ADVERTISEMENT
home / Bridal Mehendi
नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या

नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या

नागपूर म्हटलं की डोळ्यासमोर येते ती केशरी रंगाची संत्र्यांची बाजारपेठ. याच वैशिष्ठ्यामुळे नागपूरला ‘संत्रानगरी’ असंही म्हटलं जातं. महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भातील एक मोठं शहर यामुळे नागपूरला विशेष स्थान प्राप्त झालं आहे. नागपूर शहरात आणि आजूबाजूच्या शहरांमधील पर्यटनस्थळांमुळे अनेक पर्यटक या शहराकडे ओढले जातात.

नागपूर शहरात लग्नाची शॉपिंग करण्यासाठीदेखील अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही मनसोक्त खरेदी करू शकता. नागपूरात अनेक ठिकाणं, बाजारपेठा, मॉल्स आणि सुपरमार्केट आहेत जिथे तुम्ही एकाच ठिकाणी अनेक गोष्टींची खरेदी करू शकता. सिल्क, एथनिक, कॉटनचे पारंपरिक कपडे, त्यावर मॅचिंग फुटवेअर आणि दागदागिने तुम्हाला खरेदी करायचे असतील तर नागपूरात शॉपिंग करणं परफेक्ट ठरेल.

लग्न ठरल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नाची शॉपिंग. प्रत्येकजण तुम्हाला शॉपिंग केलीस का, शॉपिंग या ठिकाणी कर, शॉपिंग करताना काय काय काळजी घेशील, कोणत्या ठिकाणी काय खरेदी करावं असे सल्ले देत असतं. मात्र असे अनेकांचे सल्ले ऐकण्याने तुम्ही आणखी कन्फ्युज होता. यासाठीच आम्ही तुम्हाला नागपूरात लग्नाचे कपडे, दागदागिने, मेंदी कुठे खरेदी करावी याची माहिती देत आहोत. आम्ही सूचवलेल्या बाजारपेठा नागपूरातील जुन्या आणि लोकप्रिय आहेत. जिथे तुम्हाला विविध प्रकारच्या गोष्टी स्वस्त दरात मिळू शकतात.

wedding shopping nagpur 6

ADVERTISEMENT

 

Table Of Contents

1. Wedding Clothes Shopping In Nagpur

2. सिताबर्डी मार्केट (Sitaburdi Market)

ADVERTISEMENT

3. मेंदी आणि मेंदी आर्टिस्टसाठी (Mehandi Shops In Nagpur)

4. लग्नासाठी दागिने कुठे खरेदी कराल (Jewellery Shopping In Nagpur)

 

 

ADVERTISEMENT

लग्नासाठी नागपूरात शॉपिंग करणार असाल तर या ठिकाणांना जरूर भेट द्या-

नागपूरात लग्नासाठी कपडे खरेदी – Wedding Clothes Shopping In Nagpur

महल इतवारी मार्केट (Mahal Etwari Market)

इतवारी मार्केटला नागपूरातील सर्वात जुनी बाजारपेठ अशी ओळख आहे. ज्या वस्तू विदर्भात मिळत नाहीत त्या वस्तू तुम्हाला इतवारी मार्केटमध्ये नक्कीच मिळू शकतात. या मार्केटमध्ये तुम्हाला अनेक अनेक छोटी छोटी दुकाने खरेदीसाठी उपलब्ध आहेत. जिथे तुम्ही लग्नासाठी कपड्यांची खरेदी करू शकता.  

Also Read : नागपूर मधील डिझायनर बुटीक

सिताबर्डी मार्केट (Sitaburdi Market)

wedding shopping nagpur

सिताबर्डी मार्केट रोड ही नागपूरातील खरेदी करण्यासाठी उत्तम आणि फार जुनी बाजारपेठ आहे. तुम्ही इथे कपड्यांपासून ते अगदी फुटवेअर पर्यंत अनेक गोष्टींची खरेदी करू शकता. विविध गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे ही बाजारपेठ सतत माणसांनी भरलेली असते.

ADVERTISEMENT

कसे जाल- सिताबर्डी मार्केट मेन रोडवर ही बाजारपेठ आहे.

काय घ्याल- कपड्यांपासून फुटवेअरपर्यंत अनेक फॅशनेबल गोष्टी

गांधी मार्केट (Gandhibagh)

नागपूरात गांधी बागेत होलसेल क्लॉथ मार्केट आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे कपडे मिळू शकतात. लग्नासाठी साड्या, ड्रेस आणि इतर कपडे होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळू शकतात. लग्नघर म्हटलं की भेटवस्तू देणं आलंच. लग्नात आहेर स्वरूपात तुम्हाला अनेकांना भेटवस्तू द्यायच्या असतात. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना नेहमी कपड्यांचा आहोर केला जातो. अशा वेळी भरपूर प्रमाणात साड्या आणि ड्रेसची खरेदी करावी लागते. या ठिकाणी तुम्हाला होलसेल रेटमध्ये कपड्यांची खरेदी करता येऊ शकते. या ठिकाणी अनेक होलसेलची दुकाने आहेत. जिथे ट्रेंडनुसार डिझाईनर साडी, वर आणि वधूचे कपडे, मेन्स वेअर खरेदी करू शकता. शिवाय यासोबतच कोल्हापूरी चपला आणि इतर वस्तूदेखील तुम्हाला स्वस्त दरात मिळू शकतात. नागपूरची प्रसिद्ध संत्रीदेखील तुम्हाला या मार्केटमध्ये मिळू शकतात.

wedding shopping nagpur 4

ADVERTISEMENT

नागपूरात मॉलमध्ये शॉपिंग करणार असाल तर या मॉल्सनां भेट द्या-

मॉल ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक गोष्टी मिळू शकतात. मॉलमध्ये विविध ब्रॅंडच्या विविध गोष्टी विकत घेता येतात. जर तुम्ही मार्केटच्या फेऱ्या मारून थकला असाल अथवा तुम्हाला लग्नाची खरेदी करण्यासाठी फार वेळ नसेल तर तुम्ही तुमची शॉपिंग खाली दिलेल्या मॉल्स आणि सूपरमार्केटमध्ये नक्कीच करू शकता.

  • पुनम मॉल (Poonam mall)
  • सेंट्रल मॉल (Central mall)
  • इंटरनिर्टी मॉल (Eternity mall)
  • मिलेनिअम शॉपिंग मॉल (Millenium shopping mall)
  • इंप्रेस सिटी मॉल (Empress city mall)
  • अपना बाझार Apna bazar

मात्र मॉल आणि सूपरमार्केट तुम्हाला इतर कोणत्याही शहरात मिळू शकतात. जर तुम्हाला स्पेशल नागपूरमधील खरेदी करायची असेल तर नागपूरातील बाजारपेठांमध्ये फिरणंच सोयीचं ठरेल.

मेंदी आणि मेंदी आर्टिस्टसाठी (Mehandi Shops In Nagpur)

wedding shopping nagpur 2

मेंदी लावणं हे लग्नकार्यांत शुभ मानलं जातं. नववधूचं रूप मेंदीच्या रंगाने आणखी खुलून येतं. लहान मुलीपासून ते वृद्ध स्त्री पर्यंत सर्वांनाच मेंदी लावण्याची आवड असते. मात्र आजकाल बाजारात भेसळयुक्त मेंदी विकली जाते. त्यामुळे मेंदी चांगल्या मार्केटमधून खरेदी करणं फार गरजेचं आहे. शिवाय लग्नात मेंदी काढण्यासाठी कुशल आर्टिस्टकडून मेंदी काढावी लागते. कारण नववधूची मेंदी हा लग्नात एक आकर्षणाचा विषय असतो.

ADVERTISEMENT

मुबारक मेंदी सेंटर (Mubarak Mehandi Center)

पत्ता-

H No 1037, शांती नगर, नया पूरा हायस्कुल समोर,नागपूर, 440002

कृष्णा टॅटूज आणि मेंदी आर्टिस्ट (Krishna Tattoos And Mahendi Artist)

पत्ता –  H No. 92/ B, WHC रोड, धरमपेठ, नागपूर – 440010, गॉटमेअर मार्केट गोकुळपेठ, मिल्टन मॉलच्या समोर

फतेमी दुल्हन मेंदी कोन

पत्ता – बोरा मस्जिद जवळ, बंगाली पंजा, तांडापेठ, नागपूर.

ADVERTISEMENT

डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट

लग्नासाठी दागिने कुठे खरेदी कराल (Jewellery Shopping In Nagpur)

wedding shopping nagpur 1

धरमपेठ मार्केट रोड (Dharmapeth Shopping Street)

सिताबर्डीनंतर धरमपेठ बाजारपेठ ही नागपूरातील एक लोकप्रिय बाजारपेठ आहे. धरमपेठ रस्त्यावर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे अनेक गोष्टी विकत घेऊ शकता. मात्र जर तुम्हाला लग्नासाठी दागिने खरेदी करायचे असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी बेस्ट  आहे. कारण या रस्त्यावर अनेक मोठमोठ्या ब्रॅंडेड सोनारांची दुकाने आहेत. धरमपेठ बाजारपेठेत सोनाराच्या दुकांनाचे मोठमोठे शोरूम्स आहेत. जिथे तुम्हाला निरनिराळ्या डिझाईन्सचे दागिने मिळू शकतात. म्हणूनच कपड्यांची शॉपिंग झाल्यावर त्यावर मॅच होतील असे दागिने तुम्ही खरेदी करू शकता.

सराफा बाजार (Sarafa Bazar)

नागपूरातील सराफा बाजारात तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या आणि अनेक गोष्टी खरेदी करू शकता. मात्र या बाजारपेठेत तुम्ही दागिन्यांची खरेदीदेखील नक्कीच करू शकता. कारण

ADVERTISEMENT

कसे जाल – इतवारी रोडवर ही बाजारपेठ आहे

काय खरेदी कराल- साडी, कपडे, दागिने, सुका मेवा आणि बेकरी प्रॉडक्टस

अलंकार मार्केट (Alankar Market)

नागपूरातील अलंकार मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या दागदागिन्यांची खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सोन्याच्या, हिऱ्याच्या आणि विविध खड्यांमधील दागिने मिळू शकतात.

कसे जाल- सराफा बाजार, इतवारी मार्केट, नागपूर

ADVERTISEMENT

wedding shopping nagpur 3

मिठाई आणि गोड पदार्थ (Sweet Shops In Nagpur)

लग्न म्हटलं की मिठाई आणि पक्वान्नं ही आलीच. लग्न घरात सतत पाहुण्यांची वर्दळ असते. अशा वेळी घरात गोडाधोडाचे आणि स्नॅक्सचे पदार्थ असायलाच हवेत. कारण मंगल कार्यांत गोड वाटण्याची पद्धत आहे. नागपूरात गेल्यावर मिठाई म्हटंली तर एकमेव नाव सर्वांच्या तोंडात येतं ते म्हणजे हल्दीराम. हल्दीरामची अनेक दुकानं नागपूरात तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात. या दुकांनामध्ये स्पेशल संत्र्याची बर्फी पासून ते अनेक प्रकारच्या मिठाई  आणि नमकीन पदार्थ मिळतात. ज्यामुळे तुमच्या घरी लग्नासाठी आलेले पाहुणे नक्कीच खूश होऊ शकतात. शिवाय लग्नसोहळ्या दरम्यान वधू अथवा वराकडे लग्नातील विधींसाठी जाताना देखील तुम्हाला या मिठाईचा उपयोग होतो. हल्दीरामप्रमाणेच तुम्ही इतर अनेक मिठाईच्या दुकानातून खरेदेी करू शकता. सीताबर्डीमधील श्री हिरा स्वीट्स, अमरावती रोड, वाडी येथील बॉम्बेवाला स्वीट्स अॅंड नमकीन त्याचप्रमाणे अमृतलाल स्वीट्स खरेदीसाठी उत्तम आहेत.

आमची शिफारस – हल्दीरामची राजभोग मिठाई खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.

नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या

ADVERTISEMENT

FAQs-

लग्नाची शॉपिंग कधी सुरू करावी ?

लग्नाची तारिख ठरल्यावर लवकरात लवकर लग्नाची शॉपिंग सुरू करणं गरजेचं आहे. कारण लग्नाच्या इतर तयारीच्या गडबडीत नंतर तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ काढणं शक्य होत नाही. वधू आणि वराची खरेदी ही लग्नातील सर्वात महत्त्वाची खरेदी असते. यासाठीच लग्नाच्या आधी कमीत कमी चार ते पाच महिने खरेदी करण्यास सुरूवात करा. मात्र फार आधीदेखील खरेदी करू नका कारण फॅशनचा ट्रेंड सतत बदलत असतो. त्यामुळे तुमच्या लग्नादरम्यान कोणता ट्रेंड आहे याचा विचार करा.

लग्नाची शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी ?

लग्नाची शॉपिंग करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित नियोजन करा. कारण तुमचा लग्नसोहळा कसा आणि  किती दिवस असेल, कोणकोणत्या विधींना तुम्ही कोणता पेहराव करणार, लग्नात द्यायच्या भेटवस्तू काय असतील, इतर वस्तू आणि दागदागिने, हनिमुनसाठी खरेदी या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा. एका वहीत त्याची नीट नोंद करा.  ज्यामुळे तुम्हाला कोणती खरेदी कुठे,कधी करायची आणि खरेदीचं बजेट ठरवणं सोपं जाईल.

wedding shopping nagpur 5

शॉपिंगसाठी जाण्यासाठी नागपूरला कसे जावे?

नागपूर शहर एक मोठे शहर असल्याने अनेक मार्गांनी तुम्ही नागपूरला जाऊ शकता. मुंबई, दिल्ली वरून नागपूरला जाण्यासाठी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आहेत. तुम्ही विमानमार्गाने देखील नागपूरला जाऊ शकता.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

 

 

 

ADVERTISEMENT

 

 

30 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT