कोरोनाचे सावट दूर होत नाही तोच आता आणखी एका आजाराने डोकं वर काढलं आहे आता डेल्टा प्लसचा त्रास नव्याने समोर येऊ लागला आहे. खूप जणांना या नव्या आजाराची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे डेल्टा प्लस म्हणजे काय? हे देखील माहीत नाही. डेल्टा प्लस हा कोरोनाचा एक व्हेरिएंट असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात याचे रुग्ण आढळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पण अज्ञानापेक्षा एखाद्या गोष्टीची माहिती असली की, फार बरे होते. त्यामुळे डेल्टा प्लस हे काय आहे हे सगळ्यात आधी जाणून घेऊया. म्हणजे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठीचे बळ देखील आपल्याला मिळू शकेल.कोणत्याही भाकितांवर विश्वास न ठेवता याची योग्य माहिती तुम्ही घेतली तर तुम्हाला देखील याचा फायदा होऊ शकेल.
गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल
डेल्टा प्लस म्हणजे काय?
कोव्हिड 19 हा आतापर्यंत आपल्या सगळ्यांनाच माहीत झालेला आहे. हा एक विषाणू असून तो संक्रमित होत जातो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर आघात करुन त्यांना निकामी करण्याचे काम करतो. कोरोनाची अनेक वेगळी स्थित्यंतरे आतापर्यंत आपण पाहिली आहेत. आता कोरोनाचे आणखी एक व्हेरिएंट आले आहेत. आता त्यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे ‘डेल्टा प्लस’ची. या व्हेरिएंटचे वेगवगळे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळेच एक भीती सगळीकडे पसरली आहे. या आधी याचा बीटा व्हेरिएंट आढळून आला होता आणि आता याचा डेल्टा व्हेरिएटं आला आहे. या आजाराची लक्षणे ही देखील अगदी कोरोनासारखीच आहे. पण कोरोनाचे कोणतेही औषधोपचार यामध्ये लागू पडत नाही. शरीरातील अँटीबॉडीज ना कमजोर करण्याचे काम हा व्हायरस करत आहे.
कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स
डेल्टा प्लसची लक्षणे
डेल्टा प्लसची लक्षणे ही देखील पल्याला माहीत असायला हवी. डेल्टा प्लसची लक्षणे खालील प्रमाणे
- घसा खवखवणे
- डोकेदुखी
- सतत नाक वाहणे
ही काही या डेल्टा प्लसची सर्वसाधारण अशी लक्षणे आहेत.
त्वचेवर उठणारे पुरळ हेदेखील कोरोना संसर्गाचे लक्षण, तज्ज्ञांचे मत
अशी घ्या काळजी
सध्या या नव्या व्हेरिएंटमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण असल्यामुळे तुम्ही आताच काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया या व्हेरिएंटची काळजी घेण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला हवं.
- प्रोटीन असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
- शारीरिक स्वच्छता राखा.
- आहारात अधिकाधिक फळं असू द्या.
- घराबाहेर पडताना शक्यतो दोन मास्क लावा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
आता अशा पद्धतीने डेल्टा प्लस विरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हा. इतकेच नाही तर या आजाराशी दोन हात करताना भाकीतांवर विश्वास ठेवू नका.