ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
स्कीन फास्टिंग म्हणजे काय जाणून घ्या फायदे

स्कीन फास्टिंग म्हणजे काय जाणून घ्या फायदे

प्रत्येकीला आपली त्वचा सुंदर आणि चमकदार असावी असं वाटत असतं. त्वचेची निगा राखण्यासाठी आजकाल अनेक गोष्टी केल्या जातात. महागड्या ब्युटी ट्रिटमेंट, काटेकोर डाएट, भरमसाठी ब्युटी प्रॉडक्ट वापरूनही बऱ्याचदा हवा तसा परिणाम दिसून येत नाही. वास्तविक त्वचेची नैसर्गिक पद्धतीने निगा राखणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. नैसर्गिक पद्धतीने त्वचेची निगा राखण्यासाठी आजकाल स्कीन फास्टिंग Skin Fasting केलं जातं. त्यामुळे स्कीन फास्टिंग करणं सध्यास ट्रेंडमध्ये आहे. जाणून घ्या पद्धत आणि फायदे… तसंच जाणून घ्या त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक स्किन केअर (Organic Skin care), कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Care Tips In Marathi) आणि Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड

काय आहे स्कीन फास्टिंग

ट्रेंडमध्ये असलेलं हे स्कीन फास्टिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसं करावं असं तुमच्या मनात नक्कीच सुरू असेल. स्कीन फास्टिंग म्हणजे त्वचेला केमिकलयुक्त प्रॉडक्टपासून दूर ठेवायचं. कारण आजकाल बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये भरपूर केमिकल्स असतात. ज्यामुळे त्वचचं नुकसान होऊ शकतं. अचानक स्कीन केअर अथवा मेकअपचे प्रॉडक्ट वापरणं थांबवता येत नसलं तरी, हळू हळू तुम्हाला तुमच्या त्वचेवर असा ब्युटी प्रॉडक्टचा मारा करणं थांबवता येतं. यालाच स्कीन फास्टिंग असं म्हणतात. स्कीन फास्टिंग जमू लागल्यावर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने अथवा घरगुती उपचार करून तुमच्या त्वचेची निगा राखायची असते. कारण नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले स्कीन केअर अथवा घरगुती उपचार तुमच्या त्वचेची निगा तर राखताच पण त्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्यांही कमी होतात.

स्कीन फास्टिंग कसं करावं 

आपल्याला नेहमी अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याची सवय झालेली असते. त्यामुळे ब्युटी प्रॉडक्टशिवाय जगणंही आपण सहन करू शकत नाही. पण जर ते ब्युटी प्रॉडक्ट तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम करत असतील तर त्यापासून दूर राहणं हाच उत्तम उपाय आहे. यासाठी अचानक ब्युटी प्रॉडक्ट वापरणं सोडू नका. नाहीतर तुमची त्वचा लगेच निस्तेज आणि कोरडी पडेल. हळू हळू ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं सोडायचा प्रयत्न करा. या दरम्यान तुम्ही वेगन, केमिकल फ्री, आयुर्वेदिक, क्रुअल्टी फ्री प्रॉडक्ट्स नक्कीच वापरू शकता. त्यानंतर त्वचेची निगा राखण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि नैसर्गिक उपाय करणे सुरू करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
05 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT