ADVERTISEMENT
home / Planning
वेडिंग शॉपिंगसाठी  पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या (Wedding Shopping In Pune)

वेडिंग शॉपिंगसाठी पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या (Wedding Shopping In Pune)

पुणे या शहराची ओळख महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी आहे. पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे पुण्यात तुम्हाला टिपीकल मराठमोळ्या वस्तू सहज उपलब्ध होतात. कारण आजही पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीचं जतन केलं आहे. असंच काहीसं आहे येथील लग्न आणि लग्नाबाबतच्या गोष्टींबाबतही. त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी आणि लग्नाच्या शॉपिंगसाठी पुण्याला जायचं प्लॅन करत असाल तर हा लेख नक्की वाचा.

वेडिंग शॉपिंगसाठी पुण्याची खासियत ( Pune’s Wedding Speciality)

मराठमोळं आणि टिपीकल मराठी लग्न म्हटल्यावर डोळ्यासमोर येते पुणेरी पगडी आणि पारंपारिक वस्त्रांनी सजलेले वर-वधू. पुणे शहराचा आता बऱ्यापैकी मॉर्डन चेहरा झाला असला तरी येथील सांस्कृतिक टच कायम आहे. त्यामुळे पुण्यात तुम्हाला पारंपारिक दागिने, लग्नासाठी लागणाऱ्या अनेक पारंपारिक गोष्टी जसं पुणेरी पगडी, सोवळं, रूखवताच्या गोष्टी आणि नऊवारी साड्या यांची भरपूर व्हरायटी आणि तीही मुंबईपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होते. तसंच तुम्ही लग्नसुद्धा पुण्यात करायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमचं बजेटही चांगलंच कमी होईल. दुसरी फायद्याची बाब म्हणजे तुम्हाला मराठमोळा मेन्यू जेवणासाठी ठेवता येईल.  

सर्वोत्तम लग्नातील कपडे देखील वाचा

पुण्यात वेंडिग शॉपिंगसाठी या दुकानांना नक्की भेट द्या (Must visit shops in Pune for Wedding Shopping )

जर तुम्ही पुण्यात लग्नाची शॉपिंग करायची ठरवली असेल तर मग या दुकानांना नक्कीच भेट दिली पाहिजे.

ADVERTISEMENT

पेशवाई क्रिएशन

Just Dial

पत्ता (Address):717,सदाशिव पेठ, चित्रशाळा चौक, कुमठेकर रोड, पुणे – 411030

कसं जाल (How to reach):इथे पोचण्यासाठी तुम्हाला खाजगी वाहन, बस आणि रिक्शाचा पर्याय आहे. 

ADVERTISEMENT

खासियत (Speciality):पेशवाई क्रिएशन्स हे खरंतर वर-वधू दोघांच्याही शॉपिंगसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. इथे तुम्हाला पारंपारिक पैठणीपासून, बनारसीपर्यंत आणि डिझाईनर साड्यांपासून पार्टी वेअरपर्यंत सर्व साड्यांचे प्रकार मिळतील. तर वरांसाठी सूटींग शर्टिंग आणि पारंपारिक कपड्यांची सर्व व्हरायटी मिळेल. तसंच इथे तुम्हाला कस्टमाईज्ड कपडेसुद्धा बनवून घेता येतील. त्यामुळे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कॉम्बिनेशन कपडे लग्नात घालायचे असल्यास इथे नक्की भेट द्या. या ग्रँड दुकानाची सुरूवात 1994 साली दत्ताराम येऊल यांनी केली. 

अंदाजे खर्च (Approx Cost):दहा हजारांपासून पुढे.

Also Read Banquet Halls In Pune In Marathi

हस्तकला

ADVERTISEMENT

Just Dial

पत्ता (Address):शगुन चौक, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे – 411030

कसं जाल (How to reach ):इथून जवळचं स्टेशन म्हणजे शिवाजी नगर, याशिवाय तुम्ही बस, रिक्शाने किंवा खाजगी वाहनाने इथे पोचू शकता. 

खासियत (Speciality):या दुकानाची सुरूवात 2004 साली सुरूवात करण्यात आली. इथे तुम्हाला सिल्क सारीज, वेडिंग कलेक्शन, सलवार-कमीज आणि ड्रेस मटेरिअलची भरपूर व्हरायटी मिळेल. इथे तुम्हाला अगदी कमीतकमी 800 रूपयांपासून साड्या पाहायला मिळतील. 

ADVERTISEMENT

अंदाजे खर्च (Approx Cost):एक हजारांपासून पुढे

गलानी फॅशन्स (Galani Fashions)

Just Dial

पत्ता (Address):गलानी टॉवर्स, के के होलसेल मार्केट, सातारा रोड, पुणे – 411043

ADVERTISEMENT

कसं जाल (How to reach):बस किंवा रिक्शाचा पर्याय सोबतच खाजगी वाहनानेही तुम्ही इथे पोचू शकता. 

खासियत (Speciality):हे ठिकाण म्हणजे दुकान एक आणि ऑप्शन भरपूर असा प्रकार आहे. इथे तुम्हाला वधूवरांसाठी शॉपिंग करता येईल. दोघांसाठीही ब्रायडल वेअर, डिझाईनर वेअर जसं घागरा, शरारा, वेडिंग गाऊन्स, फॉर्मल वेअर आणि ग्रूम कलेक्शनमधील व्हरायटी पाहता येईल. कारण हे दुकान चक्क सात मजली आहे.

अंदाजे खर्च (Approx Cost):पाच हजारांपासून पुढे.

वाचा : मेहंदी सोहळा

ADVERTISEMENT

कासट

Just Dial

पत्ता (Address):16/15 कॅसाब्लांका, करिश्मा सोसायटी ऑफ कोथरूड, कोथरूड, पुणे – 411029.

कसं जाल (How to reach):हे पुण्याजवळ असून इथे पोचण्यासाठी तुम्ही बस आणि रिक्शाचा पर्याय वापरू शकता. 

ADVERTISEMENT

खासियत (Speciality):कासट हे पुण्यातील प्रसिद्ध आणि खात्रीशीर दुकानांपैकी एक आहे. इथे पारंपारिक साड्यांबरोबरच आता लेहंगा आणि डिझाईनर साड्याही मिळतात. पण या दुकानात अजूनही पुणेकर पारंपारिक साड्यांचे प्रकार घेण्यासाठी आवर्जून भेट देतात.

अंदाजे खर्च (Approx Cost):हजार रूपयांपासून पुढे.

चार्वी

Just Dial

ADVERTISEMENT

पत्ता (Address):684, सदाशिव पेठ, चित्रशाळा चौक, कुमठेकर रोड, पुणे – 411030

कसं जाल (How to reach):हे ठिकाण पुणाच्या अगदी मध्यवर्ती भागात असल्याने बस आणि रिक्शा तसंच खाजगी वाहनाचा पर्याय आहे. 

खासियत (Speciality):युवांच्या पसंतीस नक्की पडेल असं वेडिंग शॉपिंगसाठीचं दुकान म्हणजे चार्वी. चार्वीमध्ये तुम्हाला पारंपारिक सोबतच कोकटेल सारीज आणि ड्रेसमटेरिअल्ससुद्धा मिळतील. इथे खास हँडमेड वर्क केलेल्या साड्याही मिळतात. या दुकानाची सुरूवात 2009 साली झाली होती.  हे ठिकाण पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी सदाशिव पेठेत आहे.

अंदाजे खर्च (Approx Cost):दोन हजारांपासून पुढे.

ADVERTISEMENT

कजरी सारीज (Kajri Sarees)

Just Dial

पत्ता (Address):सर्व्हे नं 43/44, सरस्वती विलास बिल्डींग, लक्ष्मी रोड, नारायण पेठ, कुंटे चौक पुणे – 411030

कसं जाल (How to reach):बस, रिक्शा किंवा खाजगी वाहन. 

ADVERTISEMENT

खासियत (Speciality):हे पुण्यातील लक्ष्मी रोडवरील जुन्या दुकानांपैकी एक आहे. इथे पारंपारिक साड्यांच्या प्रकारासोबतच लेटेस्ट फॅशनच्या साड्याही उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला जरी, ऑरगँजा, झर्दोसी, सिक्वीन्स, कट वर्क, मिरर वर्क, पर्ल वर्क आणि कुंदन वर्कच्या साड्या पाहायला मिळतील. 

अंदाजे खर्च (Approx Cost):एक हजारांपासून पुढे.

वामा

Just Dial

ADVERTISEMENT

पत्ता (Address):कुंटे चौक, कॉमनवेल्थ बिल्डींग समोर आणि सिटी ज्वेलर्ससमोर, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे – 411030

कसं जाल (How to reach) :रिक्शा, बस आणि खाजगी वाहनाचा पर्याय. 

खासियत (Speciality):वामाला पुण्यातील ऑफिशियल होम फोर वेडिंग शॉपिंग असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला रिसेप्शनसाठी काही वेगळं काही करायचं असल्यास चॉईस उपलब्ध आहे. ज्यामध्ये जरी वर्कचे रिच लेहंगा आणि कॉकटेल सारीज ते अगदी नऊवारी, पैठणी आणि इतरही व्हरायटी मिळेल. या तीन मजली शॉपिंग प्लाझामध्ये तुम्हाला रॉयल ट्रीटमेंटही मिळू शकते. तसंच इथे खास व्हीआयपींसाठी क्युबिकल्स आणि पर्सनल एस्कॉर्टही असतात. 

अंदाजे खर्च (Approx Cost):पाच हजारांपासून पुढे.

ADVERTISEMENT

स्वामिनी सारी सेंटर (Swamni Sari Center)

Just Dial

पत्ता (Address):शॉप नं. 776 बिझीलँड बिल्डींग, विश्रामबाग वाडासमोर, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे – 411030

कसं जाल (How to reach):बस, रिक्शा किंवा खाजगी वाहन. 

ADVERTISEMENT

खासियत (Speciality): स्वामिनी सारी सेंटर हे पुण्यात वेडिंग शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेलं अजून एक ठिकाण आहे. त्यामुळे पुण्यात शॉपिंगला आल्यास तुमच्या लग्नाच्या बस्त्यात एक तरी स्वामिनीमधली साडी असलीच पाहिजे.  

अंदाजे खर्च (Approx Cost): एक हजारापासून पुढे.

पु. ना. गाडगीळ

Just Dial

ADVERTISEMENT

पत्ता (Address): 658/59, साचापीर स्ट्रीट, एमजी रोडजवळ, हनुमान मंदिरासमोर, कँप, पुणे – 411001

कसं जाल (How to reach): बस, रिक्शा किंवा खाजगी वाहनाचा पर्याय. 

खासियत (Speciality): लग्नाची खरेदी म्हटल्यावर दागिनेसुद्धा आलेच आणि पुण्यात दागिने खरेदी म्हटल्यावर पु.ना.गाडगीळला पर्याय नाही. गेली अनेक दशकं गाडगीळ यांचं दागिन्यांमध्ये नाव आहे. महाराष्ट्रभरात त्यांच्या शाखा असल्यातरी मुख्य आणि सुंदर कलेक्शनसाठी पुण्यातील दुकानाला भेट द्यायलाच हवी. साखरपुड्याच्या अंगठीपासून ते अगदी लग्नाच्या मंगळसूत्रांपर्यंत इथे तुम्हाला सर्व कलेक्शन्स पाहायला मिळतील. 

अंदाजे खर्च (Approx Cost): पाच हजारांपासून पुढे. 

ADVERTISEMENT

नानासाहेब विट्टुल शामसेट ज्वेलर्स (NWS)

Just Dial

पत्ता (Address): 2433,ईस्ट स्ट्रीट कँप, पुणे – 411001

कसं जाल (How to reach): बस किंवा रिक्शा याशिवाय खाजगी वाहन. 

ADVERTISEMENT

खासियत (Speciality): अगदी ब्रिटीश काळापासून पुण्यातील दागिन्यांच्या व्यापारात असलेलं नाव म्हणेज हे दागिन्यांचे दुकान. ग्राहकांना खासकरून येथील इंडो-वेस्टर्न ज्वेलरी आवडते. या दुकानाच्या नावाची ही एक कथा आहे. विठ्ठल शामसेठ यांनी या दुकानाची सुरूवात केली. पण त्याकाळी ब्रिटीशांना विठ्ठल बोलता येत नसे त्यामुळे त्यांना विट्टूल बोलत असत. मग त्यावरूनच दुकानाचंही नाव पडलं. इथे तुम्हाला ज्वेलरीतील अनेक कलेक्शन्स पाहायला मिळतील.  

अंदाजे खर्च (Approx Cost) :पाच हजारांपासून पुढे.

ज्वेल पॅरडाईज (Jewel Paradise)

Just Dial

ADVERTISEMENT

पत्ता (Address) :शोरूम नं. 11,सोहराब हॉल, जहांगीर हॉस्पिटल समोर, पुणे रेल्वे स्टेशनच्या मागे, पुणे – 411001

कसं जाल (How to reach): रेल्वे स्टेशनजवळ असल्याने तुम्ही इथे रेल्वेनेही पोचू शकता. त्याशिवाय बस किंवा रिक्शाचा पर्याय. 

खासियत (Speciality): इथे तुम्हाला लग्नासाठी लागणारी ज्वेलरी भाड्याने घेता येईल. कारण लग्नासाठी बरेचदा लागणारी ज्वेलरी आपल्याला विकत घेणं शक्य नसतं. त्यामुळे ज्वेलरी भाड्याने घेण्याचा पर्यायही चांगला आहे. 

अंदाजे खर्च (Approx Cost): पाचशे रूपयांपासून पुढे.

ADVERTISEMENT

वाचा – पुण्यातील या डिझाईनर बुटीक्सना नक्की भेट द्या

तुळशी बाग (Basil Garden)

Instagram

पत्ता (Address) : तुळशी बाग, पुणे. 

ADVERTISEMENT

कसं जाल (How to reach): बस, रिक्शा किंवा खाजगी वाहन. 

खासियत (Speciality): तुळशीबागेत तुम्हाला लग्नासाठी लागणारी प्रत्येक वस्तू अगदी हमखास मिळेल. तेही इतर दुकानांपेक्षा किंवा मार्केट्सपेक्षा स्वस्त दरात. त्यामुळे पुण्यात साडी, ज्वेलरीची खरेदी करून झाल्यानंतर लग्नाच्या रूखवतासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांना गिफ्ट देण्यासाठी असो वा छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुळशी बागेत एकदा चक्कर नक्की मारा.  

अंदाजे खर्च (Approx Cost): शंभर रूपयांपासून पुढे. 

शॉपिंगनंतर खादाडीसाठी पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणं (Food stalls at Pune )

ADVERTISEMENT

Instagram

पुण्यातील खाद्यसंस्कृती हा तर हमखास चर्चैचा विषय आहे.  मग ती पुण्यातील पुणेरी मिसळ असो वडापाव असो किंवा मस्तानी. पुण्यात शॉपिंगला गेल्यावर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्याची ही आयती संधी मिळेल.

  • गार्डनचा वडापाव – महाराष्ट्रभरात वडापाव प्रसिद्ध आहे. तसंच पुण्यातही वडापावसाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्यापैकीच एक म्हणजे कँप एरियातील गार्डन वडापाव सेंटर. शॉपिंग केल्यानंतर तुमची झणझणीत वडापाव खायची इच्छा झाल्यास इथे नक्की भेट द्या.
  • कल्याण भेळपुरी – भेळपुरी आणि इतर चाट खायची काही ठराविक वेळ नसते. त्यामुळे शॉपिंगनंतर चाट खायला काहीच हरकत नाही. पुण्यातील बाणेर रोडवरील प्रसिद्ध कल्या भेळला तुम्ही भेट देऊ शकता.   
  • बेडेकरांची पुणेरी मिसळ – मिसळ प्रकारात पुणेरी मिसळ हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यात आल्यावर पुणेरी मिसळ खाणं मस्ट आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील बेडेकर टी स्टॉलला भेट द्यायलाच हवी.
  • अमृतेश्वरचे कांदेपोहे – पुण्यातील एरंडवणे येथील अभिनव चौकातील अमृतेश्वर हे ठिकाणं खमंग पोह्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • सुजाताची मस्तानी – पुण्यात आल्यावर मस्तानी खायला किंवा प्यायलाच हवी. यासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सुजाता मस्तानी. सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौकातील सुजाता मस्तानी प्रसिद्ध आहे ते मस्तानीसाठी. 

शॉपिंगसाठी जाताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा (Things To Remember)

वरील दुकानांची लिस्ट पाहून तुम्हाला कळलं असेलच की, जर तुम्हाला पुण्यात वेडिंग शॉपिंग करायची असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे सदाशिव पेठेला भेट देणे. जिथे तुम्हाला वधूच्या साड्यांपासून ते वराच्या कुर्त्यांपर्यंत तर दागिन्यांपासून ते अगदी खाण्यापिण्याचीही चंगळ या भागात आहे. तसंच पुण्यात शॉपिंगला जाताना पुणेकरांच्या वेळा लक्षात ठेवायलाही विसरू नका.

पुण्यातील वेडिंग शॉपिंगबाबत विचारण्यात येणारे काही प्रश्न – FAQs

लग्नाची शॉपिंगसाठी पुण्यातील प्रसिद्ध मॉल्स कोणते?

पुण्यात जसं तुम्हाला तुळशीबागेत किंवा सदाशिव पेठेत शॉपिंग करण्याचा ऑप्शन आहे. तसंच पुण्यातील अनेक मॉल्समध्येही तुम्हाला चांगली शॉपिंग करता येईल. पुण्यातील मॉल्सपैकी फिनीक्स मार्केट सिटी, अमनोरा आणि एसजीएस मॉल हे काही चांगले ऑप्शन्स आहेत. त्यामुळे या मॉल्सना नक्की भेट द्या.

ADVERTISEMENT

लग्नाची शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी ?

लग्नाची शॉपिंग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिस्ट बनवा. ज्या वस्तूंची तुम्हाला शॉपिंग करायची आहे. त्या सर्व गोष्टींची यादी केलेली असल्यास तुम्हाला शॉपिंगच नीट प्लॅनिंग करता येईल आणि वेळही वाचेल. तसंच शॉपिंग करताना तुमचं बजेटही लक्षात ठेवा. 

शॉपिंगसाठी जाण्यासाठी पुण्याला कसे जावे?

पुण्यात जर तुम्ही आधीही फिरला असाल तर तुम्हाला माहीत असेलच की, स्वतःच वाहन मस्ट आहे. कारण पुण्यातील पब्लिक ट्रान्सपोर्ट मुंबईसारखं सहज आणि सोपं नाही. त्यामुळे पुण्यात शॉपिंगसाठी बाहेर पडताना ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रॅफिकच्या वेळा पाहूनच बाहेर पडा.

पुण्यात लग्नाची बजेट शॉपिंग करता येईल का?

पुण्यात लग्नासाठीच बजेट शॉपिंग सहज शक्य आहे. कारण मुंबईपेक्षा नक्कीच पुण्यातील भाव काहीसे कमी आहेत. तसंच इथे शॉपिंगसाठी तुमच्या बजेटप्रमाणे अनेक पर्यायही उपलब्ध आहेत.

हेही वाचा – 

ADVERTISEMENT

नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या

लग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

नागपूरमधील या Designer Boutiquesमध्ये करा मस्त शॉपिंग

29 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT