त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमित उपाय करत असाल तर तुम्हाला कोरिअन रबर फेसमास्कविषयी माहीत असायलाच हवं. कारण हा रबर फेसमास्क सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जगभरातील महिलांना हा रबर फेसमाक्स आवडला आहे. रबर मास्क लावण्यामुळे तुमच्या चहऱ्यावर चांगला परिणाम दिसून येतो. के ब्युटी फेस ऑईल ते कोरिअन रबर फेसमास्क पर्यंत या कोरिअन स्किन केअरमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी ट्राय करता येतात. सध्या सोशल मीडियावर कोरिअन रबर मास्क जास्त लोकप्रिय ठरत आहेत. यासाठी जाणून घेऊ या नव्या ब्युटी ट्रेंडविषयी…
काय आहे रबर फेसमास्क-
सामान्य फेसमास्कपेक्षा कोरिअन रबर फेसमास्क थोडे जाड असतात. त्वचेसाठी उत्तम ठरणाऱ्या घटकांची पावडर आणि लिक्विड वापरून हे फेसमास्क बनवले जातात. या पावडरमध्ये असलेले घटक तुमच्या त्वचेचे पोषण करतात. त्वचेच्या निरनिराळ्या समस्यांनुसार तुम्ही हे रबर फेसमास्क तुमच्यासाठी निवडू शकता. साधारणपणे कोरिअन फेसमास्कचा वापर त्वचा डिटॉक्स आणि हायड्रेट करण्यासाठी केला जातो. या फेसमास्कमध्ये तुम्हाला निरनिराळे प्रकार बाजारात मिळतात जे तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार आणि आवडीनुसार निवडू शकता.
कसा वापरावा रबर फेसमास्क-
रबर फेसमास्क लावण्यापूर्वी नेहमी तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ आणि कोरडी करायला हवी. बऱ्याचदा हे रबर फेसमास्क फेशिअल केल्यावर शेवटी वापरले जातात. पण जर तुम्ही घरी हा रबर फेसमास्क वापरणार असाल तर तुम्हाला तो वापरण्यापूर्वी त्वचा योग्य क्लिंझरने स्वच्छ करायला हवी. रबर मास्क खरेदी करताना तुम्हाला मिळणाऱ्या साहित्यामध्ये पावडर आणि लिक्विड दिले जाते. तुम्हाला वापरण्यापूर्वी दोन्ही घटक व्यवस्थित एकत्र करावे लागतात ज्यामुळे तुम्हाला फेसमास्कमध्ये रबरप्रमाणे कनिस्टंसी मिळते. एका फेसपॅक ब्रशच्या मदतीने तुम्ही हा रबर फेसमास्क तुमच्या चेहरा आणि गळ्याभोवती लावू शकता. मात्र लक्षात ठेवा तु्म्हाला या रबर फेसमास्कचा लेअर खूप जाड ठेवायचा आहे. त्यानंतर वीस मिनीटांनी तुम्हाला हा फेसमास्क पील ऑफ करून काढायचा आहे. मास्क काढल्यानंतर त्वचेला चांगले फेस टोनर, सीरम आणि मॉईस्चराईझर लावणे गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं धुळ, माती, प्रदूषण आणि वातावरणातील बदलापासून संरक्षण होतं.
रबर फेसमास्कचे फायदे –
रबर फेसमास्तत वापरण्याचा सर्वात मोठा फायदा हा की यामध्ये असलेले त्वचेसाठी पोषक घटक त्वचेचे खोलवर जाऊन पोषण करतात. मास्कच्या टेक्चरमुळे त्वचेभोवती एक संरक्षण लेअर निर्माण होतो ज्यामुळे त्यातील घटक थेट तुमच्या त्वचेत मुरतात. शिवाय रबर फेसमास्कमुळे तुमची त्वचा सतत हायड्रेट राहते. इतर सामान्य फेसमास्कमुळे तुम्हाला अशा प्रकारचा फायदा मिळत वाही. यासाठीच रबर फेसमास्क इतर फेसमास्कपेक्षा वेगळे आणि परिणामकारक आहेत.
रबर फेसमास्क लावताना काय काळजी घ्यावी
रबर फेसमास्क लावताना नेहमी एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी ती म्हणजे कितीवेळा तुम्ही त्वचेवर रबर फेसमास्क लावणार आहात. कारण अती वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवर यामुळे अॅलर्जी येण्याची शक्यता असते. वास्तविक तुमची त्वचा कशी आहे यावर तुम्ही हा फेसमास्क कितीवेळा वापरावा हे ठरू शकते. यासाठीच रबर फेसमास्क निवडताना त्यातील घटक तुमच्या त्वचेसाठी योग्य आहेत का हे नीट पाहा. कारण जर तुम्ही तुम्हाला अॅलर्जी असलेल्या घटकांचा फेसमास्क लावला तर त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान सहन करावे लागू शकते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स
Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क