ADVERTISEMENT
home / Love
सेक्सबद्दल योग्य माहिती मिळणे असते फारच गरजेचे नाहीतर…

सेक्सबद्दल योग्य माहिती मिळणे असते फारच गरजेचे नाहीतर…

सेक्सबद्दल योग्य वेळी आणि योग्य माहिती मिळणे हे फारच गरजेचे असते. जर योग्य वयात योग्य गोष्टी कळल्या नाही तर त्याचा त्रास तुम्हाला जास्त होऊ शकतो. असाच काही अनुभव काहींना आला आहे. कारण सेक्सबद्दल खुल्यापणाने  घरातले किंवा आजुबाजूचे कोणीच बोलायला पाहात नाही. मुलींना किंवा मुलांना काहीही न सांगता त्यांचे थेट लग्न अजूनही काही ठिकाणी लावून दिले जाते. मग काय त्यांच्या संसारात अडचणी यायला सुरुवात होतात आपण असेच काही अनुभव जाणून घेणार आहोत. 

पहिल्या दिवशी काय करायचं मला कळतंच नव्हतं

shutterstock

मी 23 वर्षांची असताना मला एक स्थळ आलं. मुलगा चांगला होता म्हणून घरातल्यांनी होकार दिला. आता माझाही नकार नाही म्हटल्यावर घरातल्यांनी लागलीच लग्न आटोपायचे ठरवले. दोन्ही घराकडून खर्चाचा किंवा बाकी कसलाच प्रश्नन नसल्यामुळे लग्न दोन महिन्याच्या आतच झाले. या एवढ्या घाई गडबडीत मला नवऱ्यासोबत मोकळेपणाने बोलायला वेळचं मिळाला नाही. लग्नानंतर एका खोलीत राहायचे या भीतीनेच मी अर्धे झाले होते. टीव्हीवर दाखवतात तशी मला सुहागरात किंवा तशी ओढ मला वाटत नव्हती. सगळ्या विधी आटोपल्यानंतर ज्यावेळी आम्हाला हनिमूनसाठी बाहेर पाठवण्यात आले त्यावेळी मला फारच भीती वाटत होती. म्हणजे लग्नानंतर सेक्स करावं लागतं हे माहीत होतं. पण त्याची तयारी कशी करायची हे माहीत नव्हतं. माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने 5 वर्ष मोठा असल्यामुळे त्याला माझ्याशी नेमकं काय बोलावं हे कळत नव्हतं. रात्री झोपताना तो माझ्या बाजूला असायला त्याला मला जवळ घ्यायचे असायचे पण मला काय वाटेल या भीतीने तो ही मला हात लावायचा नाही. मला काय करावं नेमकं कळत नव्हतं.घरात कधीच कोणी मला काही सांगितलं नव्हतं. सेक्स दोघांना करायचं म्हणजे दोघांनी काय करायला हवं. कुठून सुरुवात करावी हे देखील सांगणे तितकेच गरजेचे असते. शेवटी मी डॉक्टरांकडे जायचं ठरवलं. त्यांनी योग्य माहिती दिल्यानंतर माझ्या डोक्यात काही गोष्टी गेल्या त्यानंतर काही दिवसांनी आम्ही सगळ्या गोष्टी अगदी सहज करु शकलो. पण  हीच गोष्ट मला योग्यवेळी कळली असती तर कदाचित इतका वेळ लग्नानंतरचा गैरसमजात गेला नसता. 

ADVERTISEMENT

Bra काढण्यावरुन मुली जज करतात मुलांना… जाणून घ्या महिलांचे अनुभव

दुखण्याच्या भीतीनेच मी ते करण्यासाठी घाबरत राहिले

shutterstock

माझ्या लग्नाआधी माझ्या इतर मैत्रिणींची लग्न झालेली होती. त्यामुळे त्यांच्याकडून मी त्यांच्या बेडरुम स्टोरीज या ऐकल्या होत्या. त्यांना होणारे त्रास आणि आनंद दोन्ही मला माहीत होते. पण दुखण्याची जिथे गोष्ट यायची तिथे मलाच काही नकोसे वाटायचे. घरी आईला या गोष्टी विचारण्याची कधी हिंमत झाली नाही. कारण ती या विषयावर माझ्याशी कधीच काही बोलायची नाही. त्यामुळे मासिक, पुस्तक चाळून आणि काही व्हिडिओज पाहूनच मी माझी माहिती मिळवून ठेवली होती. सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच दुखतं हे माझ्या मनाने पक्क करुन ठेवलं होतं. माझ्या लग्नाचा विषय घरी सुरु झाल्यानंतर मग या सगळ्या गोष्टी मागेच पडल्या. मी उंच, देखणा आणि धिप्पाड मुलगा पसंत केला. त्याच्यासोबत थोडी जास्त ओळख व्हावी म्हणून मला घरातल्यांनी त्याच्यासोबत बाहेर फिरण्याची परवानगीसुद्धा दिली. आम्ही लग्न होईपर्यंत घरी सांगून कधी न सांगता बाहेर फिरु लागलो. आम्ही एकमेकांच्या फारच जवळ आलो होतो.  त्यामुळे घरातल्यांनाही आनंदच होता. पण लग्नानंतर सगळं बदलून गेलं. आम्ही एका खोलीत असताना सेक्स करायचं ठरवलं . त्याने कपडे काढले आणि माझं सगळं अवसानंच गळून पडलं माझ्या मनात नको ती भीती डोकावू लागली. मला दुखेल या भीतीने मी तो काय करतोय त्याचा आनंद घ्यायचा सोडून मी त्याला दूर लोटू लागले. परिणामी त्याला माझी भीती कळली आणि सगळा विचका झाला. त्यानंतर त्याने बरेचदा प्रयत्न केले पण तरीही माझ्या मनाची तयारी काही व्हायला तयारच नव्हती. शेवटी त्याने मला समजावले अगदी अलगद आणि हळुवारपणे त्याने माझ्याकडून ते करुन घेतले. मला दुखले पण त्याचा आनंदही घेतला. 

ADVERTISEMENT

सेक्स करण्याची इच्छा कमी झाली आहे, तर हे आहे महत्त्वाचं कारण

माझ्या मूर्खपणामुळे सगळा मूडच गेला

लग्नानंतर मी जर काही मूर्खपणा केला असेल तर तो म्हणजे लग्नाच्या पहिल्या त्या महत्वाच्या रात्री. लग्नानंतर सेक्स करण्याची उत्सुकता मला अगदी हमखास होती. पण पहिल्याच दिवशी मी इतका मूर्खपणा करेन असे वाटलं नव्हतं. खोलीत एकटं असताना मला माझ्या नवऱ्याने मिठीत घेतलं तो मला कम्फर्टेबल करत होता हे मला कळत होतं. मी ही त्याच्या कुशीत विसावले.मला नवरा जे करतो ते करु दे असं सांगितल्यामुळे मी ते अगदी तंतोतंत पाळत होते. असे करताना नवरा मला प्रेमाने सगळीकडे हात लावेल ही अपेक्षा नव्हती. म्हणजे फोर प्ले काय असतं हे माहीत असलं तरी सेक्स करताना या गोष्टींची फारशी गरज नसते असे मला वाटत होते. म्हणूनच तो माझे चुंबन घेताना त्याला सतत खाली ढकलत होते. एकदा दोनदा त्याने माझा हात झटकून पुन्हा माझ्या ओठांवर चुंबन घेतले. पण मला नको त्या गोष्टी करता करता मी त्याचा मूडच घालवला त्याला मी काय करत होतं ते कळलं नाही. तो जो थांबला ते त्याने मला काही दिवस हातच लावला नाही. ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीला सांगितल्यावर ती हसू लागली. तिने सांगितले की, इतकं सगळ चांगलं सुरु असताना तू अचानक अशी वागल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. त्याचा मूड जाणारच ना… जर त्याला अगदी रोमँटीक रात्र घालवायची होती तर तू इतकी घाई का केलीस सेक्स म्हणजे नुसतंच ते नाही गं थोड प्रेम हव ना. तुझ्या नवऱ्याला जर ते हवं होतं तर तू प्रेमाचा आनंद घ्यायला हवा होता.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

13 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT