कोणतीही मुलगी वयात यायला लागते, त्याप्रमाणे तिच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. सर्वात पहिल्यांदा आईकडून शिकवण मिळते ती म्हणजे ब्रा कशी वापरायची. ब्रा ही एक प्रकारची प्रत्येक मुलीची मैत्रीणच असते. कायम आपल्याबरोबर अगदी आपल्याजवळ असणारी वस्तू म्हणजे ब्रा. आपलं शरीर सुडौल आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी ब्रा वापरणं अतिशय गरजेचं आहे. पहिल्यांदा ब्रा घातल्यानंतर थोडं अवघड वाटतं पण नंतर तुम्हाला ब्रा ची सवय होते आणि ब्रा घातल्याशिवाय आपला दिवसही जात नाही. आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जाते ब्रा. खरं आहे ना? अर्थात हे प्रत्येक मुलीला पटेल. पण प्रत्येक मुलीची आवड वेगळी असते आणि त्याप्रमाणे आता ब्रा चे नवनवे पॅटर्नदेखील आले आहेत.
तुम्ही एका विशिष्ट वयात आल्यानंतरच ब्रा घालू शकता. शिवाय जेव्हा तुम्ही एथनिक कपडे घालता तेव्हा तुम्हाला स्पोर्ट्स ब्रा नक्कीच घालता येणार नाही. तुमच्या कपड्यांप्रमाणेच तुमची ब्रा बदलते. त्यामुळे प्रत्येक मुलीला प्रत्येक वेगळ्या कपड्यांसाठी वेगळी ब्रा लागते. पण बऱ्याचदा कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणती ब्रा घालायची याची कल्पना बऱ्याच मुलींना नसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रा घालण्याचं नक्की वय काय? इथपासून ब्रा चे कोणकोणते प्रकार असतात इथपर्यंत सगळी माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही माहिती भविष्यात नक्की उपयोगी पडेल.
वाचा – स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं
वास्तविक एखादी मुलगी ही वयाच्या 13 व्या वर्षानंतर ब्रा घालणं सुरु करते. पण प्रत्येक मुलीच्या बाबतीत असं होत नाही. ही सरासरी आहे. एखाद्या मुलीचं शरीर जास्त हेल्दी असेल आणि वयाच्या आधीच तिने स्तन दिसायला लागले तर अशावेळी आपल्या शरीराचा स्तनांचा भाग तिला बॅलेन्स करण्यासाठी ब्रा घालणं गरजेचं आहे. साधारणतः ब्रा चा आकार हा 28 इंचापासून सुरु होतो. आपल्या शरीराच्या अर्थात स्तनांच्या आकाराच्या मापाप्रमाणेच ब्रा घालणं सुरु करायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रा अगदी घट्ट अथवा अगदी सैल असून नये.
तुम्ही जर टीनएजर असाल तर तुम्ही आता ब्रा घालायला सुरुवात करायला हवी. तुम्ही जर आताच ब्रा घालायला सुरुवात केली असेल तर तुमच्यासाठी अशीच कोणतीतरी ब्रा विकत घेऊ नका. तुमच्यासाठी खास टीनएजर ब्रा मिळते. त्याचा वापर करा. खास बिगिनर्ससाठी ही ब्रा बनवण्यात येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ब्रा चं वैशिष्ट्य असं आहे की, ही टीनएजर्स ब्रा अतिशय लाईटवेट अर्थात हलकी असते आणि त्याचबरोबर नॉन पॅडेड आणि नॉनवायर्ड असते. या ब्रा मध्ये हुकदेखील नसतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला अतिशय कम्फर्टेबल वाटेल आणि कोणत्याही प्रकारचा दबाव तुमच्या स्तनांवर येणार नाही.
तुम्हाला नेहमी जीन्स आणि टॉप घालणं आवडत असेल तर तुम्ही टीशर्ट ब्रा चा वापरत करणं योग्य आहे. ही एक रेग्युलर ब्रा प्रमाणेच असते फक्त यामध्ये पॅड असतात ज्यामुळे तुमची फिगर अथवा टीशर्ट घातल्यानंतरत तुमच्या स्तनांचा आकार योग्य प्रकारे दर्शवते. या ब्रा मध्ये कोणत्याही प्रकारच्या शिलाईचे निशाण तुम्हाला दिसत नाहीत आणि समोरच्या बाजूला ब्रा चा शेप अथवा बूब्सचे पॉईंट्सदेखील दिसत नाहीत. यामुळेच टाईट फिटेड ड्रेस आणि टॉप्ससाठी ही टीशर्ट ब्रा उत्कृष्ट आहे.
फिट राहण्यासाठी आपण बऱ्याचजा जिम आणि योगा क्लासला जातो. अथवा मॉर्निंग वॉक वा जॉगिंगदेखील करतो. या अशा अॅक्टिव्हिटीज करण्यासाठी तुमचं शरीर रिलॅक्स राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला स्पोर्ट्स ब्रा अत्यंत रिलॅक्स करते. अशातऱ्हेच्या कोणत्याही अॅक्टिव्हिटीजशी तुम्ही संबंधित असल्यास किंवा तुम्ही खेळाडू असल्यास, तुमच्यासाठी स्पोर्ट्स ब्रा हा चांगला पर्याय आहे.
वाचा – ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांबाबत ‘या’ लिंबाच्या चित्रातून कळतात बऱ्याच गोष्टी
नावावरूनच तुम्हाला या ब्रा ला स्ट्रेप्स नाहीत हे लक्षात येतं. तुमच्या वन शोल्ड, ऑफ शोल्डर अथवा कोणत्याही सेक्सी ड्रेससाठी या ब्रा चा वापर करता येऊ शकतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे स्ट्रेप्स हे डिटॅचेबल असतात. अर्थात तुम्हाला हवं तेव्हा स्ट्रेप्स लावता येतात आणि तुम्हाला नको तेव्हा स्ट्रेप्स काढून तुम्ही या ब्रा चा वापर करू शकता. तुम्हाला जर स्ट्रेपलेस ब्रा मध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही या ब्रा ला स्ट्रेप्स लावून ही ब्रा घालू शकता किंवा तुम्ही ट्रान्सपरंट स्ट्रेप्स लावून ही ब्रा घालू शकता. यामुळे तुमच्या सेक्सी ड्रेसचा लुकही बिघडणार नाही आणि तुम्ही स्वतःदेखील अतिशय कम्फर्टेबल राहू शकता.
मिनिमायझर ब्रा विशेषतः त्या मुलींसाठी असते ज्यांचे स्तन (Breast) मोठे असतात. तुमचं शरीर कर्व्ही असेल आणि तुमच्या मोठ्या स्तनांसाठी तुम्हाला ब्रा कोणती घालायची हा प्रश्न असेल तर मिनिमायझर ब्रा हा एक चांगला पर्याय आहे. वास्तविक ही ब्रा तुमच्या शरीराच्या एक्स्ट्रा लूज फॅटला कव्हर करते आणि व्यवस्थित शेपमध्ये ठेवण्यास मदत करते. ही ब्रा खास मोठे स्तन असणाऱ्या महिलांकरिताच डिझाईन करण्यात आली आहे. ही ब्रा घातल्यानंतर तुम्हाला आपल्या एक्स्ट्रा लूज फॅटची चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही.
चोली ब्रा चा ट्रेंड अतिशय जुना आहे. कदाचित तुम्ही तुमच्या आई किंवा आजीकडून या ब्रा बद्दल ऐकलं असेल. एथनिकवेअर घालणार असल्यास, चोली अर्थात ब्लाऊजच्या आत ही ब्रा घालण्याचा सल्ला देण्यात येतो. या ब्रामुळे तुमच्या स्तनांचा योग्य शेप दिसतो. तसंच तुमची छाती या ब्रा मुळे समोरच्या बाजूने थोडी वर आलेलीदेखील दिसते. पूर्वीच्या काळी जास्त महिला या प्रकारच्या ब्रा घालत होत्या.
वाचा – 9 मुलींनी शेअर केलं त्यांचं एक खास सिक्रेट… तो क्षण जेव्हा त्यांच्या पार्टनरने त्यांच्या स्तनांना
सर्व ब्रा मध्ये कन्व्हेर्टीबल ब्रा ही उत्कृष्ट ब्रा आहे. ही ब्रा एकावेळी 4 तऱ्हेच्या ब्रा चं काम करते. याचे कन्व्हर्टीबल स्ट्रेप्स हे हॉल्टर, रेसर बॅक, नव शोल्डर अथवा स्ट्रेपलेसमध्ये तुम्ही बदलू शकता. तसं तर ही ब्रा कोणत्याही रंगाची तुम्ही वापरू शकता. पण सर्वात जास्त या ब्रा मध्ये मुलींना न्यूड रंग जास्त आवडतो आणि याच रंगाच्या ब्रा ची जास्त खरेदी केली जाते.
बॉलीवूडच्या अभिनेत्री जेव्हा अगदी आत्मविश्वासाने बॅकलेस ड्रेस घालतात, तेव्हा आपल्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की, या अभिनेत्री ब्रा कशा घालतात आणि कोणत्या ब्रा असतात ज्यामुळे हा ड्रेस व्यवस्थित दिसतो. तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. बॅकलेस ड्रेस अथवा बॅकलेस चोली घालण्यासाठी स्ट्रेपलेस ब्रा चा वापर करण्यात येतो. अर्थात स्ट्रेपलेस ब्रा प्रमाणेच बॅकलेस ब्रादेखील असते. फक्त त्यामध्ये फरक इतकाच असतो की, यामध्ये बॅक स्ट्रेप नसते अथवा ही संपूर्ण ट्रान्सपरंट असते. ही ब्रा तुम्ही तुमच्या ड्रेसमध्ये अगदी आत्मविश्वासाने घालू शकता. या ब्रा मध्येदेखील तुम्हाला अतिशय कम्फर्टेबल वाटेल.
नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की, अर्थातच ही ब्रा खास ब्रायडल अर्थात नववधुसाठी आहे. अशी ब्रा नवरीच्या सामानामध्ये दिली जाते. ही ब्रा अतिशय सेक्सी अते. यावर नेट आणि लेसचं काम करण्यात आलेलं असतं. ही अनेक तऱ्हेच्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहे. तुमचं लग्न जर ठरलं असेल आणि तारीख जवळ आली असेल तर आपल्या नवऱ्याला अधिक जवळ करण्यासाठी अशा तऱ्हेच्या ब्रा चा नक्की वापर करा. तुमच्या ब्रायडल कलेक्शनमध्ये अशी ब्रा असायलाच हवी.
आई झाल्यानंतर सर्वात जास्त महिलांना सतत मुलांना दूध पाजावं लागतं, त्यामुळे बऱ्याचदा महिला ब्रा घालणं काही काळ बंद करतात. पण त्याचा परिणाम तुमच्या स्तनांवर होऊन तुमचे स्तन सैल पडू शकतात हे महिलांच्या लक्षात येत नाही. कारण काही काळ गेल्यानंतर हे अतिशय खराब दिसतं. त्यामुळे ब्रा घालणं सोडू नका. मॅटरनिटी अर्थात गरोदरपणात अशा महिलांसाठी खास ब्रा बनविण्यात आली आहे, जी नुकत्याच आई झालेल्या महिलांसाठी आहे. अशा तऱ्हेची ब्रा तुम्हाला मुलांना दूध पाजण्यासाठी अतिशय सोयीस्कर असते. ही ब्रा कॉटन आणि अन्य सॉफ्ट फॅब्रिकने बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इरिटेशन वा खाज या ब्रा मुळे नक्कीच येणार नाही. तसंच मॅटरनिटी ब्रा अशा तऱ्हेने डिझाईन करण्यात येते जी, तुम्ही न काढता आपल्या बाळाला दूध पाजू शकता. त्यामुळे तुम्ही स्वतःची आणि बाळाची दोघांचीही योग्यरित्या घेता येते.
तुमच्या छातीचा आकार छोटा आहे आणि तुम्हाला डीप नेक ड्रेस घालण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी पुशअप ब्रा हा एक चांगला पर्याय आहे. या ब्रा मध्ये तुमचे स्तन सुडौल आणि थोडे वरच्या बाजूला दिसतात आणि त्यामुळे तुमचे क्लिव्हेज चांगले दिसतात. तुम्हाला पुढच्या वेळी कोणता सेक्सी ड्रेस घालायचा असल्यास किंवा तुम्हाला क्लिव्हेज दाखवायचे असल्यास, पुशअप ब्रा चा वापर करा.
वेगवेगळ्या छातीच्या आकारानुसार बऱ्याच प्रकारचे ब्रा कप असतात. डेम ब्रा मध्ये असलेल्या कपला कट – ऑफ असतो. यामुळे तुमच्या छातीचा वरचा भाग उठावदार दिसतो आणि यावर स्ट्रेप्स लावलेल्या असतात. डेमी ब्रा तुमच्या घरातील फॉर्मल फंक्शन्स आणि पार्टीजसाठी उपयुक्त आहे. तुम्ही जेव्हा लो – कट, वाईड स्कूप अथवा चौकोर नेकलाईन असे ड्रेस घालता तेव्हा अशा तऱ्हेच्या डेमी ब्रा वापरा.
अशा तऱ्हेच्या ब्रा तुमच्या छातीला अगदी सर्व बाजूने कव्हर करतात. तुम्हाला या ब्रा मुळे अतिशय चांगला आराम मिळतो. अशा ब्रा या जास्त फ्लोरल प्रिंट्समध्ये तुम्हाला दिसतात. तुम्हाला जर ड्रेसमधून बाहेर ब्रा दिसणं चालणार असेल तर, आपल्या पारदर्शक टॉपमध्ये अथवा मोठ्या आकाराच्या कट स्लिव्ह्जच्या ड्रेसमध्ये तुम्ही अशा प्रकारची ब्रा वापरू शकता. तुम्हाला ब्रा दाखवणं आवडत नसेल तर, तुम्ही ही ब्रा नॉर्मल टीशर्ट ब्रा प्रमाणे तुम्ही वापरू शकता.
ही ब्रा अन्य नॉर्मल ब्राप्रमाणे वेगळी येत नाही. अशा ब्रा चे कप हे एखाद्या बनियान अथवा स्पेगेटीमध्ये लावलेले असतात. आजकाल फ्रंट आणि डीपनेक बॅक ड्रेसेससाठीसुद्धा बिल्ट-इन-ब्रा चा उपयोग करण्यात येतो. जास्त मुली या ब्लाऊजच्या आतमध्ये फिट करून घेतात. त्यामुळे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज असल्यास, स्ट्रेप्स बाहेर येण्याची संधी राहात नाही. शिवाय तुमचंही सतत या गोष्टीकडे लक्ष राहात नाही आणि तुम्ही आरामात कोणत्याही कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता.
स्टायइलिश बॅक ब्रा अर्थात जीन ब्रा मध्ये मागच्या बाजूला आकर्षक डिझाईन अथवा नॉट असते. अशी ब्रा तुम्ही तमाशा चित्रपटात दीपिका पादुकोण अथवा बागी मध्ये श्रद्धा कपूरने घातलेली पाहिली असेल. अशी ब्रा साधारणतः पूल, बीच अथवा बीच पार्टीसाठी वापरण्यात येते. ही ब्रा आणि बिकिनी टॉप अशा दोन्ही तऱ्हेने वापरता येते. ही दिसायला अतिशय स्टायलिश असून या ब्रा ला स्टायलिश बॅक ब्रा असं त्यामुळेच म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही जर कुठे बीचवर सुट्टी घालवायला जाणार असाल तर तुमच्या बॅगेमध्ये या स्टायलिश बॅक ब्रा चा पर्याय नक्कीच असायला हवा.
स्वतःसाठी जेव्हा तुम्हाला ब्रा विकत घ्यायची असते तेव्हा तुम्हाला तुमच्या स्तनांचा योग्य आकार माहीत असायला हवा. बँडचा आकार अर्थात स्तनांच्या खालच्या भागाचा आकारदेखील तुम्हाला नीट माहीत असणं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला कप आणि बँडचा योग्य आकार माहिती झाला की, ब्रा च्या योग्य आकार आणि त्याची निवड करणं अतिशय सोपं होतं. शिवाय एखादी ब्रा तुमच्या शरीराला त्रासदायक असेल, त्यामुळे तुमच्या शरीरावर लाल निशाण येत असतील, तर अशी ब्रा कधीही वापरू नका. एक ब्रा सतत वापरू नका. तसंच ब्रा रोज नीट आणि स्वच्छ धुवायला हवी. तुमच्या ब्रा आणि बँडचा आकार एकदम फिट असायला हवा.
तसंच रात्री झोपताना नेहमी तुम्ही ब्रा काढूनच झोपावं. दिवसभर तुमच्या थकव्यानंतर तुमच्या शरीराला मोकळा श्वास घेण्याचीही गरज असते. ब्रा उतरवल्यावर रात्रभर तुमचं शरीर अतिशय रिलॅक्स होतं. मुख्यत्वे उन्हाळ्यात ब्रा कधीही रात्री वापरू नका. तुम्ही टीनएजर असाल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या वयात स्तनांचा आकार हळूहळू वाढत असतो त्यामुळे नेहमी ब्रा घालून ठेवल्यास, त्याचा स्तनांवर वाईट परिणामदेखील होऊ शकतो.
How to Choose a Bra in Hindi
कौन सी लेडीज ब्रा है बेस्ट
Types of Bra in English
फोटो सौजन्य – Instagram