ADVERTISEMENT
home / आरोग्य
उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करा हे व्यायाम प्रकार

उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करा हे व्यायाम प्रकार

उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा आणि प्रचंड उकाडा… अशा उकाड्यात काही खावं अथवा करावं असं वाटत नाही. व्यायाम करण्याचा तर प्रचंड कंटाळा येतो, कारण व्यायामानंतर अंगातून जास्तच घाम येतो. मात्र या काळातही शरीर अॅक्टिव्ह राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं. कारण वातावरणामुळे आलेला थकवा व्यायामामुळे दूर होतो. मात्र यासाठी तुम्हाला जीममध्ये हेव्ही एक्सरसाईझ करण्याची गरज नाही. छोट्या छोट्या अॅक्टिव्हिटीज करून तुम्ही उन्हाळ्यात स्वतःचा फिटनेस राखू शकता.यासोबतच जाणून घ्या Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

भरपूर चाला

चालणं हा एक उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. त्यामुळे नियमित चालून अथवा जॉगिंग करून तुम्ही अॅक्टिव्ह राहू शकता. आजकाल असे अनेक अॅप्स आहेत जे तुम्हाला चालता चालता अथवा धावता धावता तुमचं टारगेट साध्य करण्यास मदत करतात.  तुम्ही लहान असा अथवा वयस्कर तुमच्या वयाच्या ग्रुपनुसार तुम्ही पार्कमध्ये चालण्याची अॅक्टिव्हिटी करू शकता.

गेम्स खेळा

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की मुलं मामाच्या गावाला अथवा स्वतःच्या गावी जाण्याचा हट्ट करतात. अशा वेळी चार नातेवाईक एकत्र आले की गप्पांमध्ये कसा वेळ जातो ते समजत नाही. तुम्ही देखील असं गावी अथवा एखाद्या खेडेगावात असाल तर मस्क गेम्स खेळा. मुलं अथवा मित्रमंडळींसोबत गेम्स खेळता खेळता शरीराला चांगला व्यायाम मिळतो. मात्र अशा वेळी बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, स्विमिंग अशा अॅक्टिव्हिटी करणं नक्क्कीच फायद्याचं ठरेल.

डान्स पार्टी करा

पार्टी म्हटली की डान्स हा आलाच… आठवा किती दिवस झाले तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यावर ठेकाच धरला नाही. मग आता वाट कसली पाहतात… घरातच मस्त डान्स पार्टी आयोजित करा. ज्यामुळे मित्रमंडळी, कुटुंब अथवा नातेवाईकांसोबत छान वेळ घालवता येईल. शिवाय डान्समुळे तुम्ही अॅक्टिव्ह आणि फ्रेशदेखील व्हाल.

ADVERTISEMENT

जिन्याचा वापर सुरु करा

उन्हाळ्यात कठीण व्यायाम करायचे नसतील तर सोपा उपाय म्हणजे लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करणे. जरी हा उपाय साधा आणि जुनाच असला तरी खूप परिणामकारक आहे. जिन्याचा वापर केल्यामुळे तुमच्या पाय आणि कंबरेला चांगला व्यायाम मिळतो. ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते आणि तुम्हाला कायम फ्रेश वाटत राहते. 

वेकेशनवर जा

वेकेशनवर जाणार असाल तर असं पर्यटन स्थळ निवडा जिथे तुम्ही सतत अॅक्टिव्ह राहाल. जिथे हायकिंग, रॉक क्लायबिंग, रिव्हर राफ्टिंग, रिव्हर क्रॉसिंग अशा अॅक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतील. अॅडव्हेंचर गेम्समुळे तुम्ही सक्रिय राहाल आणि वेकेशनमुळे फ्रेश व्हाल.

योगासने करा 

योगासन हा व्यायामाचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये तुमचे मन आणि शरीर दोन्ही संतुलित राहते. शिवाय योगासने करण्यासाठी तुम्हाला घराबाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी योगासनांचा व्यायाम करू शकता. प्राणायम, हात आणि पायाला सक्रिय ठेवणारी योगासने करून तुम्ही उन्हाळ्यात फिट राहू शकता. यासोबतच वाचा वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा, वापरा ट्रिक्स – Exercises To Gain Weight In Marathi

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
30 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT