ADVERTISEMENT
home / नखं
What is nail ring khow everything about this trend in marathi

नखांना द्या हटके लुक, फॉलो करा नेल रिंग ट्रेंड

नखं सुशोभित करण्यासाठी महिला नेहमी नवनवीन ट्रेंड फॉलो करतात. फ्रेंच मेनिक्युअर, नेल कटिंग आणि फायलिंग, अक्रेलिक नखं, नेल एक्सेंक्शन,नेल आर्ट, जेल नेलपॉलिश असे सर्व ट्रेंड तुम्ही आजवर कधी नका कधी तरी फॉलो केले असतीलच. पण तुम्ही कधी नेल रिंग (Nail Ring) ट्रेंड फॉलो केला आहे का ? आकर्षक अंगठी अथवा मिड रिंग्जप्रमाणेच नखं सुंदर दिसण्यासाठी तुम्ही नेल रिंग्स (Nail Ring) वापरू शकता. या अंगठीने तुम्ही तुमच्या बोटाचे टॉप म्हणजेच नखं कव्हर करू शकता. अगदी अंगठ्यापासून करंगळीपर्यंत कोणत्याही बोटात या नेल रिंग्ज वापरता येतात. यासोबतच वाचा कशी निवडावी नेलपेंटमधील उत्कृष्ट लाल रंगाची शेड (Red Nail Paint Shades), अशी काढा घरच्या घरी अॅक्रेलिक नखं (How To Remove Acrylic Nails At Home)

नेल रिंग्ज ट्रेंड

नेल रिंग्ज म्हणजे नखात घालायच्या अंगठ्या या तुमच्या बोटे आणि नखांच्या आकारानुसार खास तयार करण्यात येतात. सहाजिकच वेगवेगळ्या शेपप्रमाणे आणि आकर्षक डिझाइन्समध्ये त्या उपलब्ध असतात. तुम्हाला फक्त त्या इतर दागिन्याप्रमाणे नखांवर चढवायच्या असतात. जर तुम्हाला दागिन्यांची आवड असेल तर तुम्ही या नेल रिंग्ज नक्कीच ट्राय करायला हव्या. महत्त्वाचं म्हणजे इतर नेल आर्ट करताना तुम्हाला नखांची खूप निगा राखावी लागते. मात्र नेल रिंग्ज वापरणं लो मेटेनंन्सचं काम आहे. अनेक सोलिब्रेटीजनी हा ट्रेंड फॉलो केलेला आहे. कदाचित नेल रिंग्ज तुम्हाला दुकानात मिळणं कठीण आहे पण ऑनलाईन शॉपिंग करून तुम्ही त्या सहज मिळवू शकता. 

पाहा या काही हटके नेल रिंग

जर तुम्हाला तुमच्या हातामध्ये लहानचा स्पार्क तयार करायचा असेल तर ही लव्ह नॉक नेल नॉट रिंग तुमच्यासाठी परफेक्ट आहे. रोज गोल्डमधील ही क्रस्टल जिरकॉनिआजमध्ये तयार केलेली ही रिंग तुम्ही तुमच्या नखांमध्ये एखाद्या क्राउनप्रमाणे घालू शकता.

चांदीमध्येही तुम्हाला नेल रिंग्ज मिळू शकतात. तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार मॅच करत अशा रिंग्ज वापरू शकता. या चांदीच्या नेल रिंग्ज तुमच्या नखांना अधिक सुशोभित करतात.

ADVERTISEMENT

जर तुम्हाला नुकतंच केलेलं मेनिक्युअर दिसावे आणि नखंही आकर्षित दिसावी असं वाटत असेल तर या नॉर्मल नेल रिंग्ज तुम्ही ट्राय करू शकता. यात तुम्हाला मिडी आणि टॉप असे सर्व प्रकार मिळू शकतील.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT