तुझ्यात जीव रंगला ही मालिका खूप कमी वेळात लोकप्रिय झाली. या मालिकेतून राणादादा आणि पाठक बाईंसोबतच एक नाव घराघरात पोहचलं ते म्हणजे नंदीता वहिनीसाहेब… नंदीताची भूमिका साकरली होती धनश्री काडगावकर या अभिनेत्रीने राणादादाच्या वहिनीसाहेब बनून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. वास्तविक तिचे या मालिकेत नकारात्मक छटा असलेले पात्र होते. पण तरीही तिला इतर कलाकारांप्रमाणेच लोकप्रियता मिळाली. धनश्रीने मालिका संपण्यापूर्वीच अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. याचं कारणही तितकंच गोड होतं. कारण त्यानंतर धनश्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिच्या गरोदरपणापासून ते बाळाच्या बारशापर्यंतचे सर्वच फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकतंच तिने तिच्या बाळाच्या बारशाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
काय आहे धनश्रीच्या बाळाचे नाव
वास्तविक गरोदरपणाचे अथवा लहान बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात नाहीत. मात्र सध्या प्री आणि पोस्ट मॅर्टनिटी फोटोशूटचा ट्रेंड आहे. या ट्रेंडनुसार धनश्रीने तिच्या अगदी गरोदरपणातील प्रत्येक स्टेपपासून ते बाळाच्या बारशापर्यंतचे सर्वच फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. गरोदपणाचा काळ तर तिने मस्त आनंदात घालवलाच पण बाळाचा नामकरण विधीदेखील घरातच धूमधडाक्यात साजरा केला. धनश्रीने या सोहळ्याचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या बाळाची पहिली झलक आणि त्याचे आईबाबा म्हणजेच धनश्री आणि तिचे पती दिसत आहेत. एका फोटोमध्ये तिने बाळाचे नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. धनश्री काडगावकरच्या बाळाचं नाव आहे “कबीर” या फोटोजवर धनश्रीच्या चाहते आणि इतर कलाकारांकडून शुभेच्छांचा पाऊस पडताना दिसत आहे. या आधी तिच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओजवरही चाहत्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती. धनश्रीचा आई होण्याचा प्रवास तिच्या आणि तिच्या कुटुंबाप्रमाणेच तिच्या चाहत्यांनी देखील आनंदाने अनुभवला.
असं होतंय धनश्रीच्या बाळाचं कौतुक
आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी नेहमीच खास असते. मग ती एखादी सामान्य स्त्री असो वा एखादी सेलिब्रेटी…धनश्रीचे देखील आई झाल्यापासून संपू्र्ण आयुष्यच बदलून गेले आहे. सध्या ती तिचे बाळासोबत असलेले फोटो आणि संगोपनाचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र आतापर्यंत चाहत्यांना तिच्या बाळाची जवळून झलक पाहायला मिळाली नव्हती. आता या बारशाच्या फोटोमध्ये मात्र कबीर खूप जवळून आणि अतिशय गोंडस दिसत आहे. काही चाहत्यांनी बाळाचे नाव त्यांना किती आवडलं याच्याही प्रतिक्रिया या पोस्टमध्ये दिलेल्या आहे. सध्या गरोदरपण आणि बाळाच्या संगोपनामुळे धनश्री अभिनयापासून दूर आहे. मात्र ती गरोदरपणातील आणि गरोदरपणानंतरच्या फोटोशूटमधून चाहत्यांच्या सतत संपर्कात आहे. सोशल मीडियावरील धनश्रीचा फॅन फॉलोव्हर्स चांगला असल्यामुळे तिच्या फोटोज आणि व्हिडियोजला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. लवकरच ती पुन्हा मालिका अथवा चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होईल. तुम्हाला धनश्रीच्या बाळाचं नाव कसं वाटलं ते आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘आमच्यात तसं काहीही नाही’, तेजश्रीने केला त्या फोटोवरुन खुलासा
साथ निभाना साथिया फेम ‘ही’ अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई
मलायका नाही ‘ही’ व्यक्ती आहे अर्जुनसाठी खास, गोंदवला तिच्या नावचा टॅटू