खूप जणांकडे लग्नातील हळद म्हणजे एक वेगळाच उत्सव असतो. लग्न कसे ही असो पण हळद ही दमदारच असायला हवी. हळदीत सगळे इतकी धमाल करतात की, त्या दिवशी नवरीसुद्धा आपल्या लुककडे अधिक लक्ष देते. तुमचीही हळद आहे किंवा एखाद्या खास मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या हळदीसाठी तुम्हाला जायचे असेल तर या दिवशी तुमचा लुक एकदम मस्तच असायला हवा. हळदीसाठी फार काही विशेष करायचे असते असे नाही. अगदी घरीच तुम्ही तुमचा हळदीचा लुक ठरवू शकता. हळदीसाठी खास लुक करताना तुम्हाला कपडे आणि मेकअप याबद्दलची अधिक माहिती देणारा हा लेख
हळदीसाठी काय घालायचे आहे?
हळदीसाठी सगळे असे कपडे निवडतात. ज्या कपडे फेकले तरी चालतील. खूप जण यासाठी महागडे कपडे नक्कीच निवडतात. पण काहींना मात्र हा खर्च नका असतो. कमीत कमी खर्चात तुम्हाला हळदीसाठी लुक करायचा असेल तर तुम्ही साडी किंवा ड्रेस असा पर्याय निवडू शकता. साडी हा एव्हरग्रीन असा पर्याय आहे. कारण साडी या तुम्हाला अगदी बेसिक रेंज पासून मिळू शकतात. जर तुम्ही कुडता घालायचा विचार करत असाल तर तुम्ही कुडता आणि पायजमा किंवा वेगवेगळ्या पँटस ट्राय करु शकता. त्या देखील चांगल्या दिसतात. हळदीच्या दिवशी खूप जण पिवळाच रंग घालतात. पण तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुम्ही मस्त वेगळा रंग घाला. हिरवा, गुलाबी, निळा असे काही रंग या दिवशी छान दिसतात. इतकेच नाही तर तुम्ही त्यामध्ये छान उठून सुद्धा दिसता. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वेगळा रंग निवडा. तुमच्या स्कॉडसाठी एक कॉमर रंग आणि तुमच्यासाठी वेगळा असे असेल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये खुलून दिसता.
हळदीसाठी ज्वेलरी
हल्ली हळदीसाठी बाजारात खास ज्वेलरी मिळतात. या ज्वेलरी आता तुम्ही खूप जणांना घातलेल्या पाहिल्या असतील. पण तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर तुम्ही खरी फुलं किंवा क्विलिंगचे दागिने घालू शकता. हे दागिने काढून फेकले तरी चालू शकतात. साडी असो वा एखादा ड्रेस किंवा लेहंगा जरी असेस तर अशावेळी तुम्हाला हेवी ज्वेलरी नाही तर रिफ्रेशिंग ज्वेलरीची गरज असते. त्यामुळे तुम्ही जेवढी लाईट ज्वेलरी निवडला तेवढे तुम्ही चांगले दिसाल. ज्वेलरी निवडताना जर साडी पिवळी असेल तर त्याचा विरुद्ध अशी ज्वेलरी हवी. जर तुम्ही साडी एकदम साधी नेसली असेल तर त्यावर हेवी ज्वेलरी घालायला काहीच हरकत नाही.
हळदीसाठी खास बॉलीवूडची गाणी, तुमचेही पाय थिरकतील
हळदीचा मेकअप
खूप जणांकडे हळदीचा कार्यक्रम हा खूप मोठा असतो. इतका की, नवरीचा चेहराही ओळखता येत नाही. एवढी हळद लावली जाते. तुमच्याकडेही अशी हळद लावली जात असेल तर तुम्ही कमीत कमी मेकअप केलेला बरा. कारण त्यामुळे तुमची त्वचा खराब होण्याची शक्यता असते. हळदीच्या दिवशी तुम्ही जितका कमी दिसेल असा मेकअप करा कारण असाच मेकअप जास्त छान दिसतो. मेकअप करण्याआधी तोंडाला भरपूर मॉश्चरायईजर लावायला विसरु नका. त्यामुळे तुमची त्वचा खराब होत नाही.
आता हळदीसाठी खास लुक करताना या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या.