च्युइंग गम हे लहान मुलांना आवडतं. लहानच काय तर मोठ्यांनाही च्युइंग गमची सवय असते. काहीजण तर फक्त फॅशन किंवा स्टाईलसाठीही च्युइंग गम खातात. तसंच च्युइंग गम चावण्याचे अनेक फायदेही असतात. जसं वजन घटवण्यासाठी किंवा मूड सुधारण्यासाठीही च्युइंग गम उपयोगी पडतं.
Shutterstock
पालकांना लहान मुलांनी चुकीने च्युइंग गम गिळल्यास चिंता वाटते. कारण त्यामुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो. एक मजेशीर गोष्ट अशीही ऐकायला मिळते की, च्युइंग गम गिळल्यास ते पुढचे सात वर्ष तुमच्या पोटात राहतं. पण असं खरंच काही नाही. एका रिसर्चनुसार च्युइंग गम चुकून गिळल्यास घाबरायचं काहीच कारण नाही. कारण ते पचतं पण थोडा वेळ लागतो.
Shutterstock
काय होतो परिणाम?
च्युइंग गम चावताना ते चुकून गिळल्यास घाबरायचं काहीच कारण नाही. कारण दुसऱ्या प्रकारचा आहार सहज पचतो पण च्युइंग गम पचायला थोडा जास्त वेळ लागतो. खरंतर आपल्या पचन तंत्रामध्ये एसिड आणि एंजाइम्स असतात जे च्युइंग गम पचण्यास मदत करतात.
वाचा – हिरडी सुजणे घरगुती उपाय (Home Remedies For Swollen Gums)
च्युइंग गम पचण्यास किती वेळ लागतो?
सामान्य जेवण पचण्यासाठी काही तास लागतात. पण जेव्हा च्युइंग गम गिळलं जातं तेव्हा ते पचण्यास दोन ते तीन दिवस लागतात. यामागील कारण हे आहे की, सगळ्या पदार्थांसाठी पचनतंत्र सारखं नसतं. त्यामुळे काहीवेळा हे पचण्यास दोन दिवस लागतात तर अनेकदा तीन दिवसही लागू शकतात. त्यामुळे जर तुमच्या मुलाने च्युइंग गम गिळलं तर टेन्शन घेऊ नका ते पचेल किंवा बाहेर पडेल.
Shutterstock
च्युइंग गम चावण्याचे फायदे
हो.. च्युइंग गम चावण्याचे अनेक फायदे आहेत.
- च्युइंग गम चावल्याने तुमचे हिरड्या मजबूत होतात. कारण हा एकप्रकारे जबड्याचा व्यायाम असतो.
- ओरल हेल्थसाठीही च्युइंग गम चांगलं आहे. कारण च्युइंग गम चावल्याने दातात अडकलेले अन्नाचे कणही निघतात.
- च्युइंग गम चावणं हा एक प्रकारचा फेशियल एक्सरसाइज आहे.
- असं म्हणतात की, च्युइंग गम चावल्याने मनातील चिंता आणि तणावही दूर होतात.
- च्युइंग गम चावल्याने हिप्पोकँपस म्हणजे मस्तिष्काचा एक भाग जास्त सक्रिय होतो. ज्यामुळे तुमची मानसिक क्षमता आणि स्मरण शक्तीही वाढते.
- वजन कमी करण्यातही च्युइंग गम मदत करतं.
डॉक्टरांचा सल्ला
जर शरीराबाहेर एक ते दोन दिवसात च्युइंग गम बाहेर न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर च्युइंग गम बाहेर पडल नाहीतर शरीराचं तापमान वाढू लागतं किंवा ब्लड प्रेशर वाढू शकतं.
च्युइंग गमशी निगडीत काही गोष्टी
च्युइंग गम शोध 1869 साली लागला. जेव्हा रबरसाठी पर्यायी गोष्टींचा शोध घेतला जात होता. तेव्हाच थॉमस एडम्स नावाच्या व्यावसायिकाने सापोडीला चीकू फळाच्या झाडाचा चीक चाखून पाहिला. जो चविष्ट लागला. तेव्हा हा विचार आला की, हा पदार्थ लोकांपर्यत पोचवला पाहिजे आणि 1871 साली त्यांननी याचं पेटंट आपल्या नावावर करून घेतलं. जे एडम्स न्यूयॉर्क गम नावाने बाजारात विकलं जाऊ लागलं.
च्युइंग गम खाणं हे कितीही फायदेशीर असलं तरी ते गिळणं आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नाही. लक्षात घ्या की, सामान्यपणे बाजारात मिळणारे च्युइंग गम्स हे त्यातील रस चोखून फेकून देण्यासाठी असतात. काही दाताच्या व्यायामासाठी मिळणारी च्युइंग गम्सही गिळण्यासाठी नसतातच. त्यामुळे पुढच्या वेळी च्युइंग गम चावून चघळा पण खाऊ किंवा गिळू नका. अगदी गंमत म्हणूनही नाही.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
हेही वाचा –
कानात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी उपाय
मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी वापरा 6 घरगुती उपाय