ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
जिवंतिका पूजन

जाणून घ्या काय आहे श्रावण महिन्यातील जिवंतिका पूजन (Jivati Pujan)

श्रावण हा अत्यंत पवित्र असा मराठी महिना आहे. या महिन्यात अनेक पवित्र असे सण येतात. जसं जन्माष्टमी येते आणि मग जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. तसंच श्रावणी सोमवार, बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी ‘जिवंतिका पूजन’ (जिवती पूजा jivati puja) येते. यालास जरा, जिवतीची पूजा असे देखील म्हटले जाते. कॅलेंडर पाहिल्यानंतर तुम्हाला  मंगळगौरनंतर येणाऱ्या एका श्रावणी शुक्रवारी जिवंतिका पूजन येते. जिवतीची पूजा ही श्रावणातल्य चारही शुक्रवारी केली जाते. ही पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची पद्धत आहे. ही पुजा करण्यामागेही काही कारण आहे. संततीसंरक्षणार्थ  ही पूजा केली जाते त्यामुळेच या पुजेला श्रावणात अनन्यासाधारण असे महत्व आहे. जर तुम्हाला जिवंतिका पूजन (jivati puja) म्हणजे नेमके काय माहीत नसेल तर तुम्हाला याचा पूजाविधी आणि त्याचे महत्व माहिती हवे. 

कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी

जिवंतिका पूजनचे महत्व

सौजन्य : Instagram

जरा जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदूधर्मियांमध्ये ही पूजा केली जाते. श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजन करतात.  जरा आणि जिवतिका या दोन देवता यांची पुरातन देवता आहेत. पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत.  जरा- जिवंतिका या बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुरातनात मिळू शकते.  त्यात असे म्हटले आहे की, पूर्वी 5 वर्षाच्या आधी मुलांचे मृत्यू उद्धभवत होते. मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी मुलांना आयुष्य मिळवण्यासाठी या जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली. म्हणून माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात.(jivati puja)

गौरी आवाहन विधी

ADVERTISEMENT

अशी केली जाते पूजा

सौजन्य : Instagram

तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही पूजा करु इच्छित असाल तर  याचा पूजाविधी माहीत असायला हवा.  

  •  कुलदेवतीची आणि जिवती देवीची पूजा केली जाते.  या दिवशी स्त्रिया या निर्जळी उपवास करतात. 
  • देवी जिवतेची पूजा करुन तिच्याकडे बाळांच्या रक्षणासाठी पूजा केली जाते. या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने असणं आवश्यक मानले जाते. याची माळ करुन ती जिवतिला वाहिली जातात.  21 मणी असलेले कापडाचे वस्त्र करुन ते घालावे. 
  • पुरणाचे दिवे करावे 5/7/9 या संख्येमद्ये हे दिवे असावेत. ते जिवतीपुढे ठेवून साखर, चणे, फुटाणे याचा नैवद्य दाखवावा. 
  • यादिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे. महिलांनी सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू द्यावे. अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा. 
  • जिवतीची पूजा करुन झाल्यावर मुलांना पाटावर बसून लहान बाळांचे औक्षण केले जाते. कुंकू लावून चणे व साखर फुटाण्यांचे व आरत्यामुरण्यांचे वाण, निरांजनात 5 वाती असू द्याव्यात. 
  •  जर तुमची मुलं परदेशात असतील. तर अशा  मुलांच्या काळजीसाठी चारी दिशेला औक्षण करुन अक्षता चारी दिशेला टाकाव्यात. म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल. 

आता यंद श्रावणात जिंवतिका पूजन तुम्ही नक्की करा. 

पापांकुशा एकादशीचे महत्व घ्या जाणून, असा केला जातो पूजा विधी

26 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT