आणि तुम्हाला थकवा जाणवत नाही. इन्सुलीनची पातळी सुधारल्यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो. शरीराला योग्य प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट मिळतात त्यामुळे आजारपण दूर राहते आणि सर्वात महत्त्वाचे तुमच्या पोटात पुरेसे फायबर्स गेल्यामुळे मॅटाबॉलिझम सुधारते आणि वजन कमी होते. भाज्यांचे विविध प्रकार आहेत. वर दिल्या प्रमाणे अनेक भाज्या आणि फळं तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. ज्या भाज्या कच्चा स्वरूपात खाल्ल्या जातात अशा भाज्यांपासून सलाड बनवा, स्मुदी बनवा. ज्या भाज्या तुम्ही शिजवू शकता त्यांचा भाजी, रसभाजी, स्टार्टर अशा गोष्टींमध्ये समावेश करा. अशा प्रकारे दररोज एकतरी रसदार भाजी तु्मच्या आहारात असायलाच हवी. याासोबच वाचा वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या | Weight Loss Tips In Marathi